ETV Bharat / state

लोकलमध्ये मोबाईल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, पोलिसांचा शोध सुरू - Railway Accident

Railway Accident : लोकलमधून प्रवास करणाऱ्या जगन जंगले (31) या प्रवाशाच्या हातावर एका गर्दुल्यानं फटका मारल्यानं तो लोकलमधून खाली पडला. यामुळं त्याला दोन्ही पाय गमावले लागले. याप्रकरणी आरोपीचा शोध सुरू असल्याचं ठाणे रेल्वे पोलिसांनी (Thane Railway Police) सांगितलं.

Railway Accidents News
अपघातात जखमी (ETV Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 25, 2024, 10:02 PM IST

प्रतिक्रिया देताना डॉ. बाबासाहेब चव्हाण (ETV Reporter)

ठाणे Railway Accident : लोकलमधून प्रवास करणाऱ्या वर्षीय जगन जंगले (31) या तरुणाच्या हातावर गर्दुल्यानं लाकडी दांड्यानं फटका मारल्यानं तो लोकलमधून खाली पडून गंभीर जखमी झालाय. या घटनेत जगन जंगले या रेल्वे प्रवशाला आपले दोन्ही पाय गमवावे लागलेत. या घटनेनं तीव्र संताप व्यक्त होत असून यातील नेमक्या प्रकाराचा आणि आरोपीचा शोध ठाणे रेल्वे पोलीस (Thane Railway Police) घेत आहेत.

दोन्ही पायांवरून गेली लोकल : दादरमधील मॅजेस्टिक बुक स्टॉल येथे कामाला असलेले जगन हे कल्याण येथील रहिवासी आहेत. तीन महिन्या पूर्वीच जगन यांचं लग्न झालंय. नेहमीप्रमाणं जगन यांनी 22 मे रोजी कल्याणला जाणारी लोकल रात्री साडेआठच्या सुमारास दादर स्थानकातून पकडली. ठाणे स्थानकातून लोकल निघाल्यानंतर कळवा-ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान लोकल आल्यानंतर दरवाजात उभे असलेल्या जगन यांच्या हातातील मोबाईल चोरी हिसकावण्यासाठी एका गर्दुल्यानं त्यांच्या डाव्या हातावर लाकडी दांडक्यानं फटका मारला. यात तोल गेल्यानं जगन हे फलाट क्रमांक दोनपासून 200 मीटर पुढे लोकलमधून खाली पडले. त्याचवेळी त्यांचा मोबाईलही गहाळ झाला. या घटनेमध्ये जगन यांच्या दोन्ही पायांवरून लोकलचे चाक गेल्यामुळं ते गंभीर जखमी झाले. त्यांना रेल्वे पोलिसांसह काही प्रवाशांच्या मदतीनं तातडीनं कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केलं होतं.

दोन्ही पायावर झाली शस्त्रक्रिया : जगन याच्या पायावर तातडीनं शस्त्रक्रिया करावी लागणार असल्यानं त्यांना ठाण्यातील ढोकाळी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याठिकाणी त्यांच्या दोन्ही पायावर शस्त्रक्रिया करून कापावे लागले. या प्रकरणी ठाणे रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, जगन हे नेमकं कसं पडले, त्यांना कोणी पाडले, त्यांचा मोबाईल चोरी कोणी हिसकावला? या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

माझ्या हातावर काठीचा फटका पडला आणि मी लोकलमधून खाली पडलो. माझ्यासोबत काय घडलं आहे ते काही काळ मला समजलचं नाही. मी वाचवा वाचवा ओरडत होतो, लोक मदतीला आले आणि मला रुग्णालयात दाखल केलं. पायावरून लोकल गेली आणि दोन्ही पाय गमावल्याचं डॉक्टरांनी मला सांगितलं. यापुढे मी कधीच उभा सुध्दा राहू शकत नाही. - जगन जंगले

जीव वाचला पण दोन्ही पाय गमवावे लागले : जगन हा एकुलता एक कमवणारा आहे. त्याचे आई वडील शेतकरी आहेत. घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे. जगन यांचे तीन महिन्यांपूर्वीच लग्न झाले आहे. सुदैवाने, या अपघातात त्यांचा जीव वाचला असला तरी त्यांना दोन्ही पाय गमवावे लागले आहेत. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला पकडून कठोर कारवाईची, तसेच रुग्णालयीन खर्च आणि रेल्वे प्रशासनाने भरपाई द्यावी अशी मागणी आता जगनचे नातेवाईकांनी केली.

गंभीर जखमी झालेलेल्या रुग्णावर अश्या परिस्थितीत जीव वाचवणं सर्वात महत्त्वाचं असतं. जगन जंगले हा रुग्ण आमच्याकडं आला तेव्हा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. त्याला 3 ते 4 बाटल्या रक्त चढविण्यात आले. त्यांनतर आमची टीम त्याची प्रकृती नियंत्रणात आणण्यासाठी रात्रभर प्रयत्न करत होती. त्याचे दोन्ही पाय कापावे लागले असून यापुढे त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. यासाठी मोठा खर्च येणार आहे. - डॉ. बाबासाहेब चव्हाण, अस्थिरोग तज्ञ, हायलँड हॉस्पिटल

हेही वाचा -

  1. Train Accidents Unidentified Bodies : रेल्वे अपघातांतील ४३४ मृतदेह बेवारस; वारसांचा शोध लावण्याचे पोलिसांचे प्रयत्न
  2. टायर फुटल्यामुळे ट्रक पडला रेल्वे रुळांवर; क्लिनरच्या सतर्कतेमुळं टळला मोठा धोका
  3. उन्हाळी सुट्टीत गावाला जाण्याचा प्लॅन करताय? आधी हे रेल्वेचे वेळापत्रक पाहा मगच घराबाहेर पडा - Train Schedule

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.