ETV Bharat / state

सांगलीत भीषण अपघात; अंकली पुलावरुन कार कोसळली, तिघांचा मृत्यू - SANGLI ACCIDENT

लग्न सोहळ्याहून परतत असताना गाडी पुलावरुन नदीपात्रात कोसळल्यानं सांगलीत भीषण अपघात झालाय. यात पती पत्नीसह तिघांचा मृत्यू झालाय.

3 peoples died in accident, car fell down from bridge near ankali sangli
सांगली अपघात (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 28, 2024, 11:49 AM IST

Updated : Nov 28, 2024, 12:55 PM IST

सांगली : अंकली नजीकच्या कृष्णा नदी पुलावरुन चारचाकी गाडी नदीपात्रात कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याची भीषण घटना घडली आहे. तर या अपघातात तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. कोल्हापूर इथून लग्नकार्य आटपून सांगलीला परत येत असताना रात्री 1 च्या सुमारास हा अपघात घडला. भरधाव गाडीवरील ताबा सुटल्यानं हा अपघात घडला, अशी माहिती मिळाली आहे.

अपघातात तिघांचा मृत्यू : या अपघातातील मृत व्यक्तींमध्ये प्रसाद खेडेकर (वय 40), प्रेरणा प्रसाद खेडेकर (वय 35) आणि वैष्णवी संतोष नार्वेकर (वय 23) या तिघांचा समावेश आहे. तर साक्षी संतोष नार्वेकर (वय 42), वरद संतोष नार्वेकर (वय 21) आणि समरजित प्रसाद खेडेकर (वय 5) अशी जखमींची नावं आहेत. हे सर्वजण सांगलीतील आकाशवाणी येथील गंगाधर कॉलनीमध्ये राहणारे असून सर्व कुटुंब लग्नकार्यासाठी कोल्हापूर इथे गेले होते. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सदरचा अपघात कोल्हापूर जिल्ह्यातील उदगाव हद्दीत घडला असल्यानं याची नोंद उदगाव पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे. अपघातानंतर जखमींना सांगलीच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.

अंकली पुलावरुन भरधाव गाडी कोसळून तीन जण ठार (ETV Bharat Reporter)

लग्नकार्य आटपून परतताना अपघात : खेडकर आणि नार्वेकर कुटुंब एकाच गाडीतून आपल्या नातेवाईकांच्या लग्नकार्यासाठी कोल्हापूर इथे गेले होते. त्यानंतर रात्रीच्या सुमारास लग्नकार्य उरकून ते पुन्हा सांगलीकडं परतत असताना अंकली उदगाव येथे असणाऱ्या कृष्णा नदीवरील पुलाजवळ पोहोचताच गाडी चालवणारे प्रसाद खेडेकर यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि थेट गाडी सुमारे शंभर फूट खोल नदीपात्रात जाऊन कोसळली.

हेही वाचा -

  1. वऱ्हाडी डॉक्टरांवर काळाचा घाला; आग्रा लखनऊ एक्स्प्रेस वेवर भीषण कार अपघातात 5 ठार
  2. वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; चालकाला डुलकी लागल्यानं कार डिव्हायडरला धडकून चार ठार
  3. सहलीला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात; बसमधील अनेक विद्यार्थी जखमी

Last Updated : Nov 28, 2024, 12:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.