India Whitewashed at Home : कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी गेले दोन आठवडे सर्वात धक्कादायक ठरले आहेत. जगातील सर्वात बलाढ्य कसोटी संघ म्हणून पाहिल्या जाणाऱ्या भारतीय संघाला अचानक मायदेशात मालिका गमवावी लागली. तेही न्यूझीलंडच्या हातून, ज्या संघानं मागील 60-70 वर्षांत भारतात केवळ 2 कसोटी सामने जिंकले होते. तरीही हे घडलं कारण इतिहास अशा आश्चर्यकारक पराक्रमांनी घडवला जातो. न्यूझीलंडनं इतिहास रचला पण आता भारतीय संघाला अशा संकटाचा सामना करावा लागत आहे जो त्यांनी 92 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात पाहिलेला नाही. मुंबईत होणाऱ्या पुढील कसोटी सामन्यात असं होऊ शकतं, ते टाळण्यासाठी भारतीय संघाला सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील.
A tough loss for #TeamIndia in Pune.
— BCCI (@BCCI) October 26, 2024
Scorecard ▶️ https://t.co/YVjSnKCtlI #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/PlU9iJpGih
12 वर्षांत गमावली पहिली मालिका : कसोटी मालिकेतील पहिला सामना बेंगळुरु इथं खेळला गेला आणि न्यूझीलंडनं तो 8 विकेटनं जिंकला. या सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघ अवघ्या 46 धावांत गारद झाला, जी घरच्या मैदानावरील त्यांची सर्वात कमी धावसंख्या आहे. त्यानंतर पुणे कसोटीत तीन दिवसांतच न्यूझीलंडनं 113 धावांनी मालिका जिंकली. अशाप्रकारे 2012 पासून सलग 18 मालिका जिंकल्यानंतर पहिल्यांदाच भारतीय संघानं घरच्या मैदानावर मालिका गमावली.
Making history in India ✍️
— BLACKCAPS (@BLACKCAPS) October 28, 2024
The team’s first Test series victory in India in 13 attempts. #INDvNZ #CricketNation pic.twitter.com/Lb0fAdarVV
92 वर्षांत असं घडलं नाही : मालिकेतील दोन सामने गमावल्यामुळं या कसोटी मालिकेत भारताला क्लीन स्वीप होण्याचा धोका आहे. भारतीय क्रिकेट संघानं आपल्या 92 वर्षाच्या प्रदीर्घ क्रिकेट इतिहासात अनेक वेळा कसोटी मालिकेत क्लीन स्वीपचा सामना केला आहे. परंतु आजपर्यंत असं घडलेलं नाही की मायदेशात तीन किंवा अधिक कसोटी सामन्यांच्या मालिकेत या पेचाचा सामना करावा लागला असेल. भारतीय संघ आजपर्यंत घरच्या भूमीवर पराभूत झालेल्या सर्व कसोटी मालिकेत एकही क्लीन स्वीप जिंकू झालेला नाही. एकतर कसोटी सामना अनिर्णित राहिला किंवा भारतीय संघानं एक किंवा दोन सामने जिंकले. 2000 मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून क्लीन स्वीपला सामोरं जावं लागलं असलं तरी ती मालिका फक्त 2 सामन्यांची होती.
The first New Zealand team to win a Test series in India 🏏 #INDvNZ #CricketNation pic.twitter.com/WukPYYyrot
— BLACKCAPS (@BLACKCAPS) October 26, 2024
मुंबईचा इतिहास बदलणार का? : आता पहिल्यांदाच ते 3-0 नं पुसले जाण्याचा धोका आहे आणि मुंबईचं ऐतिहासिक वानखेडे स्टेडियम या अप्रिय घटनेचं साक्षीदार होऊ शकते, जिथं भारतीय क्रिकेटचे अनेक सुवर्ण अध्याय लिहिले गेले आहेत. मालिकेतील हा शेवटचा कसोटी सामना 1 नोव्हेंबरपासून सुरु होणार असून त्यात अजून वेळ आहे. अशा स्थितीत कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांना पुन्हा आपल्या संघात तो विश्वास भरावा लागेल, जेणेकरुन संघ पूर्वीप्रमाणेच वृत्तीनं मैदानात उतरेल आणि शेवटचा सामना जिंकून आपला सन्मान वाचवू शकेल आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या आशाही कायम ठेवू शकेल.
हेही वाचा :