ETV Bharat / state

10 Lakh Cash Seized: लोकसभा निवडणूक जाहीर होताच सिंधुदुर्गमध्ये 10 लाखांची रोकड जप्त, पोलिसांचा तपास सुरू - Lok Sabha elections

10 Lakh Cash Seized : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर चार दिवसांतच सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली. पोलिसांनी एका चारचाकी वाहनातून 10 लाखांची रोकड जप्त केली आहे.

10 Lakh Cash Seized: लोकसभा निवडणूक जाहीर होताच सिंधुदुर्गमध्ये 10 लाखांची रोकड जप्त

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 20, 2024, 9:45 AM IST

सिंधुदुर्ग 10 Lakh Cash Seized : लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात फोंडाघाट चेक पोस्ट इथं स्थिर सर्वेक्षण पथकानं तपासणी चार चाकी गाडीतून दहा लाखांची रोख रक्कम जप्त केलीय. ही कारवाई मंगळवार 19 मार्च रोजी करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात सापडलेल्या या रकमेमुळं कणकवली तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडालीय.

चारचाकी कारमध्ये 10 लाखांची रोकड : सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच चेक नाक्यांवर एसएसटी पथक तैनात करण्यात आलं आहे. पोलीस आणि महसूल विभाग एकत्र मिळून हे पथक काम करते. या पथकाला फोंडाघाट चेक पोस्ट इथं कोल्हापूर वरुन गोव्याच्या दिशेनं जात असणाऱ्या चारचाकी कार मध्ये 10 लाखाची रोख रक्कम आढळून आलीय. ही रक्कम उपविभागीय अधिकारी पोलीस अधिकारी कणकवली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तडवी यांनी पुढील कार्यवाही करता एसएसटी पथक प्रमुख यांच्या ताब्यात दिलीय. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे पुढील कारवाई होणार आहे. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रक्कम सापडणारी ही पहिलीच कार्यवाई असल्यानं आता पोलीस यंत्रणेसह महसूल विभाग सतर्क झाल्याचं पाहायला मिळतंय.

भरारी पथकाची कारवाई : निवडणूक आयोगानं 16 मार्च रोजी लोकसभा निवडणूक जाहीर केली. त्यानंतर जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष भरारी पथकं तैनात केली आहेत. यात महसूल विभागासह पोलीस यंत्रणा व पंचायत समिती कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आलीय. 16 मार्च रोजी आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर चौथ्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या फोंडाघाट इथं दहा लाखांची रोकड एका गाडीत सापडवून आल्यानं जिल्ह्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. याबाबत कणकवली प्रांताधिकारी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पुढील कारवाई करत आहेत.

हेही वाचा :

  1. Bala Nandgaonkar : राज ठाकरे-अमित शाह यांच्यात काय झाली चर्चा? बाळा नांदगावकरांनी केला खुलासा
  2. Pawar election symbol tussle : अजित पवार यांना घड्याळ चिन्ह वापरण्यास कोर्टाची सशर्त परवानगी; शरद पवारांना 'तुतारीवाला माणूस' बहाल
  3. Lok Sabha Elections : भाजपाकडून आचारसंहितेचं सर्रास उल्लंघन; कारवाई न झाल्यास हाताचा पंजा देणार भेट, काँग्रेसचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.