ETV Bharat / state

अल्पवयीन मुलासोबत 65 वर्षीय व्यक्तीचं गैरवर्तन, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Mumbai Crime News : मुंबईत कुलाबा परिसरात एका हॉटेलमध्ये थांबलेल्या सायकलस्वार अल्पवयीन मुलासोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आलाय. येथील हॉटेलमध्ये 65 वर्षीय एका व्यक्तीने अल्पवयीन मुलाशी मध्यरात्री गैरवर्तन केलं. त्या घटनेत गुन्हा नोंद झाला असून, आरोपीला कुलाबा पोलिसांनी अटक केली आहे.

फाईल फोटो
फाईल फोटो
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 2, 2024, 7:00 AM IST

मुंबई Mumbai Crime News : अल्पवयीन मुलासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी 65 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. पीडित मुलगा सायकलस्वार असून, सायकलिंग कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्याला मुंबईहून गोव्याला जायचं होतं. त्यादरम्यान ही घटना घडली आहे. या प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वडिलांना दिली घटनेची सविस्तर माहिती : पुण्यातील काही मुलांचा सायकलिंग ग्रुप मुंबईत आला होता. ते सर्वजण कुलाब्यातील एका हॉटेलमध्ये थांबले होते. त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी गोव्याला निघायचं होते. त्या रात्री पीडित मुलगा आपल्या खोलीत झोपला होता. तेव्हा एका 65 वर्षीय व्यक्तीने त्याच्या खोलीची बेल वाजवली. त्यानंतर त्याने दरवाजा उघडला तेव्हा त्या व्यक्तीने त्या ''अल्पवयीन मुलाच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केला''. त्या व्यक्तीच्या या कृत्यानं तो मुलगा चांगलाच घाबरला होता. पण, सकाळी त्याला ठरल्याप्रमाणे गोव्याला जावं लागलं. गोव्यात पोहोचल्यावर पीडित मुलाने आपल्या वडिलांना या घटनेची सविस्तर माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पीडित मुलाच्या वडिलांनी गोवा पोलिसांकडे घडल्या प्रकाराची तक्रार केली.

ही घटना 21 जानेवारी रोजी घडली आहे. पीडित मुलगा आणि त्याच्यासोबत आलेली सर्व सायकलस्वार मुले होते. हे सर्वजण मुंबईहून गोव्याला सायकलने गेले. त्यानंतर या घटनेचा उलगाडा झाला. पुढे मुलाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर केलं. त्यानंतर न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. - पोलीस अधिकारी

न्यायालयीन कोठडी सुनावली : गोवा पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवून कुलाबा पोलिसांकडे वर्ग केला. त्यानंतर कुलाबा पोलिसांनी या प्रकरणी तपास करून, त्या व्यक्तीला पोलीस ठाण्यात बोलावलं. या प्रकरणात पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

हेही वाचा :

1 लग्नाचं आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; भाजपाच्या माजी नगरसेवकावर बलात्कारासह फसवणुकीचा गुन्हा

2 खोड्या काढत असल्यानं बापानं मुलाला पाजलं विष, आरोपीला न्यायालयानं दिली 14 दिवसांची कोठडी

3 जगात भारी कोल्हापुरी! एकीकडं देशात प्रार्थानास्थळावरुन वाद सुरु असताना कोल्हापुरकरांनी देशासमोर घालून दिला नवा आदर्श

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.