बार्बाडोस (वेस्ट इंडिज) WI Beat ENG by 8 Wickets : वेस्ट इंडिज क्रिकेट संघानं तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात इंग्लंडला हरवून मालिका जिंकली आहे. 3 सामन्यांची वनडे मालिका जिंकून वेस्ट इंडिजनं नवा विक्रम केला आहे. या मालिकेतील वेस्ट इंडिजनं पहिला वनडे सामना 8 गडी राखून जिंकला होता तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडनं 5 गडी राखून विजय मिळवला होता. तिसरा वनडे सामना निर्णायक ठरला, जो वेस्ट इंडिजनं 8 विकेटनं जिंकला आणि 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका 2-1 नं जिंकली.
West Indies take victory in the final ODI, and win the series 2-1.
— England Cricket (@englandcricket) November 7, 2024
Congratulations @windiescricket on the series victory.
🌴 #WIvENG 🏴 | #EnglandCricket pic.twitter.com/ZDAodxSFYR
इंग्लंडची आव्हानात्मक मजल : या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं 50 षटकांत 8 गडी गमावून 263 धावा केल्या. सलामीवीर फिलिप सॉल्ट आणि डॅन मौसली यांनी अर्धशतकं झळकावली. फिलिपनं 74 धावांची खेळी केली तर डॅन मौसलीनं 53 धावा केल्या. इंग्लंडच्या धावसंख्येचा पाठलाग करताना यजमान वेस्ट इंडिजची सुरुवात चांगली झाली नाही. संघाला पहिला धक्का 7 व्या षटकात एव्हिन लुईसच्या रुपानं बसला. परंतु, त्यानंतर ब्रँडन किंग आणि केसी कार्टी यांनी शानदार फलंदाजी करत संघाला 250 च्या पुढं नेलं. या दोन्ही फलंदाजांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 209 धावांची विक्रमी भागीदारी झाली. यादरम्यान, ब्रँडन किंग आणि केसी कार्टी यांनी आपापली शतकं पूर्ण केली. वेस्ट इंडिजच्या वनडे क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यात दोन फलंदाजांनी शतकं झळकावल्याचं केवळ दुसऱ्यांदा घडले. याआधी 2006 मध्ये ख्रिस गेल आणि डीजे ब्रावो यांनी शतकं झळकावली होती.
The CG United ODI series is sealed with a clinical performance by the #MenInMaroon.
— Windies Cricket (@windiescricket) November 7, 2024
Let the celebrations begin! 🙌🏾🏆#TheRivalry | #WIvENG pic.twitter.com/cVp8U8EolJ
वेस्ट इंडिजच्या दोन फलंदाजानी इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात झळकावलेली शतकं :
- ख्रिस गेल (101) आणि डीजे ब्रावो (112*) - अहमदाबाद, 2006 (चॅम्पियन्स ट्रॉफी)
- ब्रँडन किंग (102) आणि केसी कार्टी (128*) - ब्रिजटाउन, 2024
🏏 Keacy Carty makes history, the first batter from Sint Maarten 🇸🇽 to score a 💯 for the #MenInMaroon! 🙌🏾#TheRivalry |#WIvENG pic.twitter.com/Weu84Yzdiy
— Windies Cricket (@windiescricket) November 7, 2024
केसी कार्टीनं रचला इतिहास : मात्र आक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्नात ब्रँडन किंग 102 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला तर केसी कार्टीनं 128 धावांची नाबाद खेळी केली. किंगनं 13 चौकार आणि 1 षटकार मारला. तर, किसी कार्टीनं 15 चौकार आणि 2 षटकार मारले. या शानदार शतकामुळं किसी कार्टीनं इतिहास रचला. वास्तविक, केसी कार्टीनं आपल्या वनडे कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं. अशाप्रकारे वेस्ट इंडिजच्या वनडे क्रिकेटच्या इतिहासात शतक झळकावणारा तो सिंट मार्टेनचा पहिला क्रिकेटपटू ठरला. इतकंच नाही तर केसी कार्टीनं वेस्ट इंडिजचा महान क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्ड्सचा मोठा विक्रमही उद्ध्वस्त केला आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना कीसी हा वेस्ट इंडिजसाठी वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. याआधी हा विक्रम विवियन रिचर्ड्सच्या नावावर होता ज्यांनी 1976 मध्ये नाबाद 116 धावा केल्या होत्या.
The 2️⃣nd highest ODI partnership (209) by West Indies in the Caribbean takes the #MenInMaroon to consecutive ODI series wins over England! 👏🏾👏🏾🏆#TheRivalry | #WIvENG pic.twitter.com/Bgf5c6w8tq
— Windies Cricket (@windiescricket) November 7, 2024
इंग्लंडविरुद्ध वेस्ट इंडिजच्या क्रमांक 3 फलंदाजानं केलेली सर्वोच्च वनेड धावसंख्या :
- 138* - व्हिव्हियन रिचर्ड्स, लॉर्ड्स 1979 (विश्वचषक)
- 128* - केजी कार्टी, ब्रिजटाउन 2024
- 119* - व्हिव्हियन रिचर्ड्स, स्कारबोरो 1976
- 116* - शिवनारायण चंद्रपॉल, एजबॅस्टन 2007
- 112* - डीजे ब्रावो, अहमदाबाद 2006 (चॅम्पियन्स ट्रॉफी)
CG United ODI Champions!🏆 #TheRivalry | #WIvENG pic.twitter.com/9fIa6kgBB6
— Windies Cricket (@windiescricket) November 7, 2024
हेही वाचा :