शिर्डी (अहमदनगह) Ishwarya Menon Shirdi Visit : दक्षिणेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री ईश्वर्या मेनन हिने आज (26 जून) शिर्डीत येऊन साईबाबा समाधीचं दर्शन घेतलं. "भजे वायु वेगम" चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर साईबाबांचे आभार मानण्यासाठी शिर्डीला आवर्जुन आले असं तिनं "ई टीव्ही भारतशी" बोलताना सांगितलं.
म्हणाली, साईबाबांमुळे चित्रपट हिट : गेल्या 31 मे रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला "भजे वायु वेगम" या तेलगु चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला असून चित्रपट सुपरहिट ठरलाय. त्यामुळे आज आई जया मेननसह शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आहे. साईबाबांचे आभार मानले आहे.त साईबाबांच्या आशीर्वादाने माझा चित्रपट हिट झाला असल्याचंही यावेळी अभिनेत्री ईश्वर्या मेनन हिने "ई टीव्ही भारतशी" बोलताना सांगितलं.
ईश्वर्याच्या बासुका चित्रपटाचे शूटिंग सुरू : सध्या दोन तेलगू आणि एक मल्याळम चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. दक्षिणेतील सुपरस्टार मोहनलाल यांचा बरोबर "बासुका" या नवीन चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. लवकरच बासुका हा चित्रपट प्रेक्षकांसाठी येणार असल्याचंही अभिनेत्री ईश्वर्या मेनन म्हणाली आहे.
साईबाबा संस्थानतर्फे ऐश्वर्याचा सत्कार : अभिनेत्री ईश्वर्या मेननने आज आपल्या आई जया मेमनसह दुपारी शिर्डीत येवून साई मंदिरात साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलय. यानंतर तिनं द्वारकामाई आणि गुरुस्थान मंदिराचंही दर्शन घेतलं. साईबाबांच्या दर्शनानंतर साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी अभिनेत्री ईश्वर्या मेनन आणि आई जया मेनन यांचा शॉल साईमूर्ती देऊन त्यांचा सत्कार केला.
चित्रपट रिलीज होण्यापूर्वी घेते साईबाबांचे दर्शन : साईबाबांचं दर्शन घेऊन मन प्रसन्न झालं आहे. साईबाबांचा आशीर्वाद आमच्या कुटुंबीयांवर कायमच राहिला आहे. माझा कुठलाही नवीन चित्रपट रिलीज होण्यापूर्वी मी न चुकता साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला येते. गेल्या दहा वर्षांपासून साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला येत असल्याचंही अभिनेत्री ईश्वर्या मेनन हिने साईबाबा संस्थानचे जनसंपर्क प्रमुख तुषार शेळके यांच्याशी बोलताना सांगितलं.
हेही वाचा :
- एसटी महामंडळाच्या बस सुविधेमुळं आदिवासी बांधवांसह विद्यार्थ्यांना फायदा, चालकासह वाहकाचा घनदाट जंगलात मुक्काम - Melghat Bus facility
- पुण्यात झिकाचा प्रादुर्भाव, एरंडवण्यात डॉक्टरसह मुलीला झिकाची लागण - Zika Virus Patients
- लोकशाही वाचवण्यासाठी खोकेशाहीला अद्दल घडवा : किशोरी पेडणेकर; तर किरण शेलारांना जिंकण्याचा विश्वास - Graduate Constituency Election 2024