ETV Bharat / sports

दिवाळीला होणार IPL धमाका... कोणत्या संघात जाणार रोहित, धोनी, कोहली? - PLAYERS RETENTION LIST

IPL 2025 मेगा लिलावापूर्वी, सर्व 10 फ्रँचायझींना त्यांच्या रिटेन केलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी सादर करावी लागेल. त्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर आहे.

Players Retention List
IPL ट्रॉफी (ANI Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Oct 28, 2024, 12:48 PM IST

मुंबई Players Retention List : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 च्या हंगामापूर्वी एक मेगा लिलाव होणार आहे. हा लिलाव या वर्षी नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला होऊ शकतो. पण त्याआधी, सर्व 10 फ्रँचायझींना त्यांच्या रिटेन केलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी तयार करुन BCCI ला सबमिट करावी लागेल. त्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर आहे. विशेष म्हणजे दिवाळीचा सणही त्याच दिवशी आहे.

BCCI नं जाहीर केले नियम : भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) नुकतेच रिटेन्शनबाबत नवीन नियम जारी केले आहेत. यानुसार फ्रँचायझी जास्तीत जास्त 6 खेळाडूंनाच रिटेन करु शकते. जर एखाद्या संघानं 6 पेक्षा कमी खेळाडूंना रिटेन केलं, तर अशा स्थितीत फ्रँचायझीला लिलावादरम्यान राईट टू मॅच कार्ड वापरण्याची संधी मिळेल. मात्र रिटेन केलेल्या खेळाडूंची अधिकृत यादी समोर येण्यापूर्वीच अटकळ सुरु झाली आहे. रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडू शकतो, असं अनेक रिपोर्ट्समध्ये बोललं जात आहे. चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीचीही अटकळ आहे. सर्व 10 फ्रँचायझी कोणते खेळाडू कायम ठेवू शकतात ते जाणून घ्या.

मुंबई संघ 4 खेळाडूंना रिटेन करणार : 5 वेळा IPL विजेता मुंबई इंडियन्स (MI) फ्रँचायझी आपला कर्णधार हार्दिक पांड्या, माजी कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांना कायम ठेवू शकते. याची शक्यता खूप जास्त आहे. याशिवाय, यष्टीरक्षक इशान किशन आणि तिलक वर्मा या फलंदाजांसाठी राईट टू मॅच कार्ड वापरु शकतो.

धोनी चेन्नई संघात खेळण्यावर सस्पेन्स : धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज (CSK) नं देखील 5 वेळा विजेतेपद पटकावलं आहे. हा संघ अनेक स्टार खेळाडूंनी भरलेला आहे. अशा परिस्थितीत CSK फ्रँचायझी कर्णधार ऋतुराज गायकवाड, माजी कर्णधार धोनी, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मथिशा पाथिराना आणि रचिन रवींद्र यांना रिटेन करु शकते, अशी माहिती क्रिकबझनं दिली आहे. BCCI च्या नवीन नियमांनुसार, 5 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या खेळाडूला अनकॅप्ड मानलं जाईल. अशा परिस्थितीत धोनी अनकॅप्ड खेळाडू म्हणून संघासोबत राहू शकतो. मात्र, धोनीनं अद्याप तो आयपीएलमध्ये खेळणार की नाही हे स्पष्ट केलेले नाही. माहीच्या वक्तव्यानंतरच कोणताही निर्णय घेतला जाईल.

3 वेळा विजेत्या कोलकाताचं काय होणार? : कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) 3 वेळा IPL चं विजेतेपद पटकावलं आहे. यावेळी त्यांना रिटेन करण्याच्या खेळाडूंची यादी तयार करताना डोकेदुखीचा सामना करावा लागू शकतो. समोर येणारी मोठी गोष्ट म्हणजे KKR संघ आपला कर्णधार श्रेयस अय्यरला सोडू शकतो. तर हा KKR संघ आंद्रे रसेल, सुनील नरेन, रिंकू सिंग आणि मिचेल स्टार्क यांना रिटेन करु शकतो. तर हर्षित राणाला अनकॅप्ड खेळाडू म्हणूनही ठेवू शकतो.

हैदराबाद संघ क्लासेन आणि कमिन्सला रिटेन करण्याची शक्यता : सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघ यावेळी कर्णधार पॅट कमिन्स, हेनरिक क्लासेन आणि अभिषेक शर्मा यांना कायम ठेवू शकतो. तर ट्रॅव्हिस हेड आणि नितीश कुमार रेड्डी यांच्यासाठी राईट टू मॅच कार्ड वापरलं जाऊ शकतं.

