मुंबई Adivasi Day : मुंबईसारख्या महानगरीतही आजही आदिवासी दिन साजरा होतोय. आज मुंबईतील विधानभवनासमोर आदिवासी दिन साजरा करण्यात आला. यावेळी आदिवासी बांधवांनी विधानभवनासमोर विविध नृत्य सादर केलं. यावेळी आदिवासींनी बासरी, टाळ, सनई, ढोलकीच्या तालावर 'ताल' धरला. तसंच त्यांनी पांरपारिक आदिवासी वेशभूषा करून 'जागतिक आदिवासी दिन' साजरा केला. यावेळी आदिवासी बांधवांचं नृत्य पाहण्यासाठी परिसरात मोठी गर्दी झाली होती.
लक्षवेधी वेशभूषा आणि विविध नृत्य सादर : नाशिक तसंच उत्तर महाराष्ट्रातून आदिवासी दिनानिमित्त अनेक जण मुंबईत आले. यावेळी त्यांनी पारंपरिक वेशभूषा करत विविध नृत्य सादर केलं. या नृत्त्यात डोंगरी, पावडी आदी नृत्याचा सहभाग होता. "आम्ही जागतिक आदिवासी दिनानिमित्त प्रत्येक वर्षी गावाकडून मुंबईत येतो. मुंबईत येऊन आम्ही आदिवासी दिन साजरा करतो", असं यावेळी आदिवासी बांधवांकडून सांगण्यात आलं.
सार्वजनिक सुट्टीची मागणी : "विधानपरिषदेचे उपसभापती नरहरी झिरवाळ आम्हाला प्रत्येक वर्षी मुंबईत घेऊन येतात. आम्ही विधानभवन परिसरात आदिवासी समाजातील प्रसिद्ध नृत्य सादर करुन अदिवासी दिन साजरा करतो. 'तारपा' हे नृत्य देशभरात प्रसिद्ध आहे. विविध दिनानिमित्त शासनाकडून सार्वजनिक सुट्ट्या असतात. तशीच सार्वजनिक सुट्टी 'जागतिक आदिवासी दिना'निमित्त असायला हवी, अशी मागणी आदिवासी बांधवांनी केलीय.
- आदिवासींची ओळख देशपातळीवर घ्यावी : दुसरीकडं आदिवासी बांधवांचं नृत्य पाहण्यासाठी मुंबईकरांची गर्दी दिसून आली. "आदिवासी समाजातील नृत्याची परंपरा देशातील कानाकोपऱ्यात पोहोचावी, यासाठी आम्ही हा दिन साजरा करतो. मुंबईत वाद्यांच्या तालावर नृत्य करतो," असं यावेळी आदिवासी बांधवांनी सांगितलं.