मुंबई IPL 2025 Dates : IPL 2025 साठी 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी मेगा लिलाव आयोजित केला जाईल. ज्यात एकूण 574 खेळाडूंचा लिलाव होणार आहे. दरम्यान, BCCI नं पुढील तीन हंगामांसाठी काही महत्त्वाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. IPL चं हे मोठं पाऊल आहे, असं यापूर्वी कधीच घडलं नव्हतं. IPL साठी जाहीर झालेल्या तारखांनुसार, 2025 चं IPL 14 मार्चपासून सुरु होईल आणि त्याची अंतिम फेरी 25 मे रोजी होईल. तर 2026 चा हंगाम 15 मार्च ते 31 मे दरम्यान खेळवला जाईल, तर 2027 चा हंगाम 14 मार्च ते 30 मे दरम्यान खेळवला जाईल.
🚨 NEWS 🚨
— IndianPremierLeague (@IPL) November 15, 2024
TATA IPL 2025 Player Auction List Announced!
All the Details 🔽 #TATAIPLhttps://t.co/QcyvCnE0JM
पुढील मोसमात अनेक सामने खेळवले जातील : ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालानुसार, गुरुवारी फ्रँचायझींना पाठवलेल्या ईमेलमध्ये, IPL नं स्पर्धेच्या तारखांची विंडो दिली आहे. ही शेवटची तारीख असण्याची शक्यता आहे. IPL 2025 मध्ये एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत. गेल्या तीन हंगामात इतकेच सामने खेळले गेले आहेत. जेव्हा BCCI नं आपले हक्क विकले तेव्हा प्रत्येक हंगामात 84 सामने खेळण्याची चर्चा होती, परंतु अद्याप तसं झालं नाही.
✍️ 1574 Player Registrations
— IndianPremierLeague (@IPL) November 5, 2024
🧢 320 capped players, 1,224 uncapped players, & 30 players from Associate Nations
🎰 204 slots up for grabs
🗓️ 24th & 25th November 2024
📍 Jeddah, Saudi Arabia
Read all the details for the upcoming #TATAIPL Mega Auction 🔽🤩
IPL लिलावाकडे सर्वांचं लक्ष लागलं : चाहते नेहमीच जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीग IPL ची आतुरतेनं वाट पाहत असतात. IPL नं जगभरातील क्रिकेटपटूंना उत्तम व्यासपीठ दिलं आहे. यात खेळणाऱ्या खेळाडूंना पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही मिळते. IPL मध्ये खेळाडूंचं रिटेंशन झाल्यानंतर आता चाहत्यांच्या नजरा मेगा लिलावावर खिळल्या आहेत. या लिलावात अनेक फ्रँचायझी पूर्णपणे नवीन संघ तयार करतील आणि अनेक महागडे खेळाडूही खरेदी केले जातील अशी अपेक्षा आहे.
🚨 IPL 2025 DATES ARE OUT. 🚨
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 22, 2024
- IPL 2025 likely to be played from 14th March to 25th May. (Espncricinfo). pic.twitter.com/fJWRoSyEiu
अनेक खेळाडू लिलावात : यावेळी, 574 खेळाडूंपैकी 48 कॅप्ड भारतीय खेळाडू, 193 कॅप्ड परदेशी खेळाडू, 3 असोसिएट नॅशनल खेळाडू, 318 अनकॅप्ड भारतीय खेळाडू आणि 12 अनकॅप्ड परदेशी खेळाडूंचा मेगा लिलावात समावेश आहे. या खेळाडूंपैकी केवळ 204 खेळाडूंना खरेदी करता येणार आहे. ज्यात 70 स्लॉट विदेशी खेळाडूंसाठी आहेत.
हेही वाचा :