कोहलीचा बेंगळुरु संघ असेल पूर्णपणे नवीन : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) फ्रँचायझी यावेळी पूर्णपणे नवीन संघ तयार करण्याच्या मूडमध्ये असल्याचं दिसतं. आतापर्यंत विजेतेपद मिळवण्यात अपयशी ठरलेला हा संघ माजी कर्णधार विराट कोहली, मोहम्मद सिराज आणि ग्लेन मॅक्सवेल यांना कायम ठेवू शकतो. कर्णधार फाफ डू प्लेसिस, कॅमेरुन ग्रीन, टॉम कुरन, रजत पाटीदार आणि यश दयाल यांच्यासह उर्वरित संघाला सोडलं जाऊ शकतं.

राजस्थान फ्रँचायझीलाही संघर्ष करावा लागणार : राजस्थान रॉयल्स (RR) फ्रँचायझीला यावेळी कायम ठेवण्यात आलेली यादी तयार करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागू शकतो. कर्णधार संजू सॅमसन, जॉस बटलर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल आणि रायन पराग यांना कायम ठेवता येईल. युझवेंद्र चहलसह जुरेल किंवा पराग यांनाही राईट टू मॅचद्वारे संघात परत घेता येईल. तर आवेश खान, शिमरॉन हेटमायर, ट्रेंट बोल्ट आणि रोव्हमन पॉवेल यांना सोडलं जाऊ शकते.

गुजरात फ्रँचायझी शमी-गिलला कायम ठेवणार : गुजरात टायटन्स (GT) त्यांचा कर्णधार शुभमन गिल, राशिद खान आणि मोहम्मद शमी यांना कायम ठेवू शकतो. गुजरात संघानं 2022 च्या मोसमात पहिले विजेतेपद पटकावलं होतं. उमेश यादव, केन विल्यमसन, ऋद्धिमान साहा, नूर मोहम्मद आणि डेव्हिड मिलर यांना सोडलं जाऊ शकतं. तर साई सुदर्शन आणि राहुल तेवतिया यांच्यासाठी राईट टू मॅच कार्ड वापरलं जाऊ शकतं.

ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा संघ मैदानात उतरणार : दिल्ली कॅपिटल्स (DC) ऋषभ पंत, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल या तीन स्टार खेळाडूंना कायम ठेवू शकते. अशा परिस्थितीत हा संघ पुन्हा एकदा पंतच्या नेतृत्वाखाली येऊ शकतो हे स्पष्ट झालं आहे. ऑस्ट्रेलियन युवा फलंदाज जेक-फ्रेझर मॅकगर्कचाही दिल्ली फ्रँचायझीच्या कायम ठेवलेल्या यादीत परदेशी खेळाडूंचा समावेश होऊ शकतो.

लखनऊ संघ केएल राहुलला वगळणार? : लखनऊ सुपर जायंट्स (LSG) देखील त्यांचा कर्णधार केएल राहुलला वगळू शकतं. त्याच्याबाबत सस्पेन्स आहे. ही फ्रेंचायझी निकोलस पूरनला कर्णधार बनवू शकते. अशाप्रकारे, निकोलस पुरन व्यतिरिक्त, लखनऊ फ्रँचायझी रवी बिश्नोई आणि मयंक यादव यांना कायम ठेवू शकते. उपकर्णधार कृणाल पंड्या आणि आयुष बडोनी यांनाही कायम ठेवण्यात येण्याची शक्यता आहे.

पंजाब किंग्ज एकच खेळाडू कायम ठेवणार : कर्णधार शिखर धवनही पंजाब किंग्ज (PBKS) संघातून बाहेर असू शकतो. तर वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग हा एकमेव खेळाडू आहे जो फ्रेंचायझीच्या कायम ठेवलेल्या यादीत आहे. याशिवाय शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा ही नावंही कायम ठेवली जाऊ शकतात. सॅम कुरन, हर्षल पटेल, जॉनी बेअरस्टो, ख्रिस वोक्स, सिकंदर रझा, जितेश शर्मा, कागिसो रबाडा, लियाम लिव्हिंगस्टन अशी नावं बाहेर जाऊ शकतात.

हेही वाचा :

  1. IPL 2025 लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सच्या दिग्गज खेळाडूचे वडील राजकारणात; खेळाडू एका वर्षापासून भारतीय संघाबाहेर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.