नवी दिल्ली Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 सुरु होण्यासाठी आता फक्त 4 दिवस उरले आहेत. पॅरिस ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा 26 जुलै रोजी होणार आहे. यानंतर या स्पर्धेत एकूण 117 भारतीय खेळाडूंची कामगिरी पाहायला मिळणार आहे. त्याआधी आज आम्ही तुम्हाला ऑलिम्पिक गावाबद्दल सांगणार आहोत. या लेखात आम्ही तुम्हाला ऑलिम्पिक गाव म्हणजे काय, त्याची सुरुवात कशी झाली आणि याआधी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी खेळाडू कुठं थांबांयचं ते सांगणार आहोत.
ऑलिम्पिक गाव म्हणजे काय : ऑलिम्पिक खेळांसाठी ऑलिम्पिक गाव बांधण्यात आलं आहे. ज्याठिकाणी खेळ होणार आहेत, त्याठिकाणाजवळ खेळाडूंसाठी एक जागा तयार करण्यात आली आहे, ज्यात खेळाडूंना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. याच खेळाडूंच्या निवासस्थानाला ऑलिम्पिक गाव म्हणतात. या ऑलिम्पिक गावात देशातील तसंच जगातील सर्व खेळाडू एकत्र येतात.
ऑलिम्पिक गाव कधी सुरु झाले : सुरुवातीच्या ऑलिम्पिक खेळांमध्ये खेळाडूंसाठी ऑलिम्पिक गाव नव्हतं. त्यापैकी काही हॉटेल्स किंवा विद्यार्थी वसतीगृहात थांबले होते. तर इतरांनी शाळांमध्ये स्वस्त निवासाचा पर्याय निवडला होता. लॉस एंजेलिस इथं 1932 च्या खेळांसाठी पहिलं ऑलिम्पिक गाव बांधलं गेलं. 37 देशांतील खेळाडूंनी (केवळ पुरुष) एकत्र जेवले, झोपले आणि प्रशिक्षण घेतलं. काही सामुदायिक सेवा प्रथमच प्रदान करण्यात आल्या. ज्यामध्ये हॉस्पिटल, फायर स्टेशन आणि पोस्ट ऑफिस आहे. सुरुवातीच्या काळात महिला ऑलिम्पिक गावात न राहता हॉटेलमध्ये राहात होत्या.
ऑलिम्पिक गावात खेळाडूंना कोणत्या सुविधा मिळतात : मेलबर्नमध्ये 1956 च्या खेळापर्यंत ऑलिम्पिक गाव पुरुष आणि महिला दोघांसाठी खुलं नव्हतं. हे सहसा स्पर्धेच्या ठिकाणांजवळच असतं. खेळांच्या तयारीदरम्यान त्याचं बांधकाम अतिशय गांभीर्यानं घेतलं जातं. तसंच या गावातील रहिवाशांना अनेक फायदे मिळतात. ते गावातील रेस्टॉरंटमध्ये दिवसाचे 24 तास जेवू शकतात, क्लबमध्ये जाऊ शकतात किंवा संध्याकाळच्या मैफिलींना उपस्थित राहू शकतात. खेळ संपल्यावर, ऑलिम्पिक गाव शहरासाठी एक नवीन निवासी क्षेत्र बनतं आणि स्थानिक लोकांना घरं विकली किंवा भाडेतत्वार दिली जातात.
दोन देशांच्या खेळाडूंमध्ये घट्ट नातं निर्माण झालं : यजमान शहरात आल्यानंतर खेळाडू ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये राहतात. खेळादरम्यान, त्यांचा वेळ केवळ स्पर्धांमध्येच जात नाही. त्यांच्यासाठी विविध देश आणि संस्कृतीतील इतर खेळाडूंना भेटण्याचीही संधी आहे. विविध खेळांमधील खेळाडू किंवा दूरच्या देशांतील प्रतिनिधी यांच्यातील संपर्काला प्रोत्साहन देण्यासाठी सामुदायिक जीवन चांगलं आहे. हे जगभरातील खेळाडूंमधील संबंध राखल्या जातात.
हेही वाचा :