मुंबई Central Railway Block Ends : ठाणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक पाचची रुंदी आणि सीएसएमटी स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दहा-अकराची लांबी वाढविण्याचं काम वेळेपूर्वीच मध्य रेल्वेनं पूर्ण केलंय. त्यामुळं आता ठाणे स्थानकाच्या प्लँटफॉर्म क्रमांक पाच-सहावरील आणखी प्रवासी सामावून घेण्याची क्षमता तर वाढेलच यासोबतच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यास रेल्वेला मदत होणार आहे. सीएसएमटी स्थानकांवरील प्लॅटरफॉर्म क्रमांक दहा-अकराचे लांबी ६९० मिनिटपर्यत वाढविल्यानं आता २४ डब्याचा मेल-एक्सप्रेस गाड्या मध्य रेल्वेला चालविणं शक्य होणार आहे. या कामांसाठी मध्य रेल्वेनं तीन दिवसांचा विशेष मेगाब्लॉक घेतला होता. तर, अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. काही गाड्या अन्य स्थानकांवर वळवण्यात आल्या होत्या.
गर्दी कमी होण्यास मदत : सतत वाढत्या गर्दीमुळं ठाणे स्थानकांत प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना गेल्या काही वर्षांपासून करावा लागत आहे. त्यावर मात करण्यासाठी मध्य रेल्वेने यापूर्वी विविध उपाययोजना केल्या आहेत. ठाणे स्थानकाच्या फलाट क्रमांक पाच आणि सहावरून दररोज अप-डाऊन दिशेने २५० ते ३०० मेल-एक्स्प्रेस जातात. बहुतांश गाड्या याच फलाटावर थांबतात. त्यामुळं ठाणे स्थानकांवर लांब पल्ल्याच्या प्रवासी आणि उपनगरीय लोकल प्रवाशांची गर्दी होते. त्यामुळं ही गर्दी विभागण्यासाठी मध्य रेल्वेने गेल्यावर्षी अनेक मेल-एक्सप्रेस रेल्वे गाड्या ठाणे स्थानकांच्या फलाट क्रमांक सात ते आठवर थांबवण्याची सुरुवात केली होती. तरीही ठाणे स्थानकाच्या फलाट पाच ते सहावरील गर्दी कमी होण्यास मदत झाली आहे.
६३ तासांचा ब्लॉक : परंतु, मध्य रेल्वेला पूर्णपणे गर्दीवर नियंत्रण मिळवणं शक्य झालं नव्हतं. त्यामुळं मध्य रेल्वेने ठाणे स्थानकावरील फलाट क्रमांक पाच रुंदी दोन ते तीन मीटर वाढविण्याचं नियोजन केलं होतं. त्यानुसार शुक्रवारी मध्य रात्री १२.३० ते रविवारी २ जून दुपारी ३.३० वाजेपर्यंत असे ६३ तासांचा ब्लॉक घेऊन रुंदी वाढविण्याचं काम मध्य रेल्वेनं केलंय. मात्र, नियोजित वेळेच्यापूर्वी मध्य रेल्वेने फलाट क्रमांक पाच रुंदी वाढण्याचं काम केल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिलीय.
प्लॅटफॉर्मवर प्रवासी सामावून घेण्याची क्षमता वाढणार : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागानं दिलेल्या माहितीनुसार, ठाणे स्थानकांवरील प्लँटफॉर्म क्रमांक पाचची रुंदी वाढविल्यानं प्लॅटफॉर्मवर प्रवासी सामावून घेण्याची क्षमता वाढणार आहेत. तसेच सरकते जिने आणि प्लॅटफॉर्मवर जिन्याची रुंदी वाढविणं शक्य होणार आहे. त्यामुळं स्थानकांवर प्रवाशांना गर्दीतून सुटका मिळणार आहे. तर, सीएसएमटी स्थानकांवरील प्लॅटरफॉर्म क्रमांक दहा-अकराची लांबी ३८५ मीटर वाढविण्यात आलीय. त्यामुळं आता प्लॅटरफॉर्म क्रमांक दहा-अकराची लांबी ६९० मीटरपर्यंत वाढवली आहे. त्यामुळं सदर प्लॅटरफॉर्मवरून २४ डब्याचा मेल-एक्सप्रेस गाड्या चालविणं शक्य झालं आहे. तसेच रेल्वे डब्बे वाढल्यानं प्रवासी वाहन क्षमता २० टक्यांनी वाढली आहे.
प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरण : रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून दररोज अंदाजे ९० लांब पल्याच्या गाड्या चालविण्यात येतात. १०, ११ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्म वरुन १३ डब्यांच्या तर १२ आणि १३ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवरुन १७ डब्यांच्या गाड्या धावतात. तर १४ ते १८ क्रमांकावरुन २४ डब्यांच्या मेल-एक्सप्रेस धावतात. १० ते १३ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवरुन २४ डब्यांच्या गाड्या चालविण्याचं रेल्वेनं प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरण करण्याचं काम हाती घेतलं आहे. त्यानुसार सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दहा-अकराची लांबी ३८५ मीटर वाढविण्याचं काम पूर्ण झालंय.
हेही वाचा -