मुंबई Aaple Sarkar : नागरिकांच्या समस्यांचे निरसन करण्यासाठी केंद्र सरकारने सीपीजी रॅम्स (पीजी पोर्टल) कार्यप्रणाली सुरू केली. त्याच धर्तीवर राज्य सरकारनेही सरकार योजना सुरू केली होती. परंतु, सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २८ सप्टेंबर २०२३ ला 'आपले सरकार २.०' ही मोहीम सुरू केली. केंद्र सरकारच्या धर्तीवर या योजनेची ठोस अंमलबजावणी करणार, असा दावा केला. ११ ऑगस्ट २०२३ ते ३१ ऑक्टोबर २०२३ दरम्यानच्या तक्रारींचे संनियंत्रण करणे शक्य होत नसल्याने अखेर 'आपले सरकार' कार्यप्रणाली बंद करण्यात आली.
आता राबवणार विशेष मोहीम : प्रलंबित असलेल्या या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी आता विशेष मोहीम राबवून, तक्रारीं सोडविण्याचा निर्णय राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे. त्यानुसार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गोपनीय अहवाल तयार करून त्यात तक्रारींची नोंद केली जाईल. प्रशासन सुरक्षा विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या शासकीय ट्वीटर खात्यावरून माहिती दिली जाईल, असे सांगण्यात आले. मात्र, संबंधित विभागाने अद्याप अशी कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे प्रलंबित तक्रारींचा ओघ वाढू लागल्याने सरकार हतबल झाले आहे.
किती आहेत तक्रारी प्रलंबित : 'आपले सरकार' या मोहीमेच्या संकेतस्थळावर आतापर्यंत २२७१ तक्रारी प्रशासकीय विभागाकडे प्रलंबित आहेत. यासह संबंधित विभागाकडे १३९ तक्रारी आल्या आहेत. दोन्ही मिळून २४१० तक्रारी अद्याप रखडल्या आहेत. त्या निकाली काढण्यासाठी सरकारने आता पाऊले उचलली आहेत. देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. निवडणुका संपल्या की येत्या ५ मेपासून १५ मे पर्यंत विशेष मोहीम राबवून निकाली काढण्यात येतील. तसेच संबंधित विशेष प्रणालीबाबत काही तांत्रिक अडचणी आल्यास एनआयसी, आयटी विभागाकडे संपर्क साधून तक्रारी सोडविण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाने दिले असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.