ETV Bharat / state

अत्याचाराच्या घटनेनं नागपूर हादरलं : सामोसे कारागीराचा दोन चिमुकल्यांवर तर बालकाचा चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार - Minor Girls Raped In Nagpur - MINOR GIRLS RAPED IN NAGPUR

Minor Girls Raped In Nagpur : तीन चिमुकल्यांवर अत्याचार झाल्यानं नागपूर शहराला चांगलाच हादरा बसला. समोसे कारागीरानं दोन चिमुकल्यांवर अत्याचार केल्यानं पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. तर दुसऱ्या घटनेत एका 15 वर्षीय नराधमानं एका चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला.

Minor Girls Raped In Nagpur
प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 30, 2024, 11:20 AM IST

नागपूर Minor Girls Raped In Nagpur : एकाच दिवशी तीन चिमुकल्यांवर अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्यानं नागपूर शहरात मोठी खळबळ उडाली. समोसे कारागीरानं दोन चिमुकल्यांवर अत्याचार केल्याची घटना बजाजनगर पोलीस ठाण्याच्या परिसरात उघडकीस आली. तर दुसऱ्या घटनेत 15 वर्षीय बालकानं चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्यानं नागपूर हादरलं आहे. या प्रकरणी समोसे कारागीराला अटक करण्यात आलं आहे. तर दुसऱ्या घटनेतील विधीसंघर्षग्रस्त बालकाला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे.

नऊ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार : पहिली घटना बजाजनगर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या काचीपुरा भागात घडली. काचीपुरा परिसरात घडलेल्या घटनेतील आरोपी दिनेश लिल्हारे (30) हा समोसे बनवण्याचं काम करतो. दुपारी दिनेशनं त्याच्या वस्तीत राहणाऱ्या एका नऊ वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याची घटना घडली. घटनेनंतर पीडित मुलीनं रडून आपल्या कुटुंबीयांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.

सात वर्षीय चिमुकली आली पुढं : नऊ वर्षीय पीडित मुलगी आई-बाबांना आपबिती सांगत होती, त्याचवेळी त्याच वस्तीत राहणाऱ्या 7 वर्षीय चिमुकली ही न धबरता पुढं आली. आरोपी दिनेशनं दोन दिवसांपूर्वी तिच्यासोबत सुद्धा तसेच लैंगिक छळाचे प्रकार केल्याची माहिती तिच्या आई वडिलांना दिली. त्यानंतर त्या वस्तीतील लोकांनी एकत्रित येऊन आरोपी दिनेश लिल्हारेच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी दिनेश लिल्हारेला अटक केली आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

मम्मी पप्पाला ठार मारण्याची धमकी : आरोपी दिनेश प्रताप लिल्हारे यानं अल्पवयीन मुलीला एका रुममध्ये अश्लिल कृत्य करताना पीडिता ओरडल्यानं आरोपीनं पीडितेला तुझ्या मम्मी आणि पप्पाला ठार मारीन आणि तुला खाऊ देणार नाही, अशी धमकी दिली. यावेळी कोनालाही काही न सांगण्यासाठी नराधमानं चिमुकलीला धमकावलं. याप्रकरणी तक्रारदारांनी बजाजनगर पोलीस ठाण्यामध्ये आरोपीविरूद्ध तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरुन नराधमाविरोधात कलम 376, 376 (2), 506 भादवि सहकलम 4, 8, 12 पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

15 वर्षीय बालकाचा चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार : दुसरी घटना ही बजाज नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दंतेश्र्वरी परिसरात घडलेली आहे. यामध्ये चार वर्षीय पीडित मुलीवर परिसरातच राहणाऱ्या 15 वर्षीय आरोपीनं अत्याचार केला. त्या चिमुकलीला खेळायला घेऊन जातो, असं सांगून आरोपींनं तिच्यावर शेजारच्या घरामध्ये लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीनं जेव्हा सर्व प्रकार घरच्यांना सांगितला, त्यानंतर आरोपीच्या विरोधात बजाज नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला ताब्यात घेऊन त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. या घटनेतील पीडित चिमुकलीची शारिरीक अवस्था सध्या बरी नाही, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. Nagpur Gang Rape: धक्कादायक! 15 वर्षीय तरुणीवर तब्बल सात नराधमांचा आळीपाळीनं सामूहिक बलात्कार; सर्व आरोपींना अटक
  2. Rape In Nagpur : गुंगीचे औषध देऊन बलात्कार; तोतया लष्करी अधिकाऱ्याचे पितळ उघडे
  3. Gang Rape In Nagpur District: अकरा वर्षीय मुलीवर आरोपींचा सामूहिक बलात्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.