ETV Bharat / state

रोहित पवार कुणाच्या संपर्कात, लवकरच बाहेर येणार - मुंडे - Assembly Monsoon Session

Dhananajay Munde On Rohit Pawar : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळालय. आता राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला होता. त्यावर आता मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Dhananajay Munde On Rohit Pawar
धनंजय मुंडे, रोहित पवार (Etv Bharat MH Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 28, 2024, 7:46 PM IST

मुंबई Dhananajay Munde On Rohit Pawar : "आंतरराष्ट्रीय नेते असलेल्या रोहित पवारांनी दररोज आमच्या आमदारांबाबत संभ्रम पसरवण्याऐवजी नेमके कोण आमदार त्यांच्या पक्षाच्या संपर्कात आहेत, हे जाहीर करावं, असं आव्हान कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलय. मात्र, रोहित पवार कुणाच्या संपर्कात आहेत, हे लवकरच समोर येईल", असा टोला त्यांनी पवारांना लगावला.

तुमचं आजोबांवर किती प्रेम : "अजित पवारांवर मोठा अन्याय झाला आहे. मात्र, तुमच्यावर थोडासा अन्याय झाला, तर तुम्ही कुठल्या पक्षात जाल, हे लवकरच समोर येईल, असं मुंडे म्हणाले. गहुंजे स्टेडियमला शरद पवारांचं नाव देण्याची मागणी आम्ही पूर्वी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून रोहित पवारांकडं केली होती. मात्र, अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळं तुमचं आजोबांवर किती प्रेम आहे, हे समोर आल्याचा टोला त्यांनी रोहित पवारांना लगावला. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यापेक्षा त्यांना कर्ज मिळवून देणं जास्त महत्वाचं आहे. कर्जमाफीसाठी विभागाचा मंत्री म्हणून आपण सकारात्मक असल्याचं" मुंडे यांनी स्पष्ट केलं.

पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात : शेतकऱ्यांना तक्रार कण्यासाठी व्हॉटसअप तक्रार क्रमांक जाहीर करण्यात आला होता. त्यावर आलेल्या तक्रारींपैकी अर्धा ते एक टक्के तक्रारी खऱ्या आहेत. मात्र उर्वरीत 99 टक्के तक्रारींमध्ये फारसं तथ्य दिसलेलं नाही. बी-बियाणे, खते यांच्या काळाबाजाराच्या तक्रारींवर तातडीनं कारवाई केली जात असल्याचं मुंडे यांनी सांगितलं. खते, बी-बियाणे याबाबतीत कसलीही लूट होणार नाही, याची काळजी घेतली जात असल्याची ग्वाही कृषीमंत्र्यांनी यावेळी दिली. पीक विमा शेतकऱ्यांना पंधरा ते वीस जुलैपर्यंत त्यांच्या खात्यात मिळेल, असं त्यांनी जाहीर केलं.

दोन्ही समाजाला शांततेचं आवाहन : ओबीसी नेते लक्ष्मण हाके तसंच वाघमारे भगवानगडावर जाणार होते. त्यांच्या वाहनांवर आधी दगडफेक झाली. नंतर त्याची प्रतिक्रिया उमटली. मात्र, आपण दोन्ही समाजाला शांततेचं आवाहन केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीप्रमाणं वाटचाल करण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे समाजातील अठरापगड जातींचा गावगाडा सुरळीतपणं चालण्यासाठी सर्वांना एकत्र घेऊन पुढं जायला हवं. त्याचं पालन सर्वांनी करण्याची गरज आहे. अनेक ठिकाणी आपण भेट देऊन छोट्या मोठ्या गावांमध्ये शांततेचं आवाहन केलं असून आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचं ते म्हणाले.

'हे' वाचलंत का :

  1. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्पात सरकारकडून घोषणा अन् पैशांचा 'पाऊस' - maharashtra budget session 2024
  2. दरवाढीसाठी दूध उत्पादक शेतकरी आक्रमक, संगमनेरात रस्तारोको आंदोलन; शालेय विद्यर्थ्यांचाही आंदोलनात सहभाग - Farmers Agitation
  3. राज्यात पुन्हा ‘डबल इंजिन’चं सरकार येणार”; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती - Chandrashekhar Bawankule

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.