Gautam Gambhir Press Conference : भारतीय संघाला श्रीलंका दौऱ्यावर तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दौऱ्यापासून भारतीय संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा कार्यकाळ सुरू होत आहे. श्रीलंका दौरा सुरू होण्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची ही पहिलीच पत्रकार परिषद आहे. यावेळी दोघांनी भारतीय क्रिकेटशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरं दिली.
Ajit Agarkar said - " hardik pandya is very important played for us. but his fitness is a concern in the past. becomes for selector & coach to play him every game. we wanted a captain who was available to play all games and suryakumar yadav has all the necessary qualities". pic.twitter.com/oKoiQl19Ai
— Tanuj Singh (@ImTanujSingh) July 22, 2024
हार्दिकचा पत्ता कट सूर्यकुमार नवा कर्णधार कसा : मुख्य निवडकर्ता अजित आगरकर म्हणाले, "सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवण्यात आलं, कारण तो योग्य उमेदवारांपैकी एक आहे. आम्हाला सर्व सामने खेळणारा कर्णधार हवा आहे. हार्दिक पांड्याचा फिटनेस त्याच्यासाठी आव्हानात्मक आहे. हार्दिक संघासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू आहे, पण त्याचा फिटनेस हा चिंतेचा विषय आहे. त्याला प्रत्येक सामना खेळायला लावणे प्रशिक्षकांसाठी कठीण होऊन बसतं. आम्हाला असा कर्णधार हवा होता जो सर्व सामने खेळण्यासाठी उपलब्ध असेल. सूर्यकुमार यादवमध्ये आवश्यक असलेले सर्व गुण आहेत.
Gautam Gambhir said - " betterment of indian cricket is very important, not gautam gambhir". pic.twitter.com/9Ey8W85ADJ
— Tanuj Singh (@ImTanujSingh) July 22, 2024
अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंग आणि संजू सॅमसन या खेळाडूंना संघातून वगळण्यात आल्याबद्दल अजित आगरकर म्हणाले, "त्यांना वगळण्यात आलं असं नाही. त्यांनी चांगली कामगिरी केली आहे पण संघात मर्यादित जागा असल्यामुळं आम्ही फक्त 15 जणांचा समावेश करू शकतो. रिंकूची कामगिरी चांगली होती. पण त्याला 2024च्या टी-20 विश्वचषकात संधी मिळाली नाही."
Ajit Agarkar (on Ruturaj and Abhishek drop) said, " any player who is dropped will feel hard done by. look at rinku, he performed really well ahead of the t20 world cup, but couldn't make the cut. we can only pick 15". pic.twitter.com/ko5U9WJfRU
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 22, 2024
रोहित आणि विराट 2027 चा वर्ल्ड कप खेळणार : गौतम गंभीर म्हणाला, "मोठ्या मंचावर ते काय करू शकतात हे त्यांनी दाखवून दिलं आहे. मी एक गोष्ट अगदी स्पष्टपणे सांगू शकतो की रोहित आणि विराटमध्ये भरपूर क्रिकेट शिल्लक आहे. ते कधीपर्यंत खेळणार तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. मी यात काहीही बोलू शकत नाही, हा त्यांचा स्वतःचा निर्णय असेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ते ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळताना दिसतील. जर ते त्यांचा फिटनेस राखू शकले तर ते 2027 चा वर्ल्ड कप देखील खेळतील.''
Ajit Agarkar said - " shubman gill is all three format player. he is class player. he shown a good leadership and we want to try him in the leadership group of india". pic.twitter.com/ZFTzhWxKn2
— Tanuj Singh (@ImTanujSingh) July 22, 2024
शुभमन गिल कर्णधारपदासाठी चांगला पर्याय : शुभमन गिलला उपकर्णधार बनवण्याबाबत अजित आगरकर म्हणाले, "शुभमन गिल हा तिन्ही फॉरमॅटचा खेळाडू आहे. तो भविष्यात भारतीय संघाच्या कर्णधारपदासाठी चांगला पर्याय ठरू शकेल. यापूर्वी रोहित शर्मा उपस्थित नव्हता आणि हार्दिकलाही दुखापत झाल्याने आमच्याकडे कर्णधारपदाचा पर्याय उरला नव्हता. आता आम्हाला शुभमन गिलला तयार करायचं आहे. शुभमन गिल हा तिन्ही फॉरमॅटचा खेळाडू आहे."
हेही वाचा
- ऑलिम्पिकचं आयोजन करणारा यजमान देश कमवतो की तोट्यात जातो? जाणून घ्या, सविस्तर - Paris Olympics 2024
- बीसीसीआयचे सचिव जय शाहांची मोठी घोषणा, पॅरिस ऑलिम्पिकसाठी खेळाडूंना जाहीर केली मदत - Paris Olympics 2024
- जो रुटची कसोटी क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी, 'क्रिकेटच्या देवा'चा 'हा' विक्रम धोक्यात - Joe Root Record
- युएईचा एकहाती पराभव करत भारताच्या मुली अशिया चषकाच्या सेमीफायनलमध्ये - INDW vs UAEW T20I