सेंट लुसिया WI vs ENG 3rd T20I Live Streaming : वेस्ट इंडिज क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तिसरा T20 सामना 15 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना सेंट लुसिया येथील ग्रोस आयलेट येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
Saint Lucia!🇱🇨
— Windies Cricket (@windiescricket) November 13, 2024
Wear your maroon and be a part of The Rivalry experience!🏏🌴🏴
Get your online now⬇️https://t.co/j5uFpnafn5#TheRivalry | #WIvENG pic.twitter.com/ZIBoiybQ2c
विंडीजसाठी करो या मरो सामना : दुसऱ्या T20 मध्ये इंग्लंडनं वेस्ट इंडिजचा 7 गडी राखून पराभव केला. यासह पाहुण्या संघानं पाच सामन्यांच्या T20 मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. आता मालिकेतील तिसरा सामना वेस्ट इंडिजसाठी करो किंवा मरो असा आहे. अशा स्थितीत वेस्ट इंडिज संघाला मालिकेत पुनरागमन करायला आवडेल. दुसरीकडे तिसरा T20 सामना जिंकून मालिका काबीज करण्यावर इंग्लंडचं लक्ष असेल. वेस्ट इंडिजची कमान रोव्हमन पॉवेलच्या खांद्यावर आहे. तर इंग्लंडचं नेतृत्व जोस बटलरकडे असेल. दोन्ही संघांमध्ये पुन्हा एकदा रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : वेस्ट इंडिज आणि इंग्लंड संघ आतापर्यंत 32 वेळा T20 मध्ये वेळा खेळले आहेत. ज्यात वेस्ट इंडिजचा वरचष्मा दिसत आहे. वेस्ट इंडिजनं 32 पैकी 17 सामने जिंकले आहेत. तर इंग्लंडनं 15 सामने जिंकले आहेत. याशिवाय एक सामना अनिर्णित राहिला. याशिवाय वेस्ट इंडिजनं घरच्या मैदानावर 17 पैकी 10 सामने जिंकले आहेत. वेस्ट इंडिजचा संघ घरच्या मैदानावर अधिक मजबूत असल्याचं स्पष्ट झालं आहे. पण आतापर्यंतच्या मालिकेत इंग्लंडनं चमकदार कामगिरी केली आहे.
St. Lucia 🇱🇨, don't miss out on this deal! The clock is counting down🕐 to RALLY with the #MenInMaroon🏏🌴
— Windies Cricket (@windiescricket) November 13, 2024
Use 𝙋𝙍𝙊𝙈𝙊 𝘾𝙊𝘿𝙀: 𝙍𝙄𝙑𝘼𝙇𝙍𝙔 to enjoy specially reduced prices online or at the Box Office! 🎟️📲
Get Tickets⬇️https://t.co/j5uFpn9Hxx#TheRivalry | #WIvENG pic.twitter.com/cIfNSL9LLk
खेळपट्टी कशी असेल : डॅरेन सॅमी आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल असेल. नव्या चेंडूमुळं वेगवान गोलंदाजांना थोडीफार मदत मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय इथं फिरकीपटूंना फारसं वळण मिळण्याची शक्यता नाही. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी खूप चांगली आहे हे सर्वांनाच माहीत आहे. नाणेफेक जिंकणारा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवरील T20 सामन्यांची आकडेवारी :
मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत एकूण 41 T20 सामने खेळले गेले आहेत. ज्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं 19 वेळा विजय मिळवला आहे, तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघानं 22 वेळा विजय मिळवला आहे. दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संघाला इथं जिंकण्याची अधिक शक्यता असल्याचं यावरुन दिसून येतं.
Barbados ✅
— England Cricket (@englandcricket) November 12, 2024
Next stop - St Lucia 📍
🌴 #WIvENG 🏴 | #EnglandCricket pic.twitter.com/rALdk9IzSv
- डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या : 147
- डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर दुसऱ्या डावाची सरासरी धावसंख्या : 130
वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा T20 सामना कधी खेळला जाईल?
वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा T20 सामना शुक्रवार, 15 नोव्हेंबर रोजी डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियम, ग्रोस आयलेट, सेंट लुसिया इथं भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 1:30 वाजता खेळवला जाईल. तर नाणेफेकीची वेळ या आधी अर्धा तास असेल.
Making your T20I debut 🧢
— England Cricket (@englandcricket) November 11, 2024
Your mum and dad next to you as you receive your cap 🤗
Congratulations Dan Mousley! 🙌
🌴 #WIvENG 🏴 | #EnglandCricket pic.twitter.com/RxqSP6PuJR
वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा T20 सामना कुठं आणि कसा पाहायचा?
सध्या भारतातील कोणत्याही टीव्ही चॅनलवर वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेच्या प्रसारणाबाबत कोणतीही माहिती नाही. तथापि, वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड T20 मालिकेचं लाईव्ह स्ट्रीमिंग फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर भारतात उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत चाहत्यांना येथून तिसऱ्या T20 सामन्याचा आनंद लुटता येईल.
सामन्यासाठी दोन्ही संघ :
वेस्ट इंडिज : निकोलस पूरन (यष्टीरक्षक), रोव्हमन पॉवेल (कर्णधार), ब्रँडन किंग, एविन लुईस, रोस्टन चेस, शेरफेन रदरफोर्ड, रोमॅरियो शेफर्ड, गुडाकेश मोती, अकेल होसेन, मॅथ्यू फोर्ड, टेरेन्स हिंड्स, अल्झारी एसपी जोसेफ, , शाई होप, शिमरॉन हेटमायर
इंग्लंड : फिलिप सॉल्ट (विकेटकीप), जोस बटलर (क), विल जॅक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, सॅम कुरन, डॅन मौसले, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद, रीस टोपली, मायकेल-काईल पेपर. , रेहान अहमद, जॉर्डन कॉक्स, जॉन टर्नर, जाफर चौहान
हेही वाचा :