ETV Bharat / state

कमी कालावधीत दुप्पट नफा देण्याचं दाखवलं आमिष; फिल्म डायरेक्टरला 1 कोटी 53 लाखांचा गंडा - Mumbai Crime News - MUMBAI CRIME NEWS

Mumbai Crime News : गोव्यातील जमीन आणि फ्लॅट्समध्ये गुंतवणूक करून कमी कालावधीत जास्त नफा मिळवून देण्याचं आमिष दाखवून फिल्म डायरेक्टर सिदार्थ जेन्ना (वय 50) याला दहा जणांनी 1 कोटी 53 लाखांना चुना लावला आहे.

Mumbai Crime News
नफा देण्याची आमिष दाखवून केली फसवणूक (MH DESK)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 28, 2024, 10:36 PM IST

मुंबई Mumbai Crime News : गोव्यातील जमीन आणि फ्लॅट्समध्ये गुंतवणूक करून कमी कालावधीत जास्त नफा मिळवून देण्याचं आमिष दाखवून फिल्म डायरेक्टर सिदार्थ जेन्ना (वय 50) यांना दहा जणांनी 1 कोटी 53 लाखांना चुना लावला आहे. याप्रकरणी बांगूर नगर पोलीस ठाण्यात (Bangur Nagar Police Station) आरोपी विक्रमदेव दर्शनराम मल्होत्रा, रितू विक्रमदेव मल्होत्रा, मारिया फर्नांडिस, रालस्टन पिंटो, लीना मांढरेकर, प्रमोद मांढरेकर, लियो डायस, रश्मी चोडणकर, ज्युडो सॅली गोम्स आणि साईनाथ पाटेकर या दहा जणांविरोधात भारतीय दंड संविधान कलम 34, 406, 409 आणि 420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती,वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तावडे यांनी दिली.

काय आहे प्रकरण : 2020 मध्ये विशाल सिन्हा यांच्याशी चित्रपटाच्या कामकाजासंदर्भात तक्रारदार सिदार्थ जेना यांच्याशी भेट झाली होती. त्यावेळी त्यांना तक्रारदार जेना यांनी गोव्याला स्थायिक व्हायचं असून गोव्याला मोकळी जमीन पाहण्याकरता कोणी चांगला व्यक्ती इस्टेट एजंट आहे का याबाबत विचारणा केली होती. त्यावेळी विशाल सिन्हा यांनी ते राहत असलेली जागा त्यांच्या ओळखीच्या इस्टेट एजंट विक्रमदेव मल्होत्रा यांच्या मार्फत घेतली असल्याचं सांगितलं. तसेच मल्होत्रा गोव्यात जमीन खरेदी संदर्भात इस्टेट एजंटचा व्यवसाय करत असल्याची माहिती, विशाल सेना यांनी तक्रारदार जेना यांना दिली. त्यानंतर नोव्हेंबर 2020 मध्ये विशाल सिन्हा यांनी एका फिल्म शूटिंगच्या दरम्यान तक्रारदार जेना यांची ओळख इस्टेट एजंट मल्होत्रा यांच्याशी करून दिली. त्यानंतर विक्रमदेव मल्होत्रा आणि त्यांची पत्नी रितू विक्रमदेव मल्होत्रा हे तक्रारदार जेना यांच्या कोरेगाव पासून इथल्या राहत्या घरी आले आणि त्यांनी रिअल इस्टेट एजंट व्यवसायकरता http://ritsproperty.co हि वेबसाईट असून ते रिट्सप्रॉपर्टी या नावाने गोव्यामध्ये फ्लॅट आणि जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारांमध्ये स्टेट एजंट म्हणून काम करत असल्याचं सांगितलं.

भूखंडाची किंमत 84 लाख : रिट्सप्रॉपर्टी या वेबसाईटवर तीन-चार ओपन प्लॉट असलेल्या जमिनीचे फोटो जेना यांना दाखवले गेले. तसेच यावेळी मल्होत्रा यांनी तक्रारदार यांना जमीन खरेदी व्यवहारात दलाल म्हणून संपूर्ण कामकाज पूर्ण करून करून देऊ असं आश्वासन दिलं. तसेच गोव्यातील मोकळे प्लॉट पाहण्यासाठी तक्रारदार जेना हे डिसेंबर 2020 च्या पहिल्या आठवड्यात गोव्याला गेले होते. त्यावेळी मल्होत्रा यांनी गोव्यातील एकूण चार रिकामे भूखंड तक्रारदार देना यांना दाखवले होते. त्यापैकी नॉर्थ गोव्यातील रोड्रीगुएस वाडडो येथील भूखंड तक्रारदार जेना यांना आवडला आणि त्या भूखंडाची किंमत 84 लाख असल्याचे मल्होत्रा यांनी तक्रारदार यांना सांगितलं.

