मुंबई Haj Yatra 2024 : लियाकत अली अफाकी यांनी विमानतळावर जाण्यापूर्वी हज हाऊस येथे या यात्रेकरुंना हिरवा झेंडा दाखवला. यात्रेकरूंना पूर्ण हज यात्रा होण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा पुरवण्यात आल्याची माहिती अफाकी यांनी दिलीय. यात्रेकरुंसाठी 'हज ॲप' देखील तयार करण्यात आला असून त्यामध्ये सर्व तपशील उपलब्ध आहेत. हजसाठीची मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमांची माहिती आणि इतर आवश्यक माहिती या ॲपमध्ये देण्यात आलीय.
महाराष्ट्रातून 35 हजार यात्रेकरु जाणार हजला : हज यात्रेला जाण्यासाठी देशभरातील 20 एम्बार्केशन पॉईंटद्वारे यात्रेकरु हजला जात आहेत. हज यात्रेकरुंना सौदी अरेबियाकडे घेऊन निघालेल्या पहिल्या विमानाच्या माध्यमातून यात्रेकरु सौदीमध्ये पोचले. यात्रेकरुंना घेऊन जाणारे शेवटचे विमान मुंबईतून 9 जून रोजी उडणार आहे. यंदा हज यात्रेसाठी देशाला 1 लाख 75 हजार यात्रेकरुंसाठी कोटा मिळाला होता. त्यापैकी 1 लाख 40 हजार यात्रेकरु केंद्रीय हज समितीच्या माध्यमातून जात आहेत, तर उर्वरीत यात्रेकरु खासगी ऑपरेटरच्या माध्यमातून जात आहेत. महाराष्ट्रातून सुमारे 35 हजार यात्रेकरु हजला जात आहेत.
महिलांसाठी 500 चा कोटा राखीव : 20 एम्बार्केशन पॉइंटमध्ये मुंबई, दिल्ली, लखनऊ, अहमदाबाद, हैद्राबाद, बंगळुरु, इंदूर, भोपाळ, गोवा, कोलकाता, कोचिन, कालिकत, कन्नूर, जयपूर, नागपूर, गुवाहाटी, गया, विजयवाडा आणि इतर दोन ठिकाणांचा समावेश आहे. केंद्रीय हज समितीचे अधीक्षक शेख हैदर पाशा यांनी याबाबत माहिती दिली. मेहरम गटातील महिलांसाठी 500 चा राखीव कोटा यंदाच्या हज यात्रेसाठी मेहरम गटासाठी 500 महिलांना कोटा राखीव ठेवण्यात आला होता. ज्या महिलांनी हजसाठी अर्ज केला नव्हता मात्र, त्यांचे पिता, मुलगा, भाऊ आणि पती अशा मेहरम असलेल्या व्यक्तींनी अर्ज केले त्यांच्यासाठी 500 कोटा राखीव ठेवण्यात आला होता.
हेही वाचा -
High Court Orders : हज यात्रेकरुंना विमान भाडे किती ते आधी सांगा, उच्च न्यायालयाचे आदेश
Hajj journey : हज यात्रेकरुंचा कोटा, प्रवासखर्च पूर्ववत करा - नसीम खान