हैदराबाद Manu Bhaker Paris Olympics 2024 : भारतीय नेमबाज मनू भाकरनं रविवारी (28 जुलै) इतिहास रचला. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये तिनं आपल्या कामगिरीनं कांस्यपदक जिंकलं. ऑलिम्पिकच्या इतिहासात महिलांच्या नेमबाजीत कोणतंही पदक जिंकणारी मनू ही पहिली भारतीय महिला ठरली. मनू भाकरचा या पदकापर्यंतचा प्रवास सोपा राहिलेला नाही. जाणून घ्या मनूचा संघर्षमय प्रवास....
A historic medal!
— Narendra Modi (@narendramodi) July 28, 2024
Well done, @realmanubhaker, for winning India’s FIRST medal at #ParisOlympics2024! Congrats for the Bronze. This success is even more special as she becomes the 1st woman to win a medal in shooting for India.
An incredible achievement!#Cheer4Bharat
टोकियो ऑलिम्पिकमध्ये तुटलं होतं पिस्तूल : मूळची हरियाणातील असलेल्या मनू भाकरचं हे दुसरं ऑलिम्पिक आहे. तिनं टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये पदार्पण केलं होतं. मात्र, 10 मीटर एअर पिस्तूल पात्रता फेरीत तिचं पिस्तूल तुटलं. या कारणामुळं तिला त्यावेळी पदक जिंकता आलं नाही. पण यावेळी मनूनं पूर्ण ताकद दाखवत अडचणींवर मात करत पदकावर 'निशाणा' साधला. 22 वर्षीय मनू भाकर पॅरिस 2024 ऑलिम्पिक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल, 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक आणि महिलांच्या 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत भाग घेत आहे. 21 सदस्यीय भारतीय नेमबाजी संघातील ती एकमेव ॲथलीट आहे जी अनेक वयक्तिक स्पर्धांमध्ये भाग घेते.
डोळ्याच्या दुखापतीनंतर बॉक्सिंग सोडलं : हरियाणातील झज्जर इथं जन्मलेल्या मनू भाकरनं शालेय जीवनात टेनिस, स्केटिंग आणि बॉक्सिंग स्पर्धांमध्ये भाग घेतला. याशिवाय 'थान टा' नावाच्या मार्शल आर्टमध्येही भाग घेतला. तिनं राष्ट्रीय स्तरावर पदकं पटकावली. बॉक्सिंगदरम्यान मनूच्या डोळ्याला दुखापत झाली, त्यानंतर तिचा बॉक्सिंगमधील प्रवास संपला. पण मनूला खेळाची वेगळी आवड होती, त्यामुळं ती एक उत्कृष्ट नेमबाज बनण्यात यशस्वी झाली.
आखिरकार वो सपना सच हुआ जिसकी उम्मीद पूरे देश को हरियाणा की धाकड़ बेटी @realmanubhaker से थी।
— Nayab Saini (@NayabSainiBJP) July 28, 2024
देश की नाज़ महिला शूटर मनु भाकर ने पेरिस में अपना दम दिखा दिया है।मनु भाकर ने पेरिस ओलंपिक में 10 मीटर महिला एयर पिस्टल इवेंट में देश के लिए कांस्य पदक जीता।
22 साल की मनु भाकर ने आज वो… pic.twitter.com/nagvsEBl63
आतापर्यंत अनेक स्पर्धांमध्ये मिळवली पदकं : 2023 आशियाई नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात पाचव्या स्थानावर राहून मनूनं भारतासाठी पॅरिस 2024 ऑलिम्पिक कोटा मिळवला होता. ISSF विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी मनू भाकर ही सर्वात तरुण भारतीय आहे. गोल्ड कोस्ट 2018 मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत ती कॉमनवेल्थ गेम्स चॅम्पियन देखील आहे, जिथं तिनं CWG रेकॉर्डसह सर्वोच्च पदक जिंकलं होतं. ब्युनोस आयर्स 2018 मधील युवा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी मनू भाकर देशातील पहिली महिला खेळाडू आहे. तिनं गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर सांघिक पिस्तूलचं विजेतेपद पटकावलं होतं.
'त्या' एका निर्णयानं बदललं नशीब : रिओ ऑलिम्पिक 2016 संपलं असताना मनूनं वयाच्या 14 व्या वर्षी नेमबाजीत करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आठवडाभरात तिनं वडिलांना शूटिंग पिस्तूल आणायला सांगितलं. तिची सदैव साथ देणारे वडील राम किशन भाकर यांनी तिला पिस्तूल विकत घेवून दिलं आणि याच निर्णयानं आज मनू भाकरला ऑलिम्पियन बनवलं. या कामगिरीबद्दल संपूर्ण देशभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हेही वाचा :