दुबई Latest ICC Rankings : भारतीय क्रिकेट संघाच्या न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दारुण पराभवानंतर ICC नं पुन्हा एकदा कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे (Lastest ICC Rankings). दरम्यान, भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला थोडा फायदा झाला आहे, तर यशस्वी जैस्वालला तोटा झाला आहे. तथापि, जर आपण रोहित शर्मा आणि विराट कोहलीबद्दल बोललो तर हे दोन्ही स्टार फलंदाज आता टॉप 10 पासून खूप दूर गेले आहेत. त्यांचं पुनरागमन आता खूप अवघड वाटत आहे. (ICC Test Rankings update )
Major shake-up in the top 10 of the ICC Men's Test Player Rankings across the board after #INDvNZ and #BANvSA series 🔥#WTC25 | Details ⬇https://t.co/2XzsyYtCVp
— ICC (@ICC) November 6, 2024
जो रुट पहिल्या क्रमांकावर : ICC नं जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत (ICC Test Rankings) इंग्लंडचा जो रुट अजूनही अव्वल स्थानावर आहे. त्याचं रेटिंग 903 आहे. सध्या त्याच्यासमोर कोणतंही आव्हान नाही. कारण केन विल्यमसन दुसऱ्या क्रमांकावर असून त्याचं रेटिंग 804 आहे. म्हणजेच पहिला आणि दुसरा फलंदाज यांच्यातील फरक बराच मोठा आहे, ज्यावर मात करणं सोपं नाही. यानंतर इंग्लंडच्या हॅरी ब्रूकला एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो आता 778 रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. (Rohit sharma icc rankings )
Indian batters in ICC Test Ranking:
— Johns. (@CricCrazyJohns) November 6, 2024
Yashasvi Jaiswal - 4
Rishabh Pant - 6
Shubman Gill - 16
Virat Kohli - 22
Rohit Sharma - 26 pic.twitter.com/hNDVJbjvpr
यशस्वी जैस्वालला एका स्थानाचं नुकसान : यशस्वी जैस्वाल न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटीत काही विशेष करु शकला नाही, त्यामुळंच त्याची आता एका स्थानानं घसरण झाली असून तो चौथ्या क्रमांकावर आला आहे, त्याचं रेटिंग आता 777 आहे. स्टीव्ह स्मिथ अजूनही 757 च्या रेटिंगसह 5 व्या क्रमांकावर आहे. ऋषभ पंतनं मुंबई कसोटीत इतर फलंदाजांच्या तुलनेत सरस कामगिरी केली होती, त्याचाच फायदा त्याला यावेळी क्रमवारीत होताना दिसत आहे. तो आता पाच स्थानांनी झेप घेत सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचं रेटिंग 750 झाले आहे. या दोघांशिवाय भारताचा एकही फलंदाज टॉप 10 मध्ये स्थान मिळवू शकलेला नाही.
RISHABH PANT MOVES TO NUMBER 6 IN ICC TEST BATTERS RANKING 🇮🇳
— Johns. (@CricCrazyJohns) November 6, 2024
- The main man is coming to rule. pic.twitter.com/gdl0IQI6p1
विराट कोहली आणि रोहित शर्मा अव्वल 20 मध्ये नाही : विराट कोहलीबद्दल (virat kohli icc rankings ) बोलायचं झालं तर यावेळी तो एकूण 8 स्थानांनी खाली गेला आहे. त्याचं रेटिंग 655 पर्यंत घसरलं असून तो 22 व्या क्रमांकावर आहे. सततच्या खराब खेळाचा परिणाम असा दिसतो. रोहित शर्माबद्दल बोलायचे झालं तर तो थेट 26 व्या क्रमांकावर गेला आहे. त्याचं रेटिंग सध्या 629 आहे. याचाच अर्थ आता या दोघांनाही टॉप 10 मध्ये परतणं खूप कठीण जाणार आहे.
हेही वाचा :