मुंबई Mumbai Mega Block : मुंबईत मध्य रेल्वेवर सलग तीन दिवस जंबो मेगा ब्लॉक घेण्यात आलाय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 24 डब्यांच्या प्लॅटफॉर्मचं काम करण्यात येत आहे. तर ठाणे येथेही प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरण आणि रुंदीकरणाचं काम सुरूय. त्यामुळं सलग तीन दिवस जम्बो मेगा ब्लॉकमुळं मुंबईकरांचे हाल होत आहेत. आज सलग दुसऱ्या दिवशी मेगा ब्लॉकमुळं अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
आज किती गाड्या रद्द? : आज मेगा ब्लॉकचा दुसरा दिवस आहे. आज दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वेवरील तब्बल 534 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच फास्ट ट्रॅकवरील लोकल सेवा स्लो ट्रॅकवरती वळवण्यात आल्या आहेत. त्यामुळं जिथं प्रवासाला एक तासाचा वेळ लागतो, तिथे दोन ते तीन तास वेळ लागत आहे. तसंच आज मध्य रेल्वेच्या भायखळा रेल्वे स्थानकपर्यंतच रेल्वे सेवा सुरू राहणार आहे. तर हार्बर मार्गावरती वडाळापर्यंतच रेल्वे सेवा सुरू असणार आहे. तिथून पुढं रेल्वे प्रवास करता येणार नाहीय. तसंच ज्या वातानुकूलित रेल्वे आहेत, त्यातून रेल्वे प्रवाशांना आपल्या रोजच्या तिकीट आणि पासेसवरती प्रवास करता येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिलीय.
नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल : शुक्रवारी मेगा ब्लॉकमुळं अनेक मुंबईकरांचे हाल झाले. रेल्वेनं प्रवास करता आला नसल्यामुळं त्यांनी पर्यायी व्यवस्थेला प्राधान्य दिलं. खासगी बस, रिक्षा आणि टॅक्सी यातून मुंबईकरांनी प्रवास केला. यामुळं शुक्रवारी वाहतूक कोंडी सुद्धा झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं आज अनेक मुंबईकरांनी घराबाहेर न पडण्याचं पसंत केलय. बाहेर जाऊन अडकून राहण्यापेक्षा आणि तासंतास गर्दीतून प्रवास करण्यापेक्षा आज अनेकांनी सुट्टी घेतलीय. तर काहींना वर्क फॉर्मची सुविधा देण्यात आलीय. उद्या रविवार असून उद्या देखील शेवटच्या दिवशी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. परंतु या मेगा ब्लॉकमुळं मुंबईकरांचे मेगा हाल होत आहेत, असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाहीय.
हेही वाचा
- "मराठवाड्यात दाहक दुष्काळ", नाना पटोलेंचा शेतकरी आत्महत्यांवरुन सरकारवर हल्लाबोल - Nana Patole
- मोठी बातमी! पुणे हिट अँड रन प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आईलाही अटक - Pune Porsche accident case
- मुंबईत अग्नितांडव! ताडदेव परिसरातील गोदामाला भीषण आग - Mumbai Fire
- अहिल्यादेवी होळकर यांनी 300 वर्षांपूर्वी तयार केलेले जलस्रोत आजही जिवंत - Ahilyadevi Holkar