ETV Bharat / sports

भारतानं 50 धावांनी विजय मिळवित बांगलादेशचा उडवला धुव्वा, 'हे' खेळाडू ठरले विजयाचे शिल्पकार - T20 World Cup 2024 - T20 WORLD CUP 2024

T20 World Cup IND vs BAN : टी-20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय संघानं चमकदार कामगिरी केली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं सुपर-8 मधील दुसऱ्या सामन्यात बांगलादेशचा पराभव केलाय. त्यामुळे भारतीय संघानं उपांत्य फेरीतील आपलं स्थान जवळपास पक्कं केलं आहे.

T20 World Cup 2024
T20 World Cup 2024 (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 22, 2024, 7:44 PM IST

Updated : Jun 23, 2024, 7:17 AM IST

अँटिग्वा T20 World Cup 2024 IND vs BAN : भारतानं शनिवारी बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकातील सुपर-8 सामन्यात 50 धावांनी धुव्वा उडवत टीम इंडियानं उपांत्य फेरीचं तिकिट निश्चित केलेय. लागोपाठ दोन पराभवानंतर बांगलादेशचं विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलंय. बांगलादेशला आधी ऑस्ट्रेलियाकडून आणि आता भारताकडून पराभवाचा सामना करावा लागला. सुपर-8 मध्ये टीम इंडियानं लागोपाठ दोन सामन्यात विजय मिळवलाय. टीम इंडियाचा सुपर-8 मधील अखेरचा सामना सोमवारी ऑस्ट्रेलियाविरोधात होणार आहे.

भारतीय संघाची फलंदाजी : सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं 5 गडी गमावून 196 धावा केल्या. विराट कोहलीनं 28 चेंडूत 37 धावा, ऋषभ पंतनं 24 चेंडूत 36 धावा आणि शिवम दुबेनं 24 चेंडूत 34 धावा केल्या. तर कर्णधार रोहित शर्मानं 11 चेंडूत 23 धावा केल्या. अखेरीस हार्दिक पंड्यानं 27 चेंडूत नाबाद 50 धावा करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. बांगलादेशकडून वेगवान गोलंदाज तनझिम हसन आणि फिरकी गोलंदाज रिशाद हुसेननं 2-2 विकेट घेतल्या. याशिवाय शाकिब अल हसननं 1 विकेट घेतली.

भारतीय संघानं बांगलादेशसमोर 197 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या धावांचा पाठलाग करता बांगलादेशचा संघ 8 गडी गमावून केवळ 146 धावा करू शकला. बांगलादेश संघासाठी कर्णधार नझमुल हुसैन शांतोनं 32 चेंडूत 40 धावांची सर्वोच्च खेळी खेळली. तर तनजीद हसननं 29 आणि रिशाद हुसेननं 24 धावा केल्या. मात्र ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाही. भारतीय संघाकडून फिरकीपटू कुलदीप यादवनं सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांना प्रत्येकी 2 विकेट मिळाल्या.

'हे' 5 खेळाडू ठरले टीम इंडियाच्या विजयाचे शिल्पकार

  • हार्दिक पांड्या : हार्दिक पांड्यानं सहाव्या क्रमांकावर शानदार फलंदाजी करत 27 चेंडूत 50 धावा केल्या. त्यानं आपल्या डावात 4 चौकार आणि 3 षटकार मारले. 185.19 च्या स्ट्राइक रेटनं धावा केल्या. यानंतर पांड्यानं गोलंदाजीत कमाल केली. त्यानं टीम इंडियाला पहिला विकेट मिळवून दिला. पंड्यानं लिटन दासला 13 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.
  • ऋषभ पंत : पंड्यासोबतच ऋषभ पंतनंही फलंदाजीत कमाल केली. पंतनं 24 चेंडूत 36 धावा केल्या. तो जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता. पण 12व्या षटकात खराब स्वीप शॉट खेळून बाद झाला. पंतच्या शानदार फलंदाजीमुळं टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत झाली.
  • शिवम दुबे : खराब फॉर्मशी झगडणाऱ्या शिवम दुबेने चांगली फलंदाजी केली. त्यानं 24 चेंडूत 34 धावा करत भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेलं. शिवमनं हार्दिक पांड्याला दुसऱ्या टोकाकडून साथ दिली. त्यानं तीन गगनचुंबी षटकार ठोकले. पंड्या आणि दुबे यांच्यात 53 धावांची भागीदारी झाली.
  • कुलदीप यादव : कुलदीप यादवनं गोलंदाजी करताना बांगलादेशची दाणादाण उडविली. कुलदीपच्या जादुई गोलंदाजीनं बांगलादेशचा सलामीवीर तनजीद हसन 29 धावांवर, तौहीद हृदयॉय 4 धावांवर आणि शकीब अल हसनला 11 धावांवर बाद केलं. कुलदीपनं 4 षटकात 19 धावा देत 3 विकेट घेतल्या.
  • जसप्रीत बुमराह : बुमराहनं 4 षटकात केवळ 13 धावा दिल्या. तर 2 विकेट घेतल्या. बुमराहनं कर्णधार नजमुल हुसेन शांतोला 40 धावांवर तर रिशाद हुसेनला 24 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. या दोन मोठ्या विकेट घेत बुमराहनं बांगलादेशचं कंबरडं मोडलं.

बांगलादेशविरुद्ध भारताचं वर्चस्व : बांगलादेशविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघानं निर्विवाद वर्चस्व राखलं आहे. पण धक्कादायक खेळ करण्यात बांगलादेश तरबेज आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत 14 टी 20 सामने खेळले गेले आहेत. यात भारतीय संघानं 13 सामने जिंकले आहेत. तर बांगलादेशनं केवळ एक सामना जिंकला. बांगलादेशचा भारताविरुद्धचा एकमेव विजय नोव्हेंबर 2019 मध्ये झाला होता.

भारत आणि बांगलादेश हेड-टू-हेड रेकॉर्ड :

  • एकूण टी-20 सामने : 14
  • भारतानं जिंकले : 13
  • बांगलादेशनं जिंकले : 1

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन :

  • भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह
  • बांगलादेश संघ : सौम्य सरकार, लिट्टन दास (यष्टीरक्षक), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शकीब अल हसन, तौहीद हृदयॉय, महमुदुल्ला, जाकेर अली, महेदी हसन, रिशाद हुसेन, तन्झीम हसन शाकिब, मुस्तफिजुर रहमान

हेही वाचा :

  1. जसप्रीत बुमराह प्रतिस्पर्धी फलंदाजांसाठी ठरतोय 'कर्दनकाळ'; टी 20 विश्वचषकातील आकडेवारी एकदा पाहाच...
  2. टी 20 विश्वचषकातील भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यापूर्वी पंतप्रधान मोदींच्या दोन्ही संघांना शुभेच्छा, म्हणाले...
  3. बांगलादेशसमोर टीम इंडियाचा विजयी रथ रोखण्याचं आव्हान; कोणाचं पारडं जड? जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड

Last Updated : Jun 23, 2024, 7:17 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.