ETV Bharat / state

"सत्ता आणि पैशाची गुर्मी"; वरळी हिट अँड रन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांना अश्रू अनावर - Worli Hit And Run

Worli Hit And Run Case : वरळीमध्ये रविवारी पहाटे 'हिट अँड रन'ची घटना घडली होती. यात आलिशान BMW कारनं दुचाकीवरील एका दाम्पत्याला जोरदार धडक दिली. यात कारनं महिलेला तब्बल तीन किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं. यात त्या महिलेचा मृत्यू झाला.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 9, 2024, 5:43 PM IST

Worli Hit And Run Case
वरळी हिट अँड रन (ETV Bharat MH Desk)

मुंबई Worli Hit And Run Case : राज्यात मागील काही दिवसांपासून 'हिट अँड रन'च्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे. अशीच एक हिट अँड रनची घटना वरळीत रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. शिवसेना उपनेता राजेश शाह यांच्या मुलाच्या BMW या आलिशान कारनं दुचाकीला जोरदार धडक दिली. यात एका महिलेचा मृत्यू झाला. यावर आता सर्व स्तरातून तिखट प्रतिक्रिया येत आहेत. मृत महिला या ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांच्या नातेवाईक होत्या. या घटनेविषयी बोलताना जयवंत वाडकर यांना अश्रू अनावर झाले. या सर्व घटनेवर त्यांनी 'ईटीव्ही भारत'ला Exclusive प्रतिक्रिया दिली.

सत्ता आणि पैशाची गुर्मी : वरळी हिट अँड रन घटनेतील मृत कावेरी नाखवा ही ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांच्या चुलत भावाची मुलगी होती. कावेरी यांच्याबद्दलच्या आठवणी सांगताना वाडकर भावविवश झाले. त्यांनी घडलेल्या घटनेवरुन सत्ता आणि पैशाची गुर्मी यावरही चीड व्यक्त केली. घडलेली घटना खूप धक्कादायक आहे. अतिशय क्रूर पद्धतीनं कावेरीला मारण्यात आलं. तसंच हे सर्व ठरवूनच केल्याचा गंभीर आरोप जयवंत वाडकर यांनी केला.

कायदा बदलला पाहिजे : "कावेरी ही माझ्या सख्ख्या चुलत भावाची मुलगी. आता या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केली. आरोपीची पोलीस कोठडी घेऊन त्याच्याकडून सविस्तर माहिती घ्या. अशा प्रकरणातला कायदा बदलला पाहिजे. १० ते १५ हजार रुपये देऊन जामीन मिळतो हे चुकीचं आहे. त्यामुळं कायदा बदलून कठोर कायदा करा." अशी मागणी जयवंत वाडकर यांनी केली. पुढं ते सांगतात, "कावेरीला क्रुरतेनं मारलं आहे. तिचा नवरा कार चालकाला सांगत होता थांब...थांब...पण त्यानं ती कार पुढे नेली. तब्बल तीन किलोमीटरपर्यंत कावेरीला फरफटत नेलं. पुढं जात कार थांबवत तिला बाहेर काढून नंतर कार निघून गेली."

वाडकर यांना अश्रू अनावर : पुतणीसोबत घडलेल्या घटनेचा प्रसंग सांगताना ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांना अश्रू अनावर झाले. "आरोपीच्या वडिलांचे फोन चेक केले पाहिजे. घटनेनंतर कारची नंबर प्लेट आणि धनुष्यबाण चिन्ह असलेले लोगो बाहेर काढून ठेवला. हे सगळं ठरवून केलं आहे. पैशांचा आणि सत्तेचा माज असल्यानं अशा घटना घडत आहेत. ही एक घटना उघड झाली. अशा रोज अनेक घटना राज्यात घडत असतील तर हे गंभीर आहे," अशी चिंता वाडकर यांनी व्यक्त केली. पुतणी कावेरीला स्मृतींना उजाळा देताना वाडकर यांना हुंदके आवरत नव्हते.

हेही वाचा :

  1. वरळी हिट अँड रन प्रकरणात आरोपी मिहिर शाह अजूनही फरारच, पोलिसांकडून लूक आऊट सर्क्युलर - Worli Hit and Run Case
  2. वरळीत 'हिट अँड रन'चा थरार; नेत्याच्या BMW नं उडवल्यानं महिलेचा मृत्यू, दोघांना अटक - Worli Hit And Run Accident

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.