ठाणे Minor Rape Case Thane : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात अत्याचारासह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करत पोलिसांनी शेजारच्या तरुणाला गजाआड केले आहे. मुस्ताक अली असे अटक आरोपीचे नाव आहे.
ओळखीचा फायदा घेऊन गैरकृत्य : पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी डोंबिवली पूर्वेकडील सागर्ली गावाच्या हद्दीत असलेल्या एका सोसायटीत कुटुंबासह राहते. तर त्याच सोसायटीत आरोपी मुस्ताक हा दुसऱ्या मजल्यावर राहत असून तो लाईट फिटिंगचे काम करतो. त्यातच आरोपी आणि पीडित एकाच सोसायटीत राहत असल्याने दोघेही एकमेकांना ओळखीचे आहेत. याच ओळखीचा फायदा घेऊन आरोपी मुस्ताकने फेब्रुवारी २०२४ महिन्यात पीडित मुलीला बहाण्याने तो राहत असलेल्या दुसऱ्या मजल्यावरील घरात बोलावले. त्यानंतर दरवाजा बंद करून तिला आणि तिच्या घरच्यांना ठार मारेन अशी धमकी देत, तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला.
रुग्णालयात नेल्याने घटना उघडकीस : आरोपीच्या धमकीला घाबरून पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेल्या घटनेची कुठंही वाच्यत्या केली नाही; मात्र तिच्या पोटात गेल्या चार दिवसांपासून त्रास जाणवत असल्याने पीडितेला तिच्या आईनं नजीकच्या एका खासगी रुग्णालयात नेले. यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर येताच पीडितेच्या ३६ वर्षीय आईनं मानपाडा पोलीस ठाणे गाठत मुलीवर घडलेल्या प्रसंगाचे कथन केले. त्यानंतर पोलिसांनी आईच्या तक्रारीवरून शेजारी राहणारा आरोपी मुस्ताकवर भादंवि कलम ३७६, ३५४, ५०६ आणि पोक्सो कायदा कलम ६ प्रमाणे १० मे (शुक्रवारी) मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
आरोपीला पोलीस कोठडी : गुन्ह्याचे गांभीर्य पाहता पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन आज (११ मे रोजी) पहाटेच्या सुमारास ताब्यात घेऊन अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबने यांनी दिली. आज (शनिवारी) दुपारच्या सुमारास आरोपीला न्यायालयात हजर केलं असता, १५ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. या घटनेचा अधिक तपास मानपाडा पोलीस करीत आहेत.
हेही वाचा:
- अरविंद केजरीवाल यांच्या जामीनामुळं महाराष्ट्रातील विरोधी नेत्यांमध्ये उत्साह; मुंबईत होणार सभा - Lok Sabha Election 2024
- मणिपूरमधील 'शबरीं'चा अपमान झाला, तेव्हा पंतप्रधान चूप का, प्रियंका गांधींचा हल्लाबोल - Lok Sabha Election 2024
- "भाजपाला आता राज ठाकरेंची गरज भासली, इतके दिवस...."; रवींद्र धंगेकरांचा हल्लाबोल - Ravindra Dhangekar On Raj Thackeray