अँटिग्वा WI vs BAN 1st Test Live Streaming : वेस्ट इंडिज राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना आज 22 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. उभय संघांमधील पहिला कसोटी सामना अँटिग्वा येथील नॉर्थ साउंड येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळवला जाईल.
The Captains' Media day.🏆
— Windies Cricket (@windiescricket) November 21, 2024
Both teams set and ready for 5️⃣ days of Test action at the Sir Vivian Richards Stadium.💥 #WIvBAN | #WIHomeForChristmas pic.twitter.com/f3iXUPgFAw
दोन्ही संघाचं मालिका विजयाचं लक्ष्य : वेस्ट इंडिज संघानं नुकतीच घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली. ज्यात त्यांना 1-0 नं पराभवाचा सामना करावा लागला. अशा स्थितीत यजमान संघाला घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध चांगली कामगिरी करायची आहे. दुसरीकडे, बांगलादेशलाही नुकतंच दक्षिण आफ्रिकेकडून घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत 2-0 असा पराभव पत्करावा लागला आहे. अशा परिस्थितीत बांगलादेश संघ वेस्ट इंडिजला कडवं आव्हान देऊ इच्छितो.
कसोटीनंतर होणार वनडे मालिका : क्रेग ब्रॅथवेट बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघाचं नेतृत्व करणार आहे. वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज अष्टपैलू जेसन होल्डर खांद्याच्या दुखापतीतून सावरत आहे. त्यामुळंच त्याची संघात निवड झालेली नाही. दुसरीकडं, कसोटी मालिकेत बांगलादेशची कमान नझमुल हुसेन शांतोकडे आहे. तर बांगलादेशचा वरिष्ठ खेळाडू मुशफिकुर रहीमला कसोटी मालिकेतून वगळण्यात आलं आहे. शारजाहमध्ये अफगाणिस्तान विरुद्धच्या पहिल्या वनडे दरम्यान विकेट कीपिंग करताना मुशफिकुर रहीमच्या डाव्या हाताच्या बोटाला फ्रॅक्चर झाला, ज्यामुळं त्याला सध्याच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून बाहेर पडावं लागलं आणि आता तो कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. बांगलादेशचा पहिला कसोटी सामना वेस्ट इंडिजविरुद्ध अँटिग्वा येथे होणार आहे. कसोटी मालिकेनंतर बांगलादेशला वेस्ट इंडिजविरुद्ध तीन वनडे आणि तीन T20 सामन्यांची मालिका खेळायची आहे.
Kemar is no stranger to amazing performances at the Sir Vivian Richards Stadium! Come out and RALLY!🙌🏾
— Windies Cricket (@windiescricket) November 21, 2024
WI HOME FOR CHRISTMAS!🌲🏏
🗓️ NOV 30 - Dec 4
🏟️ Sabina Park
Get Tickets Now🎟️https://t.co/j5uFpn9Hxx#WIvBAN | #WIHomeForChristmas pic.twitter.com/sbFP5VWNvR
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : कसोटी फॉर्मेटमध्ये वेस्ट इंडिजकडे बांगलादेशविरुद्ध महत्त्वपूर्ण आघाडी आहे. उभय संघांमधील 20 सामन्यांपैकी वेस्ट इंडिजनं 14 सामने जिंकले आहेत तर बांगलादेशनं 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तसंच दोघांमध्ये 2 सामने अनिर्णित राहिले आहेत. वेस्ट इंडिजनं या फॉरमॅटमध्ये अधिक यश मिळवलं असून बांगलादेशविरुद्धच्या गेल्या पाचपैकी चार सामने जिंकले आहेत.
🚨SQUAD NEWS🚨
— Windies Cricket (@windiescricket) November 21, 2024
The #MenInMaroon announce their playing XI for the 1st Test v Bangladesh in Antigua!🇦🇬#WIvBAN | #WIHomeForChristmas pic.twitter.com/Ds1AullzWN
वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश कसोटी वेळापत्रक :
- पहिला कसोटी सामने - 22 ते 26 नोव्हेंबर, सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम, नॉर्थ साउंड, अँटिग्वा
- दुसरा कसोटी सामना - 30 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर, जमैका
वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना कधी खेळला जाईल?
वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना आज म्हणजेच शुक्रवार, 22 नोव्हेंबर रोजी अँटिग्वा येथील नॉर्थ साउंड येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता खेळवला जाईल.
वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना कुठं आणि कसा पाहायचा?
सध्या भारतातील कोणत्याही टीव्ही चॅनेलवर वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या प्रसारणाबाबत कोणतीही माहिती नाही. तथापि, वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिकेचं लाईव्ह स्ट्रीमिंग फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर भारतात उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत चाहत्यांना इथून पहिल्या सामन्याचा आनंद घेता येईल.
One day closer to the 1st Test in Antigua!🏏#WIvBAN | #WIHomeForChristmas pic.twitter.com/p4ZWgt3C5h
— Windies Cricket (@windiescricket) November 20, 2024
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 :
वेस्ट इंडिज : क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), मिकेल लुईस, केसी कार्टी, ॲलेक अथानाझी, क्वाम हॉज, जस्टिन ग्रीव्ह्स, जोशुआ दा सिल्वा (यष्टीरक्षक), अल्झारी जोसेफ, केमार रोच, जेडेन सील्स, शामर जोसेफ.
बांगलादेश : महमुदुल हसन जॉय, शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, शहादत हुसेन, लिटन दास (यष्टीरक्षक), झाकेर अली, मेहदी हसन मिराज (कर्णधार), तैजुल इस्लाम, नाहीद राणा, हसन महमूद.
हेही वाचा :