बार्बाडोस West Indies Fielded 10 Players : इंग्लंड आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघ यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात एक विचित्र घटना पाहायला मिळाली. ब्रिजटाऊनमध्ये झालेल्या या मॅचमध्ये वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफनं लाइव्ह मॅचदरम्यान फील्ड सेटिंगवरुन कर्णधार शाय होपशी भांडण केलं आणि मैदान सोडलं. त्याच्या अचानक बाहेर पडल्यामुळं वेस्ट इंडिज संघाला केवळ 10 खेळाडूंसह खेळावं लागलं. पहिल्या डावातील चौथ्या षटकात ही घटना घडली. अल्झारीनं स्लिप काढून पॉइंटच्या दिशेनं फील्ड करण्याचे संकेत दिले पण कॅप्टन होपनं त्याचं ऐकलं नाही. त्यामुळं तो चिडला होता.
Gets angry! 😡
— FanCode (@FanCode) November 6, 2024
Bowls a wicket maiden 👊
Leaves 🤯
An eventful start to the game for Alzarri Joseph! 😬#WIvENGonFanCode pic.twitter.com/2OXbk0VxWt
रागात घेतली विकेट : या सामन्यात वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 3 षटकांत अवघ्या 10 धावा देत विकेट संपादन केली. त्यानंतर चौथ्या षटकासाठी अल्झारी जोसेफ गोलंदाजीसाठी आला. कर्णधार शाय होपनं नव्या फलंदाजाला दोन स्लिप्स दिल्या. अल्झारीनं पहिला चेंडू आऊट साइड, बॅक ऑफ लेन्थवर टाकला. यानंतर एक स्लिप काढून पॉइंटवर ठेवण्याची मागणी केली. पण होपनं त्याचं ऐकलं नाही. दुसरा चेंडूही ऑफ दिशेला टाकल्यानंतर अल्झारीनं पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली, असं असतानाही फील्ड बदलली नाही. यावर तो चांगलाच संतापला आणि तिसऱ्या चेंडूवर वेगानं बाऊन्सर मारुन त्यानं जॉर्डन कॉक्सला झेलबाद करुन पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.
🚨 10 FIELDERS ON THE FIELD. 🚨
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 7, 2024
- Alzarri Joseph was angry with the field settings, bowls an over, takes a wicket and leaves the field for an over due to which WI were with just 10 fielders. 🤯 pic.twitter.com/ZN44XxG8Uk
Live सामन्यात जोरदार वादावादी मैदानही सोडलं : कॉक्स बाद झाल्यानंतर अल्झारी जोसेफ आणि वेस्ट इंडिजचा कर्णधार शेाय होप यांच्यात जोरदार वादावादी झाली. तथापि, होपनं त्याच्या इच्छेनुसार फील्ड प्लेसमेंट सुरु ठेवलं. यामुळं अल्झारीचा मूड बिघडला आणि षटक पूर्ण केल्यानंतर तो अचानक मैदान सोडून बाहेर पडला. याची कोणालाच कल्पना नव्हती. त्यामुळं त्याच्या जागी क्षेत्ररक्षणासाठी कोणताही खेळाडू वेळेवर येऊ शकला नाही. अशाप्रकारे वेस्ट इंडिजला पुढच्या षटकांत 10 खेळाडूंसह खेळावं लागले. मात्र, अवघ्या एका षटकानंतर अल्झारी पुन्हा मैदानात परतला. त्याच्या पुनरागमनानंतर होपनं त्याला गोलंदाजी दिली नाही. संपूर्ण सामन्यात त्यानं 10 षटकं टाकली आणि 45 धावांत 2 बळी घेतले.
हेही वाचा :