बेंगळुरु Virat Kohli 9000 Runs in Test : विराट कोहली जेव्हा जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा काहीतरी ना काही विक्रम नक्कीच घडतं जे चाहत्यांची मनं जिंकतं. यावेळी कोहलीनं बेंगळुरु कसोटीच्या दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावलं आणि यासोबतच त्यानं कसोटीत 9000 धावाही पूर्ण केल्या. विराट कोहलीनं 197 कसोटी डावांमध्ये 9000 धावांचा टप्पा गाठला. विराट कोहलीच्या 9000 कसोटी धावा खास आहेत, पण या खेळाडूचं बंगळुरु कसोटीतलं अर्धशतकही खास आहे. कारण भारतीय संघ बेंगळुरुमध्ये संकटात सापडली आहे आणि याच क्षणी विराटनं अर्धशतक झळकावलं.
𝟗𝟎𝟎𝟎 𝐓𝐞𝐬𝐭 𝐫𝐮𝐧𝐬 𝐚𝐧𝐝 𝐜𝐨𝐮𝐧𝐭𝐢𝐧𝐠....
— BCCI (@BCCI) October 18, 2024
A career milestone for @imVkohli 👏👏
He is the fourth Indian batter to achieve this feat.#INDvNZ @IDFCFIRSTBank pic.twitter.com/Bn9svKrgtl
विराट दिग्गज खेळाडूंच्या यादीत सामील : कसोटी क्रिकेटमध्ये 9000 धावा करणारा विराट कोहली हा चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांनी हा पराक्रम यापूर्वी केला आहे. मात्र, या महान खेळाडूंमध्ये विराट कोहलीनं सर्वाधिक डाव खेळून 9 हजारांचा आकडा गाठला आहे. द्रविडनं 176 डावांमध्ये 9000 कसोटी धावा पूर्ण केल्या होत्या. सचिननं 179 डावात ही कामगिरी केली होती. 9000 कसोटी धावा पूर्ण करण्यासाठी गावस्करनं 192 डाव आणि विराटला 197 डाव लागले.
Virat Kohli - the GOAT. 🐐
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 18, 2024
- 4th Indian after Tendulkar, Dravid and Gavaskar to reach 9,000 Test runs. pic.twitter.com/81hRyWJRYh
सर्वात जलद 9000 कसोटी धावा कोणाच्या नावावर : कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात 9000 धावा करण्याचा विश्वविक्रम कुमार संगकाराच्या नावावर आहे. त्यानं 172 डावात ही कामगिरी केली. स्टीव्ह स्मिथनं 174 डावात 9000 कसोटी धावा पूर्ण केल्या होत्या. तर राहुल द्रविड तिसऱ्या स्थानावर आहे.
BCCI POSTER FOR VIRAT KOHLI. 🐐 pic.twitter.com/Ia6itaX2eo
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 18, 2024
विराट कोहलीच्या खास 15000 धावा : विराट कोहलीबद्दल बोलायचं तर हा खेळाडू भारतासाठी तिसऱ्या क्रमांकावर 15000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा पहिला भारतीय ठरला आहे. आतापर्यंत केवळ पाँटिंग, संगकारा आणि केन विल्यमसन यांनी ही कामगिरी केली आहे.
हेही वाचा :