मुंबई Mumbai Cyber Fraud : मुंबई गुन्हे शाखेच्या मध्य प्रादेशिक सायबर पोलिसांनी 71 वर्षीय व्यक्तीची सायबर फसवणूक केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली. या आरोपीने ज्येष्ठ नागरिकांची 1.92 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. शेअर बाजारातील (stock market) गुंतवणुकीतून नफा दुप्पट करण्याचे आश्वासन देऊन आरोपीने ज्येष्ठ नागरिकाला आमिष दाखवले. अटक केलेल्या आरोपीचे नाव सुरेंद्र सुर्वे (वय 51) असून तो पेशाने चित्रकार असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
सोशल मीडिया मिळाली लिंक : सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ नागरिक महिला वरळी परिसरात राहणारी सेवा निवृत्त व्यक्ती आहे. तिला एक सोशल मीडिया लिंक मिळाली. या लिकांद्वारे आश्वासन दिले होते की, शेअर बाजारातील गुंतवणुकीद्वारे भरीव नफा मिळू शकतो. लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडण्यात आले. जेथे सदस्यांनी त्यांच्या शेअर बाजारातील नफ्यावर चर्चा केली.
1 कोटी 92 लाख रुपये गुंतवले : ग्रुपच्या यशोगाथा पाहून पीडित महिलेने गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ग्रुप ॲडमिनशी संवाद साधला, ज्याने तिला ॲपद्वारे संस्थात्मक (इन्स्टीट्युशनल) खाते आणि नंतर आभासी (व्हर्च्युअल) खाते उघडण्याची सूचना दिली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, पीडित महिलेने 1 कोटी 92 लाख रुपये अनेक इन्स्टॉलमेन्ट गुंतवले. त्यानंतर आरोपीने त्यांना आणखी 2 कोटी रुपये गुंतवण्यास सांगितलं. आर्थिक अडचणीचं कारण देत ज्येष्ठ नागरिक असलेल्या महिलेने नकार दिल्यावर आरोपीने ५० टक्के सूट देऊ केली. त्यामुळं महिलेच्या मनात संशयाची पाल चुकचुकली.
14 जूनपर्यंत पोलिस कोठडी : सुरुवातीला, पीडित महिलेला सांगितलं होतं की, तो कर्म कॅपिटल शेअर ट्रेडिंग लिमिटेड नावाच्या कंपनीद्वारे गुंतवणूक करत आहे. तथापि, कंपनीच्या कार्यालयात गेल्यावर त्यांना समजलं की, गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यासाठी कंपनीच्या नावावर एक फसवे खाते तयार केले गेले आहे. नंतर या फसवणुकीची तक्रार वरळी येथील मध्य प्रादेशिक सायबर पोलिसांना देण्यात आली. तपासादरम्यान घाटकोपर येथील सुरेंद्र सुर्वे (वय 51) याला अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितलं की, पीडित महिलेच्या बँक खात्यातून अंदाजे 70 लाख रुपये आरोपीच्या बँक खात्यात आणि नंतर दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात हस्तांतरित केलं गेलं. पेशाने चित्रकार असलेल्या सुर्वेला 14 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर झटपट नफ्याचे आश्वासनाला न भुलण्याचं जनतेला आवाहन केलं आहे आणि अपरिचित लिंकवर क्लिक न करण्याचा सल्ला दिला आहे.
हेही वाचा -