नवी दिल्ली BCCI secretary : जय शहा यांची पुढील आयसीसी अध्यक्ष म्हणून निवड होण्याच्या बाजूनं आकडेवारी असेल, परंतु ते आयसीसीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतील की नाही आणि त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचं सचिव म्हणून त्यांची जागा कोण घेणार हे स्पष्ट नाही. असं मानलं जातं की जय शाह यांना आयसीसी बोर्डाच्या 16 पैकी 15 सदस्यांचा पाठिंबा आहे. परंतु, त्यांना हे पद स्वीकारायचं की नाही हे ठरवण्यासाठी त्यांच्याकडं कमी वेळ आहे. त्याचवेळी, बीसीसीआय सचिव म्हणून त्यांच्या सलग दुसऱ्या कार्यकाळात अजून एक वर्ष बाकी आहे.
बीसीसीआयमध्ये जय शाह यांची जागा कोण घेणार : आयसीसीचे नवे अध्यक्ष 1 डिसेंबर रोजी पदभार स्वीकारतील आणि नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख 27 ऑगस्ट आहे. जय शाह यांना सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डात परत येण्यासाठी तीन वर्षांचा 'कूलिंग ऑफ कालावधी' ऑक्टोबर 2025 मध्ये त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर सुरु होईल. परंतु बीसीसीआयमध्ये शाह यांच्या जागी कोण येणार यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
जय शहा यांनी बीसीसीआयचा राजीनामा दिल्यास हे चार दिग्गज होऊ शकतात सचिव :
1. राजीव शुक्ला
अशी शक्यता आहे की, बीसीसीआय या पदांमध्ये फेरबदल करेल आणि विद्यमान उपाध्यक्ष आणि राज्यसभेतील काँग्रेस खासदार शुक्ला यांना एक वर्षासाठी हे काम करण्यास सांगेल. राजीव शुक्ला यांना सचिव होण्यास नक्कीच हरकत नसेल.
2. आशिष शेलार
महाराष्ट्र भाजपाचे दिग्गज शेलार हे बीसीसीआयचे खजिनदार आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) प्रशासनातील मोठं नाव आहेत. मात्र, शेलार हे कुशल राजकारणी असून बीसीसीआयच्या सचिवपदासाठी त्यांना वेळ द्यावा लागणार आहे. पण तेही या शर्यतीत सामील होऊ शकतात.
3. अरुण धुमाळ
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) चेअरमनला बोर्ड चालवण्याचा अनुभव आहे. ते या क्रिकेट लीगचे खजिनदार आणि प्रमुख होते.
4. सहसचिव देवजीत सैकिया
जरी हे लोकप्रिय नाव नसलं तरी सध्याच्या बीसीसीआय प्रशासनातील तो एक महत्त्वाचा दुवा आहे. त्यांना बढती देखील दिली जाऊ शकते. युवा प्रशासकांमध्ये दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (डीडीसीए) अध्यक्ष रोहन जेटली किंवा बंगाल क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष अविशेक दालमिया यांच्या नावाची चर्चा होऊ शकते. इतर तरुण राज्य युनिट अधिकाऱ्यांमध्ये पंजाबचे दिलशेर खन्ना, गोव्याचे विपुल फडके आणि छत्तीसगडचे प्रभातेज भाटिया यांचा समावेश आहे.
हेही वाचा :