पल्लेकेले West Indies Won after 19 Years : श्रीलंका क्रिकेट संघाविरुद्ध तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर, वेस्ट इंडिज क्रिकेट संघानं तिसरा आणि शेवटचा वनडे सामना जिंकून या मालिकेत क्लीन स्वीप होण्यापासून स्वतःला वाचवलं आहे. पल्लेकेलेच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या मालिकेतील शेवटच्या सामन्यात पावसानं व्यत्यय आणला, ज्यामुळं श्रीलंकेच्या संघाने 23 षटकांत 156 धावा केल्या आणि नंतर डकवर्थ लुईस नियमानुसार वेस्ट इंडिजला 195 धावांचं लक्ष्य गाठावं लागलं. वेस्ट इंडिज संघानं 22 षटकांत अवघ्या 2 विकेट्सच्या मोबदल्यात हे यश संपादन केलं. ज्यात एविन लुईसनं फलंदाजीत महत्त्वाची भूमिका बजावली.
West Indies avoid whitewash in the ODI series against Sri Lanka with a brilliant batting display in the final match 👏
— ICC (@ICC) October 26, 2024
📝 #SLvWI: https://t.co/U3SQ7NwI1U pic.twitter.com/Gru98JuIRW
तीन वर्षांनंतर पुनरागमन करत झळकावलं शतक : एविन लुईसला तीन वर्षांनंतर वेस्ट इंडिजकडून वनडे सामना खेळण्याची संधी मिळाली. ज्याचा त्यानं पुरेपूर फायदा उठवला आणि 61 चेंडूत 102 धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. यावेळी लुईसला शेरफेन रदरफोर्डची साथ लाभली त्यानं 26 चेंडूंत 4 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीनं नाबाद 50 धावांची खेळी केली. या वनडे मालिकेतील पहिल्या 2 सामन्यात वेस्ट इंडिजला एकतर्फी पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. मात्र, तिसऱ्या सामन्यात त्यांनी श्रीलंकेच्या संघावर पूर्ण वर्चस्व ठेवलं.
The relentless pursuit for an ODI win in Sri Lanka and WI deliver!🙌🏾
— Windies Cricket (@windiescricket) October 26, 2024
The 1st ODI win on Sri Lankan soil since 2005.👏🏾 #WIWin | #SLvWI | #MenInMaroon pic.twitter.com/WwWqPM7WUp
An ODI return with a BANG!💥
— Windies Cricket (@windiescricket) October 26, 2024
His 3rd against Sri Lanka and 5th ODI ton!💯 #SLvWI | #MenInMaroon pic.twitter.com/L6VD35JdJr
वेस्ट इंडिजनं 19 वर्षांनंतर श्रीलंकेत जिंकला वनडे सामना : श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या वनडे सामन्यातील वेस्ट इंडिज संघाचा हा विजय त्यांच्यासाठीही खास ठरला कारण 19 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर वेस्ट इंडिज संघ श्रीलंकेत वनडे सामना जिंकण्यात यशस्वी ठरला. यापूर्वी, 2005 मध्ये त्यांनी श्रीलंकेत वनडे सामना जिंकला होता आणि तेव्हापासून या सामन्यापूर्वी खेळल्या गेलेल्या 10 वनडे सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजला सलग पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.
2️⃣0️⃣4️⃣ runs with 3️⃣ consecutive ODI half centuries!🤯
— Windies Cricket (@windiescricket) October 26, 2024
It's been an incredible tour for Rutherford in Sri Lanka with the bat!🏏#SLvWI | #MenInMaroon pic.twitter.com/KvW6vMy0RA
हेही वाचा :