मुंबई Salman Khan Case : अभिनेता सलमान खानला धमकी देणाऱ्या बनवारीलाल लातुरलाल गुजर, (वय 25) या आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने राजस्थानहून आज दुपारी अडीज वाजताच्या सुमारास मुंबईत दाखल केले. दुपारी आरोपीला किल्ला कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यु ट्युबवर व्हिडिओ पोस्ट करून अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी या आरोपीने दिली होती.
अशी दिली धमकी : वाय प्लस सिक्युरिटी हो या फिर झेड प्लस हो... आम्ही जाहीर केलं म्हणजे केलं. आम्ही बोललो ते आम्ही करणार आहोत. ठीक आहे जो हमसे टकरायेंगे उनको मिट्टी में मिलायेंगे असं आरोपी बनवारीलाल याने यु ट्यूबवर पोस्ट केलेल्या व्हिडिओ मध्ये नमूद केलं आहे. त्याचप्रमाणं आरोपी बनवारीलाल याने बिष्णोई गॅंगशी जोडलेले साथीदार गोल्डी ब्रार, नितीन, विवेक, रोहित आणि जितीन यांची नावे व्हिडिओत घेतलेली आहेत. सलमान खानबाबत आरोपीने उसे ऍटिट्यूट है, उसमे इगो हैं, वो अपने आप को दबंग किंग खान मानता है ना, तो हंम बतायेंगे क्या होता है खान असा उल्लेख करत धमकी दिली आहे.
गुन्हा दाखल : 'अरे छोडो यार' या यू ट्यूब चॅनलवर अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याच्या कटाबाबत उल्लेख केल्याप्रकरणी, दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम 506(2), 504, 34 आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आज आरोपीला राजस्थान राज्याच्या बुंदी जिल्ह्यातील बोर्डा गावातून अटक करण्यात आली असल्याची माहिती, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली.
सलमानला मारण्याची धमकी : आरोपी बनवारीलाल गुजरने बिश्नोई गॅंगच्या नावाने धमकी दिली होती. आरोपी बनवारीलाल गुजरने यु ट्यूबवर व्हिडिओ बनवून धमकी दिली होती. सलमान खान कुठे जातो याची व्हिडिओत बतावणी करत सलमानला मारण्याची धमकी दिली होती. या व्हिडिओत लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्या नावाचा उल्लेख केलेला आहे. अभिनेता सलमान खानला धमकी देणाऱ्या आरोपीला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
बिश्नोई गँगच्या नावाने धमकी : सलमानला धमकी देत यू-युट्युबवर धमकीचा व्हिडिओ पोस्ट केला होता. याबाबत अभिनेता सलमान खानच्या मित्राने पोलिसांना माहिती कळवताच गुन्हे शाखा सतर्क झाली आणि तपासाची चक्रे जोरदार फिरवली. बिश्नोई गँगच्या नावाने धमकी दिली होती. या धमकीत बिष्णोई गँगच्या सदस्यांसह गँगस्टर गोल्डी ब्रारचा देखील उल्लेख करण्यात आला होता.
हेही वाचा -