ETV Bharat / sports

विराट कोहलीसह 'हे' दिग्गज खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झाले 0व्या चेंडूवर आउट - WHAT IS DIAMOND DUCK

क्रिकेटमध्ये शून्यावर बाद होण्यासाठी वेगवेगळी नावं तुम्ही ऐकली असतील. शून्यावर आउट होण्याला डक आऊट म्हणतात, त्याचप्रमाणे 'डायमंड डक' देखील क्रिकेटमध्ये वापरला जाणारा शब्द आहे.

Virat Kohli
विराट कोहली (AFP Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Oct 20, 2024, 4:23 PM IST

मुंबई Virat Kohli Out on Diamond Duck : क्रिकेटमध्ये जेव्हा एखादा फलंदाज शून्यावर बाद होतो तेव्हा त्याला 'डक'वर बाद होणं म्हणतात. याशिवाय पहिल्या चेंडूवर फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतला तर त्याला आपण 'गोल्डन डक' म्हणतो. पण क्रिकेटमध्ये, गोल्डन डकशिवाय, बॅट्समन 'डायमंड डक'वर देखील बाद होतो. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला माहित नसेल तर आज आम्ही तुम्हाला डायमंड डक काय म्हणतात ते सांगू.

'डायमंड डक' म्हणजे काय?

जेव्हा एखादा फलंदाज क्रिकेटच्या मैदानावर कोणताही चेंडू न खेळता बाद होतो तेव्हा त्याला 'डायमंड डक' म्हणतात. यानुसार, जेव्हा एखादा फलंदाज नॉन-स्ट्रायकरच्या टोकाला उभा राहतो आणि धाव घेताना एकही चेंडू न खेळता शून्यावर बाद होतो, तेव्हा त्याला 'डायमंड डक' म्हणतात. याशिवाय, वाइड बॉलवर फलंदाज स्टंप झाला तरीही त्याला 'डायमंड डक' म्हणतात.

आतापर्यंत किती खेळाडू झाले बाद : 'डायमंड डक' क्वचितच दिसत असलं तरी ते खूप मनोरंजक आहे. 1995 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच एखादा खेळाडू या प्रकाराचा बळी ठरला होता आणि तेव्हापासून कसोटी क्रिकेटमध्ये केवळ 23 खेळाडू अशा पद्धतीनं बाद झाले आहेत. यात 5 भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. तर वनडे क्रिकेटमध्ये 1991 पासून 165 खेळाडू 'डायमंड डक'वर आउट झाले आहे. तसंच T20 क्रिकेटमध्ये 127 खेळाडू एकही चेंडू न खेळता आउट झाले आहेत.

राजेश चौहान : कसोटी क्रिकेटमध्ये डायमंड डकचा बळी ठरणारा पहिला भारतीय माजी क्रिकेटपटू राजेश चौहान होता. 1997 मध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध एकही चेंडू न खेळता तो नॉन-स्ट्रायकर एंडला धावबाद झाला होता.

नवज्योत सिंग सिद्धू : बांगलादेशनं 1998 मध्ये सिल्व्हर ॲनिव्हर्सरी इंडिपेंडन्स कप या त्रिकोणी मालिकेचं आयोजन केलं होतं. या मालिकेतील उर्वरित दोन संघ भारत आणि पाकिस्तान या शेजारील देशांचे होते. ढाका इथं पावसानं प्रभावित झालेल्या सामन्यात बांगलादेशनं प्रथम फलंदाजी करताना 48 षटकांत 190 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. डावाच्या पहिल्या षटकातील पाचव्या चेंडूवर धाव घेण्याबाबत नवज्योत सिंग सिद्धू आणि सौरव गांगुली यांच्यात झालेल्या गैरसमजामुळं सिद्धू एकही चेंडू न खेळता शून्यावर धावबाद झाला आणि पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, अझरुद्दीन (84) आणि सचिन तेंडुलकर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतानं यजमान संघाचा चार विकेट राखून पराभव केला.

राहुल द्रविड : 2004 चा पाकिस्तान दौरा भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडसाठी संमिश्र होता. दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात भारत मोठ्या फरकानं पिछाडीवर होता. आकाश चोप्रा बाद झाल्यानंतर द्रविड पहिल्या कसोटीत त्रिशतक झळकावणाऱ्या वीरेंद्र सेहवागला पाठिंबा देण्यासाठी आला. मात्र, धावा घेताना दोघांमध्ये समन्वय नव्हता आणि सेहवागच्या कॉलवर धाव घेण्याच्या प्रयत्नात द्रविड एकही चेंडू न खेळता धावबाद झाला आणि शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला.

हरभजन सिंग : 2007 मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज क्रिकेटर हरभजन सिंग देखील 'डायमंड डक'पासून वाचू शकला नाही. मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो शून्यावर धावबाद झाला होता.

जसप्रीत बुमराह : सध्याच्या काळातील सर्वात तेजस्वी वेगवान गोलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जसप्रीत बुमराहचाही 'डायमंड डक'च्या भारतीय यादीत समावेश आहे. 2021 मध्ये लंडनमधील ओव्हल मैदानावर इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात शून्यावर धावबाद होत असताना बुमराह 'डायमंड डक'चा बळी ठरला.

उमेश यादव : या यादीत भारतीय वेगवान गोलंदाज उमेश यादवचा देखील समावेश आहे. 2023 मध्ये अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात तो एकही चेंडू न खेळता शून्यावर धावबाद झाला आणि भारताच्या 'डायमंड डक'च्या यादीत सामील झाला.

विराट कोहली : 2010 मध्ये भारत, श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यात झालेल्या त्रिकोणी मालिकेत विराट कोहलीही 'डायमंड डक'वर बाद झाला होता. पहिली विकेट पडल्यानंतर क्रीझवर आलेला कोहली आणि सलामीवीर दिनेश कार्तिक धावा चोरण्याचा प्रयत्न करत होते, मात्र झिम्बाब्वेचा कर्णधार एल्टन चिगुम्बुरानं थेट थ्रो मारल्यामुळं विराट कोहलीला धावबाद होऊन खेळ न करताच मैदान सोडावं लागलं.

ब्रेंडन मॅक्युलम : भारताच्या 2002/03 च्या न्यूझीलंड दौऱ्यातील 6व्या एकदिवसीय सामन्यात, भारताचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक युवराज सिंगच्या शानदार क्षेत्ररक्षणाच्या प्रयत्नामुळं यष्टिरक्षक ब्रेंडन मॅक्युलम 'डायमंड डक'वर धावबाद झाला.

रिकी पाँटिंग : ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील 2005-2006 VB मालिकेच्या पहिल्या फायनलमध्ये ॲडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पाँटिंग श्रीलंकेच्या टी दिलशानकडून रनआउट झाला होता. कॅटिचनं पॉइंट टू बॉल टॅप केला आणि पॉन्टिंगनं रनसाठी बोलावले. तथापि, दोन्ही फलंदाजांमध्ये संभ्रम होता, परिणामी स्ट्रायकरच्या शेवटी पाँटिंगच्या दिलशाननं सहज धावबाद केलं.

हेही वाचा :

  1. न्यूझीलंडविरुद्ध पराभवानंतर WTC पॉइंट टेबलमध्ये भारताला मोठा धक्का; अंतिम सामन्यात जाण्याचा मार्ग कठीण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.