ETV Bharat / state

एकाच गुन्हाचे दोन एफआयआर पाहून उच्च न्यायालयाचे मुंबई पोलिसांच्या कारभारावर ताशेरे - two FIRs of same crime

मुंबईतील वांद्रे उपनगरात जीवे मारण्याची धमकी आणि चाकू हल्ला केला असा गुन्हा तिघाजणांवर दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याशी संबंधित तीन आरोपींनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावेळी एकाच गुन्ह्यात एकाच पोलीस स्टेशनमध्ये दोन एफआयआर दाखल झाल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर विचाराअंती या आरोपींना उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

Two FIRs of the same crime
एकाच गुन्हाचे दोन एफआयआर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 13, 2024, 3:14 PM IST

मुंबई - मुंबईतील वांद्रे उपनगरात भारत नगर या ठिकाणी 22 फेब्रुवारी 2024 रोजी विहान कंपनीच्या वतीने पुनर्वसनाचे काम सुरू होते. त्यात काफिल अहमद खान, झीनत काफिल अहमद खान, आणि निलोफर तारीक खानसह इतर आरोपींनी विकासकाच्या काही लोकांनी धमकी दिली. शिवीगाळ केली आणि चाकू भोसकण्याचा प्रयत्न केला, असा गुन्हा दाखल झाला होता. परंतु हा गुन्हा खोटा असल्याचे म्हणत संबंधित तीन आरोपींनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी उच्च न्यायालयाच्या समोर आरोपींच्या वकिलांनी ही बाब नजरेस आणून दिली, की एकाच दिवशी एकाच वेळेला एकाच घटनेचे दोन एफआयआर नोंदवले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या एफआयआर बाबतच शंका उत्पन्न होते. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी तीन आरोपींना अटकपूर्वक जामीन मंजूर केलेला आहे. 13 मार्च रोजी न्यायालयाने हा निर्णय जारी केला आहे.

"एकाच घटनेच्या दोन एफआयआर कशा असू शकतात ?"असा प्रश्न उच्च न्यायालयाने वेगळ्या खटल्यात केला. तसेच मुंबई पोलिसांच्या कारभारावर ताशेरे ओढले. न्यायमूर्ती सारंग कोतवाल म्हणाले,"भारत भरात सर्वत्र एका गुन्ह्याच्यासाठी एकच एफआयआर असतो. इथे मात्र दोन एफआयआर एकाच वेळी एकाच ठिकाणी आहेत. गुन्हा देखील एकच आणि त्यात जो गुन्हा पोलीस सांगतात तो तर एफआयआर मध्ये नाही, अशी टिपण्णी करत उच्च न्यायालयाने तीन आरोपींचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्याचा निर्णय केला.

जीवे मारण्याची धमकी आणि चाकू भोसकल्याचा गुन्हा

पोलिसांच्या वतीने वकिलांनी न्यायालयात बाजू मांडली. पोलिसांच्या एफआयआरनुसार यातील तीन आरोपी काफिल अहमद खान, झीनत काफिल अहमद खान, आणि निलोफर तारीक खान यांनी परिसरातील काही नागरिकांना चाकूने भोसकले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली आहे, त्यामुळे जर यांना अटक नाही केली, तर हे विकासकाच्या कामात पुन्हा अडथळा आणतील, असा युक्तीवाद केला.

एकाच घटनेचे एकाच दिवशी दोन एफआयआर

आरोपीच्या वकील भाग्येशा कुरणे यांनी मुद्दा उपस्थित केला की, "एकाच घटनेचे पोलिसांनी दोन एफआयआर एकाच दिवशी एकाच ठिकाणी केलेले आहेत. आरोपींनी चाकू भोसकले, या संदर्भात दोन्ही एफआयआरमध्ये बिलकुल उल्लेख नाही. दोन एफआयआर हे कायदेशीर आहेत का? हाच मुळी येथे प्रश्न उपस्थित होतो."

उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी दोन एफआयआर एकाच दिवशी एकाच ठिकाणी कशा काय केल्या जातात. याबाबत फैलावर घेत पोलिसांच्या कारभारावर कडक ताशेरे ओढले. त्यांना सज्जड दम देखील दिला. हे असे खपवून घेतले जाणार नाही, असे म्हणत तीन आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केला. प्रत्येकी आरोपीला 30 हजार रुपयाचा बॉण्ड भरावा; अशी अट देखील न्यायालयाने घातली आहे. या खटल्यात जेष्ठ वकील विजय कुरले यांनी मुख्य बाजू मांडली.

हेही वाचा -

  1. Uddhav Thackrey News : "भाजपानं निवडणुकीसाठी उमेदवार..", आघाडीत येण्याची ऑफर दिल्यानं गडकरींचा उद्धव ठाकरेंना टोला
  2. Nashik Loksabha Constituency: महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटेना, खासदार श्रीकांत शिंदेंकडून थेट 'या' खासदाराची उमेदवारी जाहीर
  3. Rahul Gandhi Speech : "पंतप्रधानांनी 20-25 उद्योगपतींचं 16 लाख कोटींचं कर्ज...", राहुल गांधींचा गंभीर आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.