ETV Bharat / state

धुळवडीच्या दिवशी रंगाचा बेरंग! धक्का लागल्याच्या किरकोळ वादातून तरुणावर गंभीर हल्ला, तिघांना अटक - Bhiwandi Crime - BHIWANDI CRIME

Bhiwandi Crime : भिवंडी शहरातून किरकोळ वादातून गंभीर हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. ही घटना काल सोमवार (दि. 26 मार्च) रोजी घडली आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.

फाईल फोटो
फाईल फोटो
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 26, 2024, 3:43 PM IST

ठाणे Bhiwandi Crime : भिवंडी शहरातील नारपोली परिसरातील भंडारी कंपाऊंडमधील एका चाळीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे राहणाऱ्या तीन मित्रांमध्ये एकाला येथीलच तरुणाचा धक्का लागला. त्या धक्का लागल्याच्या वादातून एकावर धारदार शस्त्राने वार करून तरुणास गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना काल सोमवार (दि. २५ मार्च) रोजी घडली. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून, या प्रकरणातील तरुणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अभिदंन बच्चू सरोज (19), मनमोहन राकेशकुमार पांडे (18), विकास शेषनाथ पटेल (19) अशी अटक केलेल्या तरुणांची नावं आहेत. तर, अमरेश कुमार सावली प्रसाद यादव अशी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणांची नावं आहेत.

गंभीर जखमी केलं : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी अमरेश कुमार हा भिवंडीतील भंडारी कंपाऊंड परिसरात (Bhandari area of Bhiwandi city) असलेल्या एका चाळीत कुटुंबासह राहतो. तर आरोपीही याच भागात असलेल्या चाळीत राहतो. काल धुळवड रंगात सुरू असतानाच भिवंडीतील नारपोली येथील भंडारी कंपाऊंडमधील नॅशनल हॉटेलच्या समोरील आरोपी मनमोहन पांडे हा राहत असलेल्या जय अंबे चाळीत धुळवड सुरू होती. त्यावेळी जखमी अमरेश कुमार सावली प्रसाद यादव हा त्या चाळीत राहणाऱ्या सतिष यादव आणि विक्रम यादव यांच्यासोबत त्याचा मूळ गावाकडचा मित्र खेमराज यादव यास भेटण्यास गेला होता. त्यास भेटून तिघेही बिल्डिंगमधून खाली उतरत असताना अमरेशचा आरोपी अभिदंन यास धक्का लागला. याच रागातून तिन्ही आरोपींनी आपसात संगनमताने अमरेश आणि सतिषला शिवीगाळ करून धक्का बुक्क्यांनी मारहाण केली. तर, मारहाणीदरम्यान आरोपी विकासने अमरेशच्या पाठीवर धारदार शस्त्राने वार करून त्यास गंभीर जखमी केलं आहे.

प्रकरणातील लोकांवर गुन्हा दाखल : गंभीर जखमी अमरेश कुमारवर ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, सद्यस्थितीत त्याची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी तिघांवर भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. आज मंगळवार (दि. 26 मार्च)रोजी तिन्ही अटक आरोपींना न्यायालयात हजर केलं असता, अधिक पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस उपनिरिक्षक नरेंद्र सोनवणे यांनी दिली आहे. तसंच, या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक नरेंद्र सोनवणे करीत आहेत.

हेही वाचा :

1 धुळवडीच्या दिवशी दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या 124 तळीरामांवर पोलिसांची कारवाई - drunk driving cases in Mumbai

2 धुलीवंदनाचा अतिउत्साह नडला! समुद्रात पाच अल्पवयीन मुले बुडाली, एकाचा मृत्यू - Youth drowns in Mumbai sea

3 अंध असूनही बनले हरहुन्नरी कलाकार; रेडिओ कानाला लावून शिकणाऱ्या नंदकिशोर घुलेंची वाचा प्रेरणादायी कहाणी - Nandkishor Ghule Success Story

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.