मिरज (सांगली) Old Woman Dies Case Miraj : मृत्यू कोणाला कुठे गाठेल याचा नेम नाही. पेन्शनधारक नागरिकांसोबत अनेकदा असे घडते की, ते पेन्शन काढायला बॅंकेत गेले आणि तेथेच त्यांचा मृत्यू झाला किंवा वयाचा दाखला काढण्यासाठी अथवा हयात असल्याचा दाखला काढण्यासाठी ते शासकीय कार्यालयात गेले आणि तेथे त्यांना मृत्यूने गाठले. असाच प्रसंग मिरज येथील सखुबाई बनसोडे नावाच्या 83 वर्षीय वृद्ध महिलेसोबत घडला. त्या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी होत्या. हयात असल्याचा दाखला घेण्यासाठी त्या मिरज तहसील कार्यालयात गेल्या. तेथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. अखेर त्यांचा तिथेच मृत्यू झाला.
उपचारापूर्वीच झाला मृत्यू : सखुबाई बनसोडे (वय 83, राहणार किल्ला भाग, मिरज) असं या वृद्ध महिलेचं नाव आहे. सखुबाई बनसोडे या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी आहेत. या योजनेचे पेन्शनचे पैसे मिळावे यासाठी त्यांना संबंधित विभागाकडे हयातीच्या दाखल्याचा पुरावा सादर करावा लागणार होता. हा दाखला मिळवण्यासाठी, त्या सकाळी मिरजेच्या तहसील कार्यालयामध्ये गेल्या असता त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यावेळी उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं; मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचा डॉक्टरांकडून स्पष्ट करण्यात आलं.
हयातीच्या दाखल्याची सक्ती काढावी :या घटनेनंतर सामाजिक संघटनांकडून शासनाचा निषेध नोंदविण्यात आला आहे. याबाबत पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष महिंद्र गाडी म्हणाले, वृद्ध महिलांना जर शासनाच्या पेन्शनसाठी वारंवार हयातीचा दाखला सादर करण्यासाठी कार्यालयांच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. अनेक वेळा त्यांना हेलपाटे मारून देखील हयातीचे दाखले वेळेत मिळत नाहीत. त्यामुळे शासनाच्या जाचक धोरणामुळे सखुबाई बनसोडे यांच्यासारख्या महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सरकारने पेन्शन देताना हयातीच्या दाखल्यासाठी असणारी सक्ती काढून टाकावी, संबंधितांनी याबाबतच्या नोंदी स्वतः करुन घ्याव्यात अशी मागणी गाडे यांनी केली आहे.
हेही वाचा :
- डॉक्टर, पोलिसानंतर आता बालहक्क न्याय मंडळातील सदस्यही चौकशीच्या फेऱ्यात, काय आहे कारण? - Pune car accident case
- 31 मे पर्यंत पॅनकार्ड आधार लिंक करा.. अन्यथा होईल कारवाई - AADHAR PAN CARD
- ''मोदींचा पराभव व्हावा ही प्रत्येक पाकिस्तानीची इच्छा...''; पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांनी राहुल गांधींबाबत काय म्हटलं? - Lok Sabha Elections 2024