ETV Bharat / sports

टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघ आयर्लंडविरुद्धच्या सोप्या सामन्यात 'फर्स्ट क्लास' पास - IND vs IRE - IND VS IRE

ICC T20 World Cup IND vs IRE : टी-20 विश्वचषकात आज भारत विरुद्ध आयर्लंड संघाचा सामना होत आहे. उभय संघांमधील हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघानं दणदणीत विजय मिळवलाय.

ICC T20 World Cup IND vs IRE
ICC T20 World Cup IND vs IRE (T20 world cup twitter handle)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 5, 2024, 8:53 PM IST

Updated : Jun 5, 2024, 11:00 PM IST

न्यूयॉर्क ICC T20 World Cup IND vs IRE : अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात आज भारत विरुद्ध आयर्लंड सामना झाला. उभय संघांमधील हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघानं 8 गडी राखत दणदणीत विजय मिळवलाय. यायह भारतानं टी-20 विश्वचषकात विजयी सुरुवात केलीय. आयर्लंडनं भारताला विजयासाठी दिलेल्या 97 धावांचं माफक लक्ष्य भारतीय संघानं 13 व्या षटकात दोन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्मानं सर्वाधिक 52 धावा केल्या तर ऋषभ पंतनं नाबाद 36 धावा करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

आयरीश फलंदाजांची शरणागती : तत्पुर्वी या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना आयरिश संघ 16 षटकांत अवघ्या 96 धावांत गडगडला. भारतीय वेगवान गोलंदाजांसमोर आयरिश संघाच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली आणि सुरुवातीपासूनच त्यांच्या विकेट पडत राहिल्या. केवळ गॅरेथ डेलेनी, जोशुआ लिटल, कर्टिस कॅम्फर आणि लॉर्कन टकर यांना दुहेरी आकडा गाठता आला. डेलेनीनं 14 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांसह सर्वाधिक 26 धावा केल्या. लिटलनं 14 धावांचं, कॅम्परनं 12 आणि टकरनं 10 धावांचं योगदान दिलं. भारताकडून हार्दिक पांड्यानं सर्वाधिक तीन बळी घेतले. अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराहनं प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली.

भारतीय प्रेक्षकांचा अमेरिकेत जल्लोष (मिनाक्षी राव)

हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : आयर्लंडविरुद्धचा भारतीय संघाचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. या संघाविरुद्ध भारतानं आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. भारत आणि आयर्लंडमध्ये आतापर्यंत एकूण 7 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. यात भारतीय संघानं सर्व सामने जिंकले. त्याचबरोबर भारतानं तीन एकदिवसीय सामन्यांमध्येही विजय मिळवलाय.

विराट कोहली येणार सलामीला : भारतीय संघानं या सामन्यासाठी चायनामन गोलंदाज कुलदीप यादव, यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन, लेग-स्पिनर युजवेंद्र चहल आणि सलामीवीर यशस्वी जैस्वाल यांचा अंतिम संघात समावेश केलेला नाही. अशा स्थितीत विराट कोहली आणि रोहित शर्मा सलामीला येतील. दुसरीकडे, आयर्लंडनं आपल्या प्लेइंग-11 मध्ये क्रॅग यंग, ​​नील रॉक, ग्रॅहम ह्यूम आणि रॉस एडेअर यांचा समावेश केला नाही.

भारताची प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

आयर्लंडची प्लेइंग 11 : अँड्र्यू बलबर्नी, पॉल स्टर्लिंग (कर्णधार), लॉर्कन टकर (यष्टीरक्षक), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क एडेअर, बॅरी मॅकार्थी, जोश्वा लिटल, बेन व्हाइट

भारतीय संघाचा अ गटात समावेश : या टी-20 विश्वचषकात भारतीय संघाला आयर्लंड, पाकिस्तान, यूएसए आणि कॅनडा सोबत अ गटात ठेवण्यात आलंय. भारतीय संघाचे पहिले तीन साखळी सामने न्यूयॉर्कमध्ये होणार आहेत. यात भारतीय संघ आज 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध पहिला सामना खेळात आहे. तर त्यांचा दुसरा सामना 9 जून रोजी पाकिस्तानशी होणार आहे. भारतीय संघ 12 जून रोजी अमेरिकेविरुद्ध तिसरा तर शेवटचा गट सामना कॅनडाविरुद्ध 15 जून रोजी फ्लोरिडामध्ये होणार आहे.

हेही वाचा :

  1. आयसीसीनं जाहीर केली बक्षिसांची रक्कम; क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच मिळणार 'इतकी' रक्कम - T20 World Cup 2024
  2. ऑलराऊंडर केदार जाधवचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर - Kedar Jadhav Retirement
  3. टी20 वर्ल्ड कप 2024 : वर्ल्डकपमध्ये रंगला सुपर ओव्हरचा थरार; डेव्हिड व्हिसा ठरला नामिबियाच्या विजयाचा 'नायक' - T20 World Cup 2024

Last Updated : Jun 5, 2024, 11:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.