ETV Bharat / state

अभिनेत्री श्वेता शिंदेच्या घरातील चोरीचा गुन्हा उघड, सराईत चोरट्याकडून 18 तोळ्याचे दागिने हस्तगत - theft case revealed in Satara - THEFT CASE REVEALED IN SATARA

Actress Shweta Shinde : सातारा स्थानिक गुन्हे शाखेनं (एलसीबी) धाराशिव जिल्ह्यातील सराईत चोरट्याला अटक केली आहे. त्यांच्याकडून मराठी अभिनेत्री तथा निर्माती श्वेता शिंदे यांच्या बंगल्यातील चोरीसह अन्य दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.

Actress Shweta Shinde bungalow theft case
पोलिसांनी पकडलेला चोरटा, अभिनेत्री श्वेता शिंदे (Etv Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 4, 2024, 5:56 PM IST

सातारा Actress Shweta Shinde : साताऱ्यातील पिरवाडीत राहणाऱ्या अभिनेत्री श्वेता शिंदे यांच्या बंगल्याच्या खिडकीचे गज कापून घरातील दागिने लंपास करणाऱ्या सराईत चोरट्यास सातारा स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे. राजकुमार उर्फ राजू ओंकारप्पा आपचे (रा. कोथळी ता. उमरगा जि. धाराशिव), असं चोरट्याचं नाव आहे. त्याच्याकडून घरफोडीच्या तीन गुन्ह्यातील १३ लाख ३९ हजार रूपये किंमतीचे १८ तोळ्याचे दगिने जप्त करण्यात आले आहेत.

समीर शेख यांची प्रतिक्रिया (ETV BHARTA Reporter)

अभिनेत्रीच्या बंगल्यातील चोरीचा गुन्हा उघड : अभिनेत्री श्वेता शिंदे या आपल्या आईसोबत पिरवाडी (ता. सातारा) येथे राहतात. शुटींगच्या निमित्तानं आईसोबत त्या मुंबईला गेल्या होत्या. त्यावेळी चोरट्यानं त्यांच्या बंगल्याच्या खिडकीचे गज कापून कपाटातील ३ लाख 82 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिणे, रोख रक्कम लंपास केली होती. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा नोंद झाला होता. तसंच श्वेता शिदे यांनी पोलीस अधीक्षकाची भेट घेवून त्यांना घरफोडीची माहिती दिली होती.

खबऱ्याच्या माहितीवरून चोरट्याचं नाव निष्पन्न : पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी स्थानिक गुन्हे शाखेला घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, रोहित फार्णे, उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील यांचे पथक तयार केलं होतं. तपासादरम्यान राजकुमार उर्फ राजू ओंकारप्पा आपचे यानं घरफोडी केली असल्याची माहिती खबऱ्यानं पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांना दिली.

वाढे फाट्यावर सापळा रचून संशयिताला घेतलं ताब्यात : एलसीबीच्या पथकानं सातारा शहर परिसरात वावरत असलेल्या संशयिताला रात्रगस्तीवेळी वाढेफाटा परिससरात सापळा रचून ताब्यात घेतलं. तपासात संशयितानं सातारा शहर, भुईंज, लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन घरफोड्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून तीन गुन्ह्यातील १८.३ तोळ्याचे तसंच चांदीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल, असा एकूण १३ लाख ३९ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

दोन वर्षात 292 गुन्हे उघड, पावणे पाच कोटींचा ऐवज जप्त : स्थानिक गुन्हे शाखेनं (एलसीबी) नोव्हेंबर 2022 पासून आजअखेर दरोडा, जबरी चोरी, घरफोडीचे 292 गुन्हे उघडकीस आणत 6 किलो 845 ग्रॅम वजनाचे दागिणे, 12 किलो चांदी, असा 4 कोटी 78 लाख 31 हजार रूपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे. याबद्दल पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी एलसीबी पथकाचं कौतुक केलं आहे.

'हे' वाचलंत का :

  1. मुंबई 26/11 बॉम्बस्फोट प्रकरण : दहशतवादी तहव्वूर राणाचं प्रत्यार्पण करणं योग्य, भारताला पूर्ण अधिकार, यूएस अ‍ॅटर्नीचा जोरदार युक्तीवाद - Mumbai Terror Attack
  2. NEET पेपर लिक प्रकरण : सीबीआयनं धनबादमधून अमन सिंगला केलं अटक, आतापर्यंत चार जणांना ठोकल्या बेड्या - NEET Paper Leak Case
  3. इमारतीचं काम करताना ढासळला मातीचा ढिगारा; यूपीचा मजूर दगावला, बिहारच्या मजुराला वाचवण्यात यश - Mangaluru Landslide

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.