ETV Bharat / state

कष्टाचे झाले चीज! अहमदनगरच्या शेतकऱ्याची मेहनत फळाला, डाळिंब पोहोचली थेट मलेशियात! - Pomegranate Farmer Success Story

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 23, 2024, 8:45 PM IST

Pomegranate Farmer Success Story : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या तांभेरे या गावचे शेतकरी संतोष पन्हाळे यांनी डाळिंबाचे दर्जेदार आणि निर्यातक्षम उत्पादन घेतलं आहे. त्यांनी उत्पादन केलेल्या डाळिंबाची निर्यात थेट मलेशियात करण्यात आली आहे.

Pomegranate Farmer Success Story
डाळिंब उत्पादक शेतकरी (Source - ETV Bharat Reporter)

अहमदनगर Pomegranate Farmer Success Story : शेतकऱ्यांना सातत्यानं विविध अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, यातून मार्ग काढत काही शेतकरी यशस्वी शेती करत चांगलं उत्पन्न मिळवत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं 'सबर का फल मिठा होता है' या म्हणीला सार्थ ठरवत आपल्या शेतातील डाळिंब विदेशात निर्यात केले आहेत. पाहूयात त्यांची यशोगाथा...

संतोष पन्हाळे, डाळिंब उत्पादक शेतकरी (Source - ETV Bharat Reporter)

बाग उभारण्यासाठी 15 लाख रुपये खर्च : राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील शेतकरी संतोष पन्हाळे यांनी पारंपरिक पद्धतीच्या शेतीतून कमी उत्पन्न मिळत असल्यानं नवीन पद्धतीनं शेती करण्याचा निर्णय घेतला. 2026 मध्ये राहुरी कृषी विद्यापीठातून भगवा जातीची 1900 डाळिंबाची रोपं आणली. त्यानंतर असलेल्या सहा एकर क्षेत्रात 14×10 फुटावर रोपांची लागवड केली. "सुरुवातीला डाळिंबाची बाग उभारण्यासाठी अंदाजे 15 लाख रुपये खर्च झाले," असं पन्हाळे यांनी सांगितलं.

50 टन डाळिंब 211 रुपये दरानं मलेशियात : तब्बल दोन वर्षांचा प्रतीक्षेनंतर 2018 पासून डाळिंबाचे उत्पन्न मिळण्यास सुरू झालं. मात्र, गेल्या तीन वर्षांपूर्वी डाळिंबाच्या बागेला वादळी वाऱ्यासह कोरोना महामारीचा मोठा फटका बसला. त्यानंतर सलग दुसऱ्या वर्षी तेलकट डाग रोगाच्या प्रादुर्भावामुळे सुमारे 21 लाख रुपये किमतीचा 112 टन माल फेकून देण्याची वेळ पन्हाळे यांच्यावर आली होती. पण खचून न जाता डाळिंबावरील तेलकट डाग काढण्यासाठी 8 महिने विविध औषधांच्या 50 फवारण्यांवर एकरी 3 लाख रुपये खर्च करून बागेला नवसंजीवनी दिली. "विविध अडचणींना तोंड देत पन्हाळेंनी नव्या जोमानं बाग पुन्हा फुलवली. औषध फवारणीचा योग्य प्रमाणात केल्यामुळे डाळिंबाला चांगला रंग आकार आणि गोडी प्राप्त झाली. उच्च प्रतीची 50 टन डाळिंब 211 रुपये दरानं मलेशियात पाठविली. तर उरलेले पाच टन डाळिंब राहाता बाजार समितीत विकले. तेथेही उच्चांकी भाव मिळाला," असे शेतकरी संतोष पन्हाळे यांनी सांगितलं.

50 टन डाळिंब आता थेट मलेशियात-"आज अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर डाळिंबाची बाग चांगली फुलली आहे. साधारणतः एका फळाचं वजन 70 ते 80 ग्राम आहे. फळाचा रंग, आकार आणि चव यावरून बारामती येथील एका व्यापाऱ्यानं जागेवर 211 रुपये प्रति किलो भाव दिलाय. या व्यापाऱ्यामार्फत 50 टन डाळिंब आता थेट मलेशियात गेला आहे. सगळा खर्च वजा करता एकरी 17 लाख रुपयांचा निव्वळ नफा शिल्लक राहिला," असं संतोष पन्हाळे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.

  • गावकऱ्यांकडून सत्कार : शेतकरी संतोष पन्हाळे या शेतकऱ्याच्या बागेतील डाळिंबाना उच्चांकी भाव मिळाला आहे. डाळिंब थेट मलेशियात गेल्यानं तांभेरे गावातील शेतकऱ्यांनी "तांभेरेचे डाळिंब मलेशियात" असे फलक गावात लावले. गावकऱ्यांच्या वतीनं शेतकरी संतोष पन्हाळे यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आलाय.
  • संतोष पन्हाळे यांचा शेतकऱ्यांना सल्ला : "वादळी वारा, तेलकट डाग रोगाच्या प्रादुर्भावामुळे तसेच अनेक अडचणी आल्या होत्या. त्यानंतर डाळिंब बागांवरून नांगर फिरवला. मात्र, शेतकऱ्यांनी योग्य नियोजन आणि कृषी तज्ञांचे मार्गदर्शन वेळेवर घेतलं. तर यश नक्कीच मिळणार," असा सल्लाही यावेळी पन्हाळे यांनी शेतकऱ्यांना दिलाय.

हेही वाचा

  1. 'मुंबईचा वडापाव' जगात भारी; खवय्यांना कुठे मिळतील बेस्ट वडापाव? - World Vada Pav Day 2024
  2. मृदा आणि जलसंधारणातून मेळघाटचा होणार विकास? नाशिक प्रबोधिनीचे अधिकारी सादर करणार अहवाल - Soil and Water Conservation
  3. आंब्यांसोबत इतर पिकांचीही भरभराट; शेतात चर खोदून अमरावतीच्या माजी महापौरांचा नवा प्रयोग - Agriculture News

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.