ETV Bharat / state

बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार; नराधमांवर गुन्हा - Woman Gang Raped In Pune - WOMAN GANG RAPED IN PUNE

Woman Gang Raped In Pune : बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या विद्यार्थिनीवर तीन नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. या घटनेनं पुणं हादरलं आहे.

Woman Gang Raped In Pune
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 4, 2024, 10:28 AM IST

Updated : Oct 4, 2024, 11:04 AM IST

पुणे Woman Gang Raped In Pune : मित्रांसोबत फिरायला गेलेल्या विद्यार्थिनीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना पुण्याजवळील बोपदेव घाटात गुरुवारी रात्री घडली. पीडितेच्या मित्रानं तिला शुक्रवारी पहाटे रुग्णालयात दाखल केलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात 3 नराधमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नराधमांनी पीडित मुलीला आणि तिच्या मित्राला अगोदर काही काळ बांधून ठेवलं. त्यानंतर मुलाला मारहाण करुन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची माहिती सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी दिली.

बोपदेव घाटात महिलेवर सामूहिक बलात्कार : गेल्या काही महिन्यांपासून राज्यासह पुणे शहरात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुणे शहरात मागच्याच आठवड्यात एका महाविद्यालयीन तरुणीवर लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असताना आता पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या घाटामध्ये गँग रेप झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बोपदेव घाटामध्ये 21 वर्षे तरुणीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेनं पुणं हादरलं आहे. रात्रीच्या सुमारास मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेवर तिन जणांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना गुरुवारी रात्री घडली. या महिलेस पहाटे तिच्या मित्राने रुग्णालयात अ‍ॅडमीट केलं असून पीडित तरुणीवर उपचार सुरू आहे. यासंदर्भात पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशन इथं 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.

नराधमांनी अगोदर दोघांना बांधलं मग मुलीवर बलात्कार : "पीडित मुलगी आणि तिचा मित्र विद्यार्थी असून रात्री 11 च्या सुमारास कात्रज येथील बोपदेव घाटात फिरायला गेले होते. यावेळी तिघांनी मुलाला मारहाण करून दोघांनाही बांधलं. त्यानंतर मुलीवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेची मुलानं पीडितेच्या नातेवाईकांना माहिती दिली. पीडित मुलीला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच आम्ही तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. काही जणांच्या शोधासाठी पथक तयार करण्यात आली आहेत. पीडित मुलगी बाहेरची असून दोघंही विद्यार्थी आहेत," अशी माहिती पोलीस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी दिली.

हेही वाचा :

  1. पुणे : तरुणीवर बलात्कार करून खंडणी उकळली, दोघांना अटक
  2. Pune Rape Case : पुण्यात बांधकाम व्यावसियाकडून महिलेवर बलात्कार; गुन्हा दाखल
  3. जादूटोणा करून महिलेवर वारंवार बलात्कार; कोरेगाव भीमातील प्रकार

Last Updated : Oct 4, 2024, 11:04 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.