T20 World Cup IND vs ENG Semi Final : सुपर-8 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारतानं टी-20 क्रिकेट विश्वचषक 2024 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान पक्कं केलं आहे. उपांत्य फेरीत भारताचा सामना आज इंग्लंडशी होणार आहे. 2022 च्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतही भारताचा सामना इंग्लंडशी झाला होता. त्या सामन्यात इंग्लंडनं भारताचा 10 गडी राखून पराभव केला. आता भारत या पराभवाचा बदला घेणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघांमधील हेड टू हेड रेकॉर्ड जाणून घेऊया.
It's your time to shine 😎
— Star Sports (@StarSportsIndia) June 26, 2024
While Team India aims for revenge against England, don’t miss your chance to win big at 👉 https://t.co/IN7USexTwb!
Hit ❤️ if you're ready to make every second count! pic.twitter.com/PHZRhvCgAR
भारत-इंग्लंड किती वेळा आमने सामने : टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड आतापर्यंत 23 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यामध्ये भारताचं वर्चस्व राहिलं आहे. भारतानं 12 सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. तर इंग्लंडनं 11 सामने जिंकले आहेत. आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि इंग्लंड 4 वेळा भिडले आहेत. त्यामध्ये दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकले आहेत. त्यामुळं टी-20 विश्वचषकात दोन्ही संघांची कामगिरी समान आहे.
The determination to be the best, performing under pressure, and match-winning prowess - England players #JosButtler, #JofraArcher, and #WillJacks praise #ViratKohli's brilliance on and off the field 😍
— Star Sports (@StarSportsIndia) June 26, 2024
Will 👑 Kohli lead #TeamIndia to avenge their #T20WorldCup2022 loss and… pic.twitter.com/9JLopfGW3A
यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत भारताची कामगिरी इंग्लंडपेक्षा चांगली राहिली आहे. भारतानं यंदाच्या टी-20 विश्वचषकात 7 सामन्यांपैकी 6 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर 1 सामना पावसामुळं अनिर्णित राहिला आहे. भारताची फलंदाजी आणि गोलंदाजी प्रभावी ठरली आहे. त्यामुळं इंग्लंडविरुद्धच्या लढतीत भारत जिंकेल, अशी भारतीय क्रिकेटप्रेमींना आशा आहे.
Huddle Talk ✅
— BCCI (@BCCI) June 24, 2024
Time to hit the ground running 👍 👍
Follow The Match ▶️ https://t.co/L78hMho6Te #T20WorldCup | #TeamIndia | #AUSvIND pic.twitter.com/0cm1h0fPPX
पावसामुळं सामना रद्द झाला तर? : भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात पावसाचं सावट आहे. हवामान खात्याच्या अहवालानुसार, या सामन्यात पाऊस होण्याची 70 टक्के शक्यता आहे. यासोबतच सामन्यादरम्यान जोरदार वादळी वाऱ्याचीही अपेक्षा आहे. या सामन्यादरम्यान गयानामध्ये तापमान 31 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. Accuweather.com च्या मते, गयानामध्ये सकाळी 10 वाजता 66%, सकाळी 11 वाजता 75% पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच दुपारी 12 वाजता 49%, दुपारी 1 वाजता 34% आणि 2 वाजता 51% पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं सामना रद्द होण्याची शक्यता आहे. पावसामुळं सामना रद्द झाला तर सुपर-8 टप्प्यात अव्वल स्थानी राहिल्यामुळं भारतीय संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. कारण उपांत्य फेरी-2 साठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही.
SEEEEEED! 🔥
— England Cricket (@englandcricket) June 23, 2024
That's 3️⃣0️⃣ T20 World Cup wickets for our Rash 🤝
🇺🇸 6️⃣7️⃣-4️⃣#EnglandCricket | #ENGvUSA pic.twitter.com/qNdqizo3Je
भारताच्या 'या' खेळाडूंवर असेल नजर
- या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीची फारशी कामगिरी समाधनकारक झाली नाही. त्यांनी कामगिरी चांगली केली तर भारताचा विजय सुकर होऊ शकतो. त्याचवेळी सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत या खेळाडूंवर सर्वांच्या नजरा असतील. तर गोलंदाजीची जबाबदारी अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांच्यावर असेल.
इंग्लंडच्या 'या' खेळाडूंवर असेल नजर
- इंग्लंडसाठी कर्णधार जोस बटलर आणि फिल सॉल्ट भारतीय संघासाठी धोकादायक ठरू शकतात. तर गोलंदाजीत आदिल रशीद, जोफ्रा आर्चर आणि ख्रिस जॉर्डन भारतासाठी घातक ठरू शकतात. बटलरनं 191 आणि सॉल्टनं 183 धावा केल्या आहेत. राशिदनं 9, आर्चरनं 9 आणि जॉर्डननं 7 विकेट्स घेतल्या आहेत.
Smiles 🔛
— BCCI (@BCCI) June 22, 2024
LIVE Action ⌛️
Follow The Match ▶️ https://t.co/QZIdeg3h22#T20WorldCup | #TeamIndia | #INDvBAN
📸 ICC pic.twitter.com/KOkgjc4ajl
दोन्ही संघांचं संभाव्य प्लेइंग इलेव्हन
- भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग.
- इंग्लंडचा संघ : फिल सॉल्ट, जोस बटलर (कर्णधार आणि यष्टिरक्षक), जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, रीस टोपली.
हेही वाचा
- भारत-इंग्लंड उपांत्य फेरीचा सामना पावसात वाहून गेल्यास भारतीय संघ जाणार थेट अंतिम फेरीत, काय आहे नियम? - T20 World Cup 2024
- ऑलिम्पियन कविता राऊतसह अनेक खेळाडूंचा पदकं परत करण्याचा राज्य सरकारला इशारा, बेमुदत उपोषणही करणार, कारण काय? - Sportspersons Demands
- बापरे बाप! इंग्लंडच्या 'या' वेगवान गोलंदाजानं एकाच षटकात दिल्या तब्बल 43 धावा, केला लाजिरवाणा विक्रम - Ollie Robinson