ॲडलेड Fastest Hundred in Day-Night Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ यांच्यातील डे-नाईट कसोटी सामना ॲडलेडच्या मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात भारतानं पहिल्या डावात 180 धावा केल्या होत्या, ज्याच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियानं 337 धावा केल्या आहेत. यात ट्रॅव्हिस हेडनं ऑस्ट्रेलियासाठी दमदार शतक झळकावलं असून कसोटीत ऑस्ट्रेलियाला ड्रायव्हिंग सीटवर बसवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
Amazing.#AUSvIND pic.twitter.com/9ExKEVHjfZ
— cricket.com.au (@cricketcomau) December 7, 2024
ट्रॅव्हिस हेडचं उत्कृष्ट शतक : ट्रॅव्हिस हेडनं डावाच्या सुरुवातीपासूनच शानदार फलंदाजी केली. मैदानात तो भारतीय गोलंदाजांसाठी अडचणीचं कारण ठरला होता. त्यानं अवघ्या 111 चेंडूंमध्ये आपलं शतक पूर्ण केलं आणि डे-नाईट कसोटी सामन्यातील सर्वात वेगवान शतकाचा स्वतःचाच विक्रम मोडला. याआधी ट्रॅव्हिस हेडनंच 2022 साली इंग्लंडविरुद्धच्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात 112 चेंडूत शतक झळकावलं होतं. त्यानं 141 चेंडूत 140 धावा केल्या.
Adelaide has a new king 👑#AUSvIND pic.twitter.com/SeEaK9wRfe
— cricket.com.au (@cricketcomau) December 7, 2024
दिवस-रात्र कसोटी सामन्यात सर्वात जलद शतक झळकावणारे फलंदाज :
- 111 चेंडू, ट्रॅव्हिस हेड विरुद्ध भारत, 2024
- 112 चेंडू, ट्रॅव्हिस हेड विरुद्ध इंग्लंड, 2022
- 125 चेंडू, ट्रॅव्हिस हेड विरुद्ध वेस्ट इंडिज, 2022
- 139 चेंडू, जो रूट विरुद्ध वेस्ट इंडिज, 2017
- 140 चेंडू, असद शफीक विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2016
याशिवाय डे-नाईट कसोटी सामन्यातील त्याचं हे तिसरं शतक आहे. फक्त मार्नस लॅबुशेन त्याच्या पुढं आहे. ज्यानं दिवस-रात्र कसोटी सामन्यांमध्ये एकूण चार शतकं झळकावली आहेत.
- Hundred vs India in WTC Final.
— Tanuj Singh (@ImTanujSingh) December 7, 2024
- Hundred vs India in WC 2023 Final.
- Fifty vs India in T20 WC.
- Fifty vs India in 1st Test in BGT.
- Now Hundred vs India in 2nd Test in BGT.
- Travis Head is just Unstoppable against India in every formats, He is just Bossing right now..!!!! pic.twitter.com/RW8JcUUK7R
दिवस-रात्र कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांची यादी:
- मार्नस लॅबुशेन - 4 शतके
- ट्रॅव्हिस हेड- ३ शतके
- असद शफीक- 2 शतके
- दिमुथ करुणारत्ने- 2 शतके
A MARVELOUS HUNDRED BY TRAVIS HEAD AT HIS HOME...!!!!
— Tanuj Singh (@ImTanujSingh) December 7, 2024
- The celebration of Travis Head for his new born baby was beautiful. ❤️ pic.twitter.com/Dy3UOz3z5q
ऑस्ट्रेलियाकडे एकूण 157 धावांची आघाडी : ट्रॅव्हिस हेडच्या आधी मार्नस लॅबुशेननं अर्धशतक झळकावलं होतं आणि तो 64 धावा करुन बाद झाला होता. यानंतर हेडच्या शतकामुळं ऑस्ट्रेलियाची एकूण आघाडी 157 धावांची झाली आहे. भारताकडून जसप्रीत बुमराहनं आणि सिराजनं सर्वाधिक 4-4 विकेट घेतल्या आहेत. तर रविचंद्रन अश्विन आणि नितीश रेड्डी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
हेही वाचा :