पाच लाख रुपयांचा दिला चेक : या भूखंडाच्या खरेदी-विक्रीबाबत कोणाच्या हरकत आहे काय, याबाबत वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्याच्या कामकाजासाठी लागणारा 25 हजार रुपयांचा खर्च देखील तक्रारदार यांनी विक्रमदेव मल्होत्रा यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केला. वर्तमानपत्रात जागेबाबत माहिती प्रसिद्ध झाल्यानंतर 45 दिवस संपल्यानंतर काय झाले ते संपर्क साधून तक्रारदार जेना यांना कोणाचीही हरकत नसल्याचं कळवलं. त्यानंतर 14 फेब्रुवारी 2021 रोजी मुंबईत मल्होत्रा दांपत्य तक्रारदार यांच्या गोरेगाव येथील राहत्या घरी आले. त्यावेळी मल्होत्रा यांनी सांगितल्याप्रमाणे जमीन खरेदी व्यवहारात टोकन म्हणून पाच लाख रुपयांचा चेक जमिनीचे मालक मारिया फर्नांडिस यांच्या नावे आणि पाच लाखांचा चेक रॅस्टन पिंटो यांच्या नावे लिहून ते दोन्ही चेक मल्होत्रा यांच्या स्वाधीन तक्रारदार यांनी केले.

भविष्यात जमिनीची किंमत तिप्पट : मार्च 2021 मध्ये कोविड महामारीच्या कारणाने सर्व व्यवसाय बंद झाले होते. दरम्यान विक्रम देवदर्शन मल्होत्रा यांनी सतत फोन करून गोवा येथील त्यांच्या ओळखीचे रहिवाशी लीना मांढरेकर (वय 40), प्रमोद मांढरेकर (वय 45), लिओ डायस, रश्मी चोडणकर, ज्यूडी सॅली गोम्स (वय 38), साईनाथ पाटेकर (वय 35) हे सर्व राहणारे गोव्याचे असून त्यांच्या जमिनीच्या शेजारी स्वतःच्या मालकीचे मोकळे प्लॉट असल्याचं सांगून त्याचे सातबारा उतारे आणि प्रॉपर्टी कार्ड हे तक्रारदार यांच्या मोबाईलवर पाठवले आणि जमिनीचे मालक हे त्यांच्या मालकीचे मोकळी प्लॉट असलेल्या जमिनी पैशाच्या अडचणीमुळं कमी किंमतीत विकत असल्याचं आमिष दाखवून आणि सतत आग्रह मल्होत्रा हा तक्रारदार यांना करत होता. भविष्यात या जमिनीची किंमत तिप्पट होईल असं आश्वासन देखील मल्होत्रा यांनी तक्रारदार यांना दिले होते. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदार यांनी मोबाईलवर दाखवलेल्या गोव्यातील चार जमीन खरेदी करणार असल्याचे मल्होत्रा यांना सांगितलं. दरम्यान तक्रारदार यांनी चार जमीन मालकांना त्यांच्या जमिनीच्या रकमेपैकी काही रक्कम बँक ट्रान्सफर द्वारे तसेच उर्वरित रक्कम रोख पद्धतीने दिले.

अशी झाली फसवणूक : कोविडमुळं सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळं आणि प्रत्यक्ष गोवा येथे जाणे शक्य नसल्यानं तक्रारदार यांनी गोव्यातील चार जमिनी खरेदी व्यवहारात एकूण 48 लाख 50 हजार इतकी रक्कम दिली. तसेच मल्होत्रा यांच्या बँक खात्यात 91 लाख रुपये जेना यांनी पाठवले. त्याचप्रमाणे तक्रारदार जेना यांचा मुलगा अगस्त्या याच्या बँक खात्यातील साडेसात लाख विक्रमदेव मल्होत्रा यांच्या नावाने आरटीजीएस द्वारे पाठवले होते. मात्र तक्रारदार यांच्या मुलाच्या शिक्षणाकरता ठेवलेले पैसे असल्यानं ते परत मिळण्यासाठी मल्होत्रा यांच्याकडं पाठपुरावा केला होता. त्यामुळं 31 डिसेंबर 2022 रोजी मल्होत्रा याने तक्रारदार यांच्या मुलाच्या नावाने असलेल्या बँक खात्यात साडेसात लाख रुपये परत पाठवले. मात्र, उर्वरित रक्कम मागितली असता मला मल्होत्रा याने उडवा उडवीची उत्तरे तक्रारदार याला दिली होती. गेली दोन वर्ष मल्होत्रा दांपत्य हे गोव्यातील जमिनी तक्रारदार यांच्या नावावर करत नसल्यानं वारंवार त्यांनी पैसे परत मिळण्याबाबत विचारणा केली होती. दरम्यान 16 जुलै 2013 रोजी विक्रमदेव मल्होत्रा यांनी दिलेला चेक तक्रारदार जेना याने बँकेत जमा केला असता तो मला तर याचा अकाउंट ब्लॉक असल्यानं वटला नाही. अशा प्रकारे तक्रारदार सिदार्थ जेना यांची फसवणूक झाल्यानं त्यांनी बांगूर नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा -

  1. नोकरीच्या शोधात मुंबईत आलेल्या तरुणीवर कारमध्ये बलात्कार, मारहाणही केल्याचा पीडितेचा आरोप - Mumbai Crime
  2. कॅफे म्हैसूरच्या मालकाला 'खाकी'चा धाक दाखवून लुटलं, निवृत्त पोलिसही कटात सामील; नेमकं काय घडलं? - Mumbai Crime
  3. मुंबईत पाच कोटींच्या खंडणीसाठी व्यावसायिकाचे भर रस्त्यातून अपहरण; तिघांना अटक - Mumbai

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.