ETV Bharat / state

शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून विद्यार्थ्यांचा मृत्यू, शाळा प्रशासनावर कारवाईची पालकाकडून मागणी - Pimpri Chinchwad municipal school

Municipal School Student Died In Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेत दुर्दैवी घटना घडली आहे. इमारतीवरून खाली पडल्याने एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी 12 वाजता घडली. विद्यार्थ्याच्या वडिलांनी शालेय प्रशासनावर कारवाईची मागणी केली आहे.

Municipal School Student Died In Pimpri Chinchwad
शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 16, 2024, 5:59 PM IST

माहिती देताना विद्यार्थ्याचे नातेवाईक

पिंपरी चिंचवड : Municipal School Student Died In Pimpri Chinchwad : चिंचवडमधील चाफेकर विद्या मंदिर शाळेत आज शुक्रवार (दि. 16 फेब्रुवारी) रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. सार्थक कांबळे असं मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे. तिसऱ्या मजल्यावरील जिन्याच्या पायऱ्यावरील लोखंडी ग्रीलवरून घसरत खाली येत होता. त्याचा अचानक तोल जाऊन ही घटना घडली. यावेळी मित्राने पडशील असं करू नको, अस म्हटलं होत. त्याचवेळी तो घसरून थेट खाली कोसळला.

कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर : पिंपरी चिंचवड येथील हुतात्मा चापेकर विद्यामंदिर ही महानगरपालिकेची शाळा आहे. आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास सार्थक कांबळे हा इतर मित्रांसह तिसऱ्या मजल्यावर गेला होता. त्यानंतर पायऱ्यांजवळ असलेल्या लोखंडी ग्रीलवर आतील बाजूस पाय करून सार्थक बसला होता. त्याच्या मित्रांनी त्याला अस बसू नकोस, तू खाली पडशील असं म्हणताच सार्थकचा तोल गेला. तो खाली पडला. गंभीर जखमी झालेल्या सार्थकला तातडीने महानगरपालिकेच्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

माझा मुलगा मला परत द्या, वडिलांचा आक्रोश : आपला मुलगा अचानक होत्याचा नव्हता झाल्यानं वडिलांनी एकच टाहो फोडला. रोज समोर असलेला मुलगा आज नाही, ही भावनाच त्यांना मोठी धक्का देणारी आहे. दरम्यान, शाळेवर कठोर कारवाई करून माझा मुलगा मला परत द्या अशी मागणी सार्थकच्या वडिलांनी केली आहे. तसंच, घडलेल्या घटनेची पालिकेकडून चौकशी केली जाणार आहे. यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आल्याची माहिती, पालिकेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा :

1 महेश गायकवाड यांना आज डिस्चार्ज नाहीच, डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणीनंतर घेतला निर्णय

2 बारामतीत 'नणंद विरुद्ध भावजय' लढत? सुनेत्रा पवारांचा प्रचाराचा रथही तयार, फक्त उमेदवारीची घोषणा बाकी

3 आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याचा हृदयविकारानं मृत्यू, शंभू सीमेवरील दुर्दैवी घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.