ETV Bharat / state

ठाणे नशेच्या विळख्यात! चार महिन्यात 'हिट अँड रन' चे 36 बळी, तर 159 गुन्हे दाखल - Thane Pune Hit And Run Cases - THANE PUNE HIT AND RUN CASES

Hit and Run Cases in Thane : पुण्यात एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या अल्पवयीन मुलानं भरधाव वेगात पोर्शे कार चालवत दोघांना चिरडल्याच्या घटनेनं सध्या सर्वत्र खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळं 'हिट अँड रन' च्या मुद्द्यानं पुन्हा एकदा डोकं वर काढल्याचं बघायला मिळतंय. तसंच नशेच्या अवस्थेत असे अपघात होत असल्याचं प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे.

Hit and Run Cases in Thane
ठाणे हिट अँड रन (Source ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 30, 2024, 12:15 PM IST

ठाणे Hit and Run Cases in Thane : पुण्यातील 'हिट अँड रन' प्रकरणानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना हॉटेल्स, पब आणि बारवर लक्ष ठेवत दारू पिऊन करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळं पुन्हा एकदा 'हिट अँड रन' चा मुद्दा चर्चेत आल्याचं बघायला मिळतंय. याच पार्श्वभूमीवर गेल्या चार महिन्यांमध्ये ठाण्यात घडलेल्या 'हिट अँड रन'च्या घटनांविषयी आपण जाणून घेऊया.

विनय राठोड डीसीपी वाहतूक शाखा (Source reporter)

ठाण्यामध्ये मागील चार महिन्यांत दारू पिऊन वाहन चालवून हिट अँड रन प्रकरणात 36 जणांचे बळी घेतल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. ठाणे वाहतूक पोलिसांकडं जानेवारी 2024 ते एप्रिल या चार महिन्यात हिट अँड रनचे तब्बल 159 गुन्हे दाखल झालेत. यात 36 जणांचा मृत्यू तर 106 जण कायमचे जायबंदी झाले आहेत. तसंच ठाणे हा नशेखोरांचा अड्डा बनला असून येऊर, हिरानंदानी मिडोज, उपवन, कोठारी कंपाऊंडमध्ये सुरू असलेल्या पब, हुक्का पार्लरमध्ये दररोज नशेचा बाजार भरत असल्यानं रात्री झिंगत निघालेले लोक निष्पापांचा बळी घेत आहेत.

ठाण्याच्या येऊर परिसर आणि खाडी किनाऱ्यावर सुरू असलेल्या बेकायदेशीर ढाब्यांवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर दारू पिणारेही दिसतात. याला आता ठाणे पोलिसांनी टार्गेट केल्याचं बघायला मिळतंय. पब, हुक्का पार्लरच्या संस्कृतीत नवीन पिढी करिअरचा ध्यास घेण्याऐवजी मौज, मज्जा, मस्तीमध्ये हरवत चालली असल्याचं भयानक वास्तव यानिमित्तानं समोर आल्याचं पाहायला मिळतंय. यासंदर्भात भाजपा आमदार संजय केळकर यांनी अनेकदा आवाज उठवला. तसंच याबाबत त्यांनी विधानसभेतही प्रश्न मांडले. तसंच ठाण्यात पबमुक्त ठाणे ही मोहीम देखील राबवण्यात आली होती. मात्र, पोलिसांचेच पब आणि हुक्का पार्लर चालकांशी लागेबांधे असल्यानं ही मोहीम 100% पूर्ण होऊ शकली नाही, असा आरोपही संजय केळकर यांनी केला होता.

हेही वाचा -

  1. पुणे हिट अँड रन प्रकरण: डॉ.अजय तावरे यांचं निलंबन नव्हे तर त्यांना फासावर लटकवा - विजय वडेट्टीवार - Pune Hit And Run Case
  2. पुणे हिट अँड रन प्रकरण: "आमदारकी कशी आणि कुठे वापरायची हे कळतं का?'...; अजित दादांनी 'त्या' आमदाराला झापलं... - Pune Hit And Run Case
  3. पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण ; अल्पवयीन आरोपीच्या वडिलांसह आजोबाला कोठडी, जाणून घ्या काय आहे अपघाताची ए टू झेड कहाणी - Pune Porsche Accident Case

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.