ETV Bharat / sports

माजी क्रिकेटपटू युवराज सिंगच्या घरी चोरी, दोन नोकरांवर गुन्हा दाखल - Yuvraj Singh houseTheft

Yuvraj singh : भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू युवराज सिंगच्या घरून 75 हजार रुपयांची रोकड आणि दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. यानंतर युवराजची आई शबनम सिंग यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Yuvraj singh
Yuvraj singh
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 17, 2024, 9:35 AM IST

चंदीगड Yuvraj singh : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याच्या पंचकुला येथील घरात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. युवराजच्या घरातून 75 हजार रुपये आणि दागिन्यांची चोरी झाली. युवराज सिंगची आई शबनम सिंग यांनी घरातील नोकर आणि मोलकरणीवर चोरीचा संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय.

चोरी केव्हा झाली : शबनम सिंग यांनी सांगितलं की, "सप्टेंबर 2023 मध्ये त्या त्यांच्या गुरुग्राम येथील घरी राहायला गेल्या होत्या. 5 ऑक्टोबर 2023 रोजी त्या पंचकुला येथील घरी परतल्या, तेव्हा त्यांना पहिल्या मजल्यावरील खोलीच्या कपाटातून काही दागिने आणि सुमारे 75 हजार रुपये रोख गायब झाल्याचं आढळलं. यानंतर त्यांनी इकडे-तिकडे चौकशी करत शोध घेतला, मात्र काहीही सापडलं नाही."

गुन्हा दाखल : शबनम सिंग यांनी पोलिसांना सांगितलं की, घरातील मोलकरीण ललिता देवी आणि नोकर सालिंदर दास यांनी 2023 मध्ये दिवाळीच्या आसपास नोकरी सोडली होती. त्यामुळे त्यांच्यावर संशय घेतला जातोय. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास सुरू असून त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं.

मीडियाला अधिक माहिती देण्यास नकार : मनसादेवी पोलीस स्टेशनचे एसएचओ धरमपाल सिंह म्हणाले की, या प्रकरणाची अधिक माहिती त्यांनी मीडियाला दिली तर चोरांना पकडणं कठीण होऊ शकतं. तपास अधिकारी सुदेश यांनी सांगितलं की, शबनम सिंग यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांना अद्यापपर्यंत दोन्ही आरोपींचा शोध लावता आलेला नाही.

हे वाचलंत का :

  1. हरवलेले-चोरी गेलेले मोबाईल फोन सापडतात, रेल्वे पोलिसांनी चोरीचे 150 मोबाईल केले जप्त
  2. अभिनेत्री नेहा पेंडसेच्या घरात चोरी; सहा लाखाचे दागिने गेले चोरीला, आरोपीला अटक
  3. हे बिहार आहे भावा! रेल्वे इंजिन, सरकारी रुग्णालयानंतर आता चक्क तलावाची चोरी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.