ETV Bharat / state

गोव्याच्या पाचपट एक जिल्हा; दुसरा जिल्हा करण्यासाठी 40 वर्षापासून प्रस्ताव प्रलंबित - Largest District of Maharashtra

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 14, 2024, 3:57 PM IST

Shrirampur District : राज्यात भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा असलेल्या अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन करुन गुणवत्तेच्या आधारे श्रीरामपूर जिल्ह्याची घोषणा करावी, या मागणीसाठी रविवारी (14 जुलै) श्रीरामपूर शहर बंद ठेवून आंदोलन करण्यात आलं.

Shrirampur District
श्रीरामपूर बंद (ETV Bharat Reporter)

श्रीरामपूर Shrirampur District : राज्यात भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा असलेल्या अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन करुन गुणवत्तेच्या आधारे श्रीरामपूर जिल्ह्याची घोषणा करावी, या मागणीसाठी श्रीरामपूर शहर बंद ठेवण्यात आलं होतं. स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीनं या बंदचं आयोजन करण्यात आलं.

श्रीरामपूर नवीन जिल्हा करण्यासाठी आंदोलन (ETV Bharat Reporter)

40 वर्षांपासून प्रस्ताव प्रलंबित : अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनाचा प्रस्ताव शासन दरबारी गेल्या चाळीस वर्षांपासून प्रलंबित आहे. आकारानं 17 हजार चौरस किलोमीटर एवढा प्रचंड मोठा असलेला हा जिल्हा महाराष्ट्र राज्यातील आकारानं सर्वाधिक मोठा आहे. केंद्र सरकारच्या विविध योजना प्रस्तावित जिल्हा म्हणून श्रीरामपूर मानूनच राबविण्यात येत आहेत. तसंच प्रशासकीयदृष्ट्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत, तसंच सर्वांसाठी सोयीचा आणि मध्यभागी असल्यानं विभाजनानंतर श्रीरामपूर हेच ठिकाण जिल्ह्यासाठी योग्य आहे. तसंच गुणवत्तेच्या आधारे श्रीरामपूर या शहराचीच शिफारस जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त नाशिक यांनी राज्य सरकारकडं 1998 मध्ये केली होती.

निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा : केवळ राजकीय इच्छाशक्ती आणि श्रेयवादामुळं हा प्रश्न गेल्या 40 वर्षांपासून अडकून पडला आहे. त्यासाठी सातत्यानं विविध अराजकीय संघटनांचं आंदोलनं सुरु असतं. आता आगामी विधानसभेच्या तोंडावर सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचविण्यासाठी पुन्हा हे आंदोलन सुरु झालं आहे. आता मात्र हा प्रश्न मार्गी लागला नाही तर प्रसंगी उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडून आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशाराही आंदोलक देत आहेत.

सरकार जिल्हा विभाजनाचा निर्णय घेणार का? : अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीनं राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. तब्बल 17412 चौ. किमी असलेला हा जिल्हा उत्तर नगर जिल्हा आणि दक्षिण नगर जिल्हा अशा दोन भागात विभागला गेला आहे. जिल्हा विभाजनावरुन राजकारण रंगत आहे. गोवा राज्यापेक्षा पाचपट क्षेत्रफळ असलेला अहमदनगर जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या विभाजनाचा निर्णय सरकार घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा :

  1. Ahmednagar Division: अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, संगमनेर आणि शिर्डी ही तीन नावे नव्या जिल्हा मुख्यालयासाठी आघाडीवर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.