ETV Bharat / sports

अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कप; उपांत्य फेरीत भारताचा सामना द. आफ्रिकेशी, टीम इंडियाची मदार 'या' 5 प्रमुख खेळाडूंवर - U19 cricket World Cup 2024

U19 cricket World Cup 2024 : अंडर 19 विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या आफ्रिका संघाला हरवणं भारतासाठी मोठं आव्हान असेल. जाणून घ्या टीम इंडियाच्या प्रमुख खेळाडूंबद्दल, ज्यांच्यावर संघाची मदार असेल.

U19 cricket World Cup 2024
U19 cricket World Cup 2024
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 6, 2024, 7:35 AM IST

नवी दिल्ली U19 cricket World Cup 2024 : 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 6 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेतील सहारा पार्क क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल, तर नाणेफेक दुपारी 1 वाजता होईल. या सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व उदय सहारनकडे तर दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व जुआन जेम्सकडे असेल. सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि डिस्ने प्लस हॉटस्टरवर केलं जाईल. या सेमीफायनल मॅच आधी आम्ही तुम्हाला भारतीय टीमच्या महत्त्वाच्या खेळाडूंबद्दल सांगणार आहोत.

मुशीर खान : आजच्या सामन्यात मुशीर खान भारतीय संघासाठी सर्वात महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो. मुशीरनं या विश्वचषकात भारतासाठी 2 शतकं आणि 1 अर्धशतकासह 334 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 84.50 आणि स्ट्राइक रेट 103.72 होता. तो या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. फलंदाजीशिवाय त्यानं गोलंदाजीत 4 विकेट्सही घेतल्या आहेत. तो डाव्या हातानं फिरकी गोलंदाजी करतो.

उदय सहारन : टीम इंडियाचा कर्णधार उदय सहारन या सेमीफायनलमध्ये महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो. या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा तो दुसरा फलंदाज आहे. भारतीय कर्णधारानं 1 शतक आणि 2 अर्धशतकांसह 308 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 61.60 आणि स्ट्राइक रेट 84.46 आहे. भारताचं कर्णधारपद भूषवताना उदयनं आपल्या फलंदाज आणि गोलंदाजांचाही योग्य वापर केला आहे.

सौम्य कुमार पांडे : टीम इंडियाचा उपकर्णधार सौम्य कुमार पांडेनंही या विश्वचषकात जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यानं 5 सामन्यात 2.17 च्या किफायतशीर इकॉनामीसह 16 बळी घेतले आहेत. या दरम्यान त्याची 19 धावांत 4 बळी ही सर्वोत्तम कामगिरी राहिली. या विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. आता टीम इंडियाला उपांत्य फेरीत पुन्हा एकदा त्याच्याकडून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा असेल.

नमन तिवारी : डावखुरा वेगवान गोलंदाज नमन तिवारी यानं या स्पर्धेत आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. त्यानं 4 सामन्यात 4.24 च्या उत्कृष्ट इकॉनॉमीसह एकूण 9 विकेट्स घेतल्या आहेत. आता उपांत्य फेरीत त्याच्याकडून अशाचा कामगिरीची अपेक्षा आहे.

अन्य खेळाडूंची कामगिरी : अर्शीन कुलकर्णीनं 5 सामन्यात 1 शतकासह 174 धावा केल्या आहेत. तर, आदर्श सिंगनं 5 सामन्यात 2 अर्धशतकांसह 191 धावा केल्या आहेत. राज लिंबानीनं 5 सामन्यात 4 विकेट घेतल्या आहेत. या सर्व खेळाडूंनी उपांत्य फेरीत संघासाठी चांगली कामगिरी केली तर ते दक्षिण आफ्रिकेच्या संघाला घरच्या मैदानावर पराभूत करू शकतात.

खेळपट्टीचा अहवाल आणि आकडेवारी : सहारा पार्कची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली मानली जाते. या खेळपट्टीवर फलंदाज सहज धावा करू शकतात. वेग आणि उसळीमुळे फलंदाजांना फटके खेळणं सोपं जातं. तसेच वेगवान आउटफिल्डमुळे फलंदाज सहज चौकार ठोकू शकतात. या खेळपट्टीवर नवा चेंडू वेगवान गोलंदाजांसाठीही उपयुक्त आहे, तर चेंडू जुना झाल्यानंतर फिरकीपटूही अ‍ॅक्शनमध्ये येऊ शकतात.

सहारा पार्कची आकडेवारी : या मैदानावर सरासरी धावसंख्या 250 ते 270 दरम्यान आहे. येथील सर्वोच्च धावसंख्या 399 धावा आहे तर या किमान धावसंख्या 32 आहे. या मैदानावर पहिल्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघानं अधिक सामने जिंकले आहेत, तर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला विजय मिळवणं थोडं कठीण आहे.

भारतीय संघ : अर्शीन कुलकर्णी, आदर्श सिंग, रुद्र मयूर पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), अरावेली अवनीश राव, सौम्य कुमार पांडे (उपकर्णधार) मुरुगन अभिषेक, इनेश महाजन, धनुष गौडा, आराध्य शुक्ला, राज लिंबानी आणि नमन तिवारी.

हे वाचलंत का :

  1. अश्विन-बुमराहच्या गोलंदाजीनं 'बॅझबॉल'ची जिरवली, दुसऱ्या कसोटीत साहेबांचा पराभव; भारताची मालिकेत 1-1 नं बरोबरी
  2. अंडर 19 विश्वचषक क्रिकेट; भारताचा नेपाळवर मोठा विजय, उपांत्य फेरीत दिमाखात एन्ट्री

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.