ETV Bharat / sports

'ज्युनिअर पीव्ही सिंधू' गाजवतेय मैदान; 13 वर्षीय तन्वी ठरली आशियाई चॅम्पियन, 'ईटीव्ही भारत'चा EXCLUSIVE रिपोर्ट - Badminton Player Tanvi Patri - BADMINTON PLAYER TANVI PATRI

Badminton Player Tanvi Patri : ओडिशा येथील 13 वर्षीय तन्वी पत्रीनं नुकत्याच झालेल्या आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत मुलींच्या पंधरा वर्षाखाली गटाचं विजेतेपद पटकावलं. यामुळं आता या 13 वर्षीय तन्वीला सर्वत्र 'ज्युनिअर पी.व्ही.सिंधू' म्हणून ओळखलं जातंय. 'ईटीव्ही भारत'सोबत तिनं EXCLUSIVE संवाद साधला. वाचा सविस्तर बातमी....

Badminton Player Tanvi Patri
बॅडमिंटन खेळाडू तन्वी पत्री (Source : ETV Bharat)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 30, 2024, 6:26 PM IST

Updated : Aug 30, 2024, 6:38 PM IST

पुणे Badminton Player Tanvi Patri : नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धत भारताला 6 पदकं मिळाली असून, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला एकही सुवर्णपदक मिळालं नाही. सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या भारतात आजही अनेक खेळाडू हे ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देण्याचं स्वप्न पाहत असून, तशी तयारी या खेळाडूंकडून करण्यात येत आहे. असं असताना ओडिसा येथील 13 वर्षीय तन्वी पत्रीनं नुकत्याच झालेल्या आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत मुलींच्या पंधरा वर्षाखाली गटाचं विजेतेपद पटकावलं आहे. यामुळं आता या 13 वर्षीय तन्वीला सर्वत्र 'ज्युनिअर पी.व्ही.सिंधू' म्हणून ओळखलं जातंय.

बॅडमिंटन खेळाडू तन्वी पत्रीसोबत 'ईटीव्ही भारत'नं साधलेला खास संवाद (Source : ETV Bharat Reporter)

चीनमध्ये घतलं प्रशिक्षण : तन्वीचे आई-वडील रबीनारायण पत्री व शैलबाला पांडा हे सॉफ्टवेयर इंजिनियर आहेत. ते पूर्वी चीनमध्ये काम करत होते. तिथंच तन्वीनं बॅडमिंटन खेळण्यास सुरुवात केली. सुरुवातीला तिनं चीनचे शीर्ष प्रशिक्षक जियांग योंग वायएल यांच्याकडं प्रशिक्षण घेतलं. कोविड-19 महामारीमुळं तिचं कुटुंब भारतात परतण्यापूर्वी 2017 ते 2020 दरम्यान तिनं चीनमध्ये नऊ विजेतेपदं जिंकली. यानंतर ती 2022 मध्ये प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमी (PPBA) मध्ये सामील झाली आणि टॅलेंट शोधण्यासाठी आयोजित केलेल्या शिबिरात अकादमीचं लक्ष वेधून घेतलं. कोरोनादरम्यान ते सर्व जण भारतात परतले. तन्वी गेली दोन वर्षे बंगळुरुच्या प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमीत प्रशिक्षण घेत आहे. चीनमध्ये वडील हे कामाबरोबरच बॅडमिंटन खेळत असताना तन्वीलाही बॅडमिंटनची आवड निर्माण झाली आणि वयाच्या पाचव्या वर्षापासून तिनं बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. वडिलांनाच पाहता पाहता आज तन्वीनं बॅडमिंटन स्पर्धेत वयाच्या 13 व्या वर्षीच नाव कमवायला सुरुवात केली.

अनेक स्पर्धांमध्ये जिंकली पदकं : आजपर्यंत राज्यात तसंच देशात आणि देशाबाहेर झालेल्या अनेक स्पर्धेत तन्वीनं अनेक पदकं जिंकली आहेत. ज्यात भुवनेश्वर इथं झालेल्या ऑल-ओडिशा उप-रँकिंग स्पर्धेत अंडर-15 आणि अंडर-17 मुलीच्या एकेरीत तिनं दोन्ही विजेतेपदं पटकावली, तर ज्युनियरने ओएसबीए ऑल-ओडिशा मिनी आणि सब-ज्युनियरमध्ये तीन विजेतेपदं, ऑल-ओडिशा रँकिंग स्पर्धेत अंडर-19 मुलींचं एकेरी विजेतेपद, ऑल इंडिया सब ज्युनियर रँकिंग बॅडमिंटन स्पर्धा हैदराबाद येथील अखिल भारतीय सब ज्युनियर रॅरिकिंग स्पर्धेत अंडर-15 आणि अंडर 17 मुलींच्या एकेरीत विजेतेपद पटकावलं.

तन्वीच्या नावावर अनेक विक्रम : तसंच महाराष्ट्रात 34 व्या सब-ज्युनियर (U-13) राष्ट्रीय बॅडमिंटन (U-13) टँकिंग बॅडमिंटन स्पर्धेत मुलींच्या एकेरीचं विजेतेपद जिंकणारी ओडिशाची पहिली शटलर ही तन्वी ठरली आहे. चीनमधील चेंगडू येथील चेंगडू विद्यापीठात आशियाई ज्युनियर (U15 U17) बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये महिला U-15 एकेरी सुवर्णपदक जिंकणारी ती तिसरी भारतीय शटलर बनली आहे.

काय म्हणाली तन्वी : याबाबत तन्वी पत्रीनं 'ईटीव्ही भारत'सोबत खास संवाद साधला. ती म्हणाली, "मी माझ्या वडिलांना बघून प्रेरित होऊन बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली आणि चीनमध्ये असताना तेथील 9 पदकं जिंकली. एका स्पर्धेत फक्त उपांत्य फेरीत मी हरले होते. ती हार मी आजही विसरत नाही. पण त्यानंतर मी जास्त मेहनत घेत स्पर्धेत सहभाग झाले. माझं स्वप्न आहे की, मी ऑलिम्पिक स्पर्धत खेळून भारताला दोन सुवर्णपदकं मिळवून द्यायची. आता नुकत्याच झालेल्या आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत मुलींच्या पंधरा वर्षाखाली गटाचं जेतेपद मिळवल्यानंतर मला आनंद झाला. मला विजयाचा विश्वास होता आणि चांगली कामगिरी करण्यात मी यशस्वी झाले. अशीच कामगिरी मी पुढे करणार आहे."

तन्वीचा उपांत्य फेरीत प्रवेश : सध्या पुण्यात सुरू असलेल्या पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटना (PDMBA) यांच्या वतीनं आयोजित बीडब्ल्यूएफ, बीए, बीएआय आणि एमबीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 'सुशांत चिपलकट्टी स्मृती करंडक योनेक्स सनराईज भारतीय कुमार आंतरराष्ट्रीय ग्रँड प्रिक्स' 19 वर्षांखालील बॅडमिंटन स्पर्धेत मुलींच्या एकेरीत तन्वीनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

हेही वाचा :

  1. मराठी मातीतील अस्सल खेळ 'विटी-दांडू'; काय आहे शिवकालीन खेळाचा रंजक इतिहास, आरोग्यासाठीही आहे फायदेशीर - Vitti Dandu Maharashtra

Last Updated : Aug 30, 2024, 6:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.