ETV Bharat / sports

जैस्वालचं 'यशस्वी' द्विशतक; जागतिक विक्रमाची बरोबरी करत मोडले अनेक विक्रम - यशस्वी जैस्वाल

Yashasvi Jaiwal Double Century : भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने इंग्लंडविरुद्धच्या राजकोट कसोटी सामन्यात जबरदस्त फलंदाजी करत सलग दुसरं द्विशतक केलंय. त्यानं या खेळीत अनेक विक्रम मोडले आहेत.

Yashasvi Jaiwal Double Century
Yashasvi Jaiwal Double Century
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 18, 2024, 2:10 PM IST

राजकोट Yashasvi Jaiwal Double Century : भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालनं राजकोट इथं सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीत दुसऱ्या डावात नाबाद द्विशती खेळी करत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. त्याचं हे सलग दुसऱ्या कसोटीत द्विशतक आहे. कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा जागतिक विक्रमाची बरोबरी केलीय. त्यानं पाकिस्तानच्या वसीम अक्रमच्या 28 वेर्ष जुन्या विक्रमाची बरोबरी केलीय. भारतीय संघाकडून एका डावात सर्वाधिक षटाकर मारण्याचा विक्रम यापुर्वी नवज्योत सिंग सिद्धू आणि मयंक अग्रवाल यांच्या नावावर होता. हा विक्रमही जैस्वालनं मोडलाय. त्यानं आपल्या विक्रमी द्विशतकी खेळीत एका डावात 12 षटकार मारले असून तो अद्यापही नाबाद आहे. यापुर्वी नवज्योत सिंग सिद्धू आणि मयंक अग्रवाल यांच्या नावावर प्रत्येकी 8 षटकार मारण्याचा विक्रम होता.

कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज :

  • यशस्वी जैस्वाल (भारत) 12 षटकार विरुद्ध इंग्लंड 2024
  • वसीम अक्रम (पाकिस्तान) 12 षटकार विरुद्ध झिम्बॉब्वे 1996
  • मॅथ्यू हेडन (ऑस्ट्रेलिया) 11 षटकार विरुद्ध झिम्बॉब्वे 2003
  • नाथन एसले (न्युझीलंड) 11 षटकार विरुद्ध इंग्लंड 2002
  • ब्रॅंडन मॅक्युलम (न्युझीलंड) 11 षटकार विरुद्ध पाकिस्तान 2014
  • ब्रॅंडन मॅक्युलम (न्युझीलंड) 11 षटकार विरुद्ध श्रीलंका 2014
  • बेन स्टोक्स (इंग्लंड) 11 षटकार विरुद्ध दक्षिण आफ्रिका 2016
  • कुशल मेंडिस (श्रीलंका) 11 षटकार विरुद्ध आर्यलंड 2023

मालिकेत जैस्वालचा बोलबाला : यापुर्वी 1994 मध्ये लखनऊमध्ये श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात सिद्धूनं 8 षटकार ठोकले होते. यानंतर मयंक अग्रवालनं 2019 मध्ये इंदूरमध्ये बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटीत एका डावात फलंदाजी करताना 8 षटकार ठोकले होते. इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेत जैस्वालने या मालिकेत 20 हून अधिक षटकार मारले असून, यासह तो कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाजही बनला असून या मालिकेत अद्याप दोन सामने शिल्लक आहेत.

दुसऱ्या डावात विक्रमी द्विशतक : यशस्वी जैस्वालनं तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात द्विशतक झळकावत इतिहास रचलाय. त्यानं आपल्या खेळीत अनेक विक्रम मोडले आहेत. त्यानं इंग्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करत षटकारांची आतषबाजी केलीय. त्यासोबतच पदार्पणाची कसोटी खेळणाऱ्या सरफराज खाननही आक्रमक खेळी केलीय.

सलग दोन द्विशतक झळकावणारा तिसरा खेळाडू : यशस्वी जैस्वालनं कसोटीत सलग दुसरं द्विशतक झळकावलंय. यासह तो सलग दुसरं द्विशतक झळकावणारा भारताचा तिसरा खेळाडू बनलाय. यापुर्वी भारताकडून विनोद कांबळीनं 1992/93 च्या दरम्यान इंग्लंडविरुद्ध तर विराट कोहलीनं 2017/18 च्या दरम्यान श्रीलंकेविरुद्ध सलग दोन कसोटीत द्विशतकं झळकावली आहेत.

  • यासह जैस्वाल भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या डावात द्विशतक झळकावणारा सतावा खेळाडू बनलाय.

दुसऱ्या डावात द्विशतक करणारे भारतीय फलंदाज :

  • एम पतौडी 203* धावा, विरुद्ध इंग्लंड, 1964
  • डी. सरदेसाई 200* धावा विरुद्ध वेस्ट इंडिज 1965
  • सुनील गावसकर 220 धावा विरुद्ध वेस्ट इंडिज 1971
  • सुनील गावसकर 221 धावा विरुद्ध इंग्लंड 1979
  • व्हीव्हीएस लक्ष्मण 281 धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया 2001
  • वसीम जाफर 212 धावा विरुद्ध वेस्ट इंडिज 2006
  • यशस्वी जैस्वाल 214* धावा विरुद्ध इंग्लंड 2024

हेही वाचा :

  1. आयपीएलपूर्वीच 'मुंबई'ची हवा; दुबईत 'दुबई'ला हरवत जिंकली 'ही' लीग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.