ETV Bharat / sports

एका संघात सहा खेळाडू, 5-5 षटकांचे सामने, कोणतं आहे हे अनोखं टूर्नामेंट? ज्यात भारत-पाकिस्तान येणार आमने-सामने

हाँगकाँगमध्ये होणाऱ्या सुपर सिक्स स्पर्धेत खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ सज्ज झाला आहे. क्रिकेट हाँगकाँगनं आपल्या सोशल मीडियावर ही माहिती दिली.

author img

By ETV Bharat Sports Team

Published : 2 hours ago

Hong Kong Super Six
भारतीय क्रिकेट (ANI Photo)

नवी दिल्ली Hong Kong Super Six : हाँगकाँगमध्ये होणाऱ्या सुपर सिक्स स्पर्धेत खेळण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. ही स्पर्धा 1992 मध्ये सुरु झाली आणि 2017 पर्यंत चालली. आता ही स्पर्धा 7 वर्षांनंतर पुन्हा पुनरागमन करणार आहे. 2005 मध्ये एकदा ही ट्रॉफी जिंकण्यात भारताला यश आलं होतं. याशिवाय 1996 मध्ये भारतीय संघ उपविजेता ठरला होता. आता ते पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका या संघांशी लढण्यासाठी सज्ज झाला आहे.

क्रिकेट हाँगकाँगची घोषणा : क्रिकेट हाँगकाँगनं सोमवारी आपल्या सोशल मीडियावर या स्पर्धेत भारतीय संघाच्या सहभागाची माहिती दिली. त्यांनी लिहिलं, "भारतीय संघ HK6 मध्ये षटकार मारण्यासाठी सज्ज आहे! चाहत्यांना थक्क करुन टाकणारे स्फोटक पॉवर हिटिंग आणि षटकारांचं वादळ असेल. अधिक संघ, अधिक षटकार, अधिक उत्साह आणि जास्तीत जास्त रोमांच अपेक्षित आहे."

कोणते संघ होणार सहभागी : स्पर्धेची 20वी आवृत्ती 12 संघांमध्ये खेळवली जाईल. टिन क्वांग रोड मनोरंजन मैदानावर होणार आहे. भारताव्यतिरिक्त पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, हाँगकाँग, नेपाळ, न्यूझीलंड, ओमान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) सहभागी होणार आहेत. ब्रायन लारा, वसीम अक्रम, शेन वॉर्न, सचिन तेंडुलकर, एमएस धोनी आणि अनिल कुंबळे यांसारखे दिग्गज खेळाडू यापूर्वी या स्पर्धेत खेळले आहेत. 2005 मध्ये भारतानं ही स्पर्धा जिंकली, तर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे प्रत्येकी 5 विजेतेपदांसह सर्वात यशस्वी संघ आहेत.

स्पर्धेचे विचित्र नियम : या स्पर्धेतील इतर मागील विजेत्यांमध्ये पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांचा समावेश आहे. स्पर्धेचं स्वरुप मजेदार आहे. सहा खेळाडूंच्या दोन संघांमध्ये सामने खेळले जातात. प्रत्येक सामन्यात प्रत्येक संघासाठी जास्तीत जास्त पाच षटकं आहेत. पाच षटकं टाकली जातात आणि प्रत्येक षटकात सहा ऐवजी आठ चेंडू टाकता येतात. वाईड आणि नो-बॉलवर एक नाही तर 2 धावा होतात. 31 धावा केल्यानंतर फलंदाजाला निवृत्त व्हावं लागतं. मात्र त्यांच्या संघाच्या सर्व विकेट पडल्यानंतर ते शेवटी फलंदाजीसाठी परत येऊ शकतात.

हेही वाचा :

  1. धमाकेदार बुधवार...! भारतीय संघ खेळणार दोन T20 सामने; एकाच वेळी दोन्ही सामने 'इथं' दिसतील लाईव्ह
  2. टीम इंडियानं फोडला विजयाचा 'नारळ'; सहा विकेट राखत पाकिस्तानला चारली धूळ - Womens T20 World Cup 